भारतीय रेल्वेचे उर्जेवरील ४१ हजार कोटी वाचविण्याचे नियोजन

 सौर, वायू यांच्या मदतीने भविष्यात काम करणार!

भारतीय रेल्वेचे उर्जेवरील ४१ हजार कोटी वाचविण्याचे नियोजन

Friday April 07, 2017,

2 min Read

भारतच्या अर्थ व्यवस्थेचा मागील काळात बराच विस्तार झाला आहे, पीआयबीच्या वृत्तानुसार गेल्या काही वर्षात तो ७-८ टक्के प्रतिवर्ष असा झाला आहे. 


image


या वळणावर, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नव्या अभियानाची सुरूवात केली आहे ज्याचे नाव ‘मिशन४१के’ असून पुढील दहा वर्ष भारतीय रेल्वेला राबवायचे आहे. या अभियानात विद्यूत उर्जेची बचत करत तिला सौर उर्जेत परावर्तीत करायचे आहे. हे यापूर्वीच करणे शक्य असल्याचे सिध्द झाले आहे त्यात चार हजार कोटी रुपयांची बचत करणे शक्य झाले आहे. त्यामुळे ‘मिशन४१के’ च्या माध्यमातून भारतीय रेल्वेला खर्चातील ४१ हजार कोटी रूपये ऊर्जेवर वाचविता येणे शक्य होणार आहे.

जरी सौर उर्जेसाठी भारतभर या अभियानाला स्वत:च्या पायावर राबविता येणार आहे, हा काही एकमेव मार्ग नाही ज्यातून भारतीय रेल्वे मंत्रालयाने त्याच्या अंमलबजावणीचे नियोजन केले आहे. त्यांनी खर्च कमी करून महसूल वाढविण्याचे नियोजन देखील केले आहे. “ आम्ही दुस-या बाजूनेही कामाला सुरूवात केली आहे, ज्यातून खर्च कमी करताना महसूल वाढवता यावा जो अनुत्पादीत खर्च केला जातो. रेल्वे १७हजार कोटी रूपयांचा अतिरिक्त महसूल अनुत्पादीत फे-यां मधून प्राप्त करत आहे.” रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी स्पष्ट केले. जाहिराती हा महत्वाचा घटक आहे ज्यातून रेल्वेचा महसूल वाढणार आहे. यासाठी सुरूवातीला वीस हजार स्क्रिन्स लावल्या जात आहेत, ज्यावर जाहिराती केल्या जातील. केवळ यातूनच रेल्वेला दहा हजार कोटीचा महसूल अपेक्षित आहे. त्यांनी त्यांच्या कडील डाटा बँक करून ठेवण्याचे ठरविले आहे, जेणे करून नेहमी प्रवास करणारे प्रवासी असतील त्यांना जास्त चांगल्या सेवा सुविधा देता याव्यात. असे देखील सांगण्यात आले आहे.