महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयातच थेट मिळणार लर्निंग लायसन्स

किर्ती महाविद्यालयातून 16 जानेवारीला उपक्रमाचा प्रारंभ

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयातच थेट मिळणार लर्निंग लायसन्स

Thursday January 12, 2017,

1 min Read

राज्यातील सर्व महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी दुचाकी तसेच चारचाकी वाहनाचा शिकाऊ वाहन अनुज्ञप्ती परवाना (लर्निंग लायसन्स) थेट त्यांच्या महाविद्यालयात वितरित करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा प्रारंभ किर्ती महाविद्यालय येथे 16 जानेवारी 2017 पासून होत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे दिली.


image


महाविद्यालयातील विद्यार्थांचा पहिला शासकीय यंत्रणेशी थेट संबध शक्यतो वाहन परवान्याच्या निमित्ताने त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात येतो. अशा वेळी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारातील दलालांच्या संपर्कात आल्याने संबधित विद्यार्थ्यांचा शासकीय यंत्रणा भ्रष्ट असल्याचा गैरसमज होण्याची शक्यता असते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा होणारा गैरसमज दूर करुन वाहन परवाना थेट त्यांच्या महाविद्यालयामध्ये प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत योग्य त्या कागदपत्रांची तपासणी करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्या बहुमोल शैक्षणिक वेळेमध्ये तसेच प्रवास खर्च आणि श्रमाची बचत होऊन प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये फेऱ्या मारण्याचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे.