(फोटोस्पार्क) बदलाची वेगवान गाडी: सामाजिक उद्यमींना भेटा जागृती एन्टरप्राईजेसच्या मेळ्यात!

0

फोटोस्पार्क हे युअरस्टोरीचे साप्ताहिक सदर आहे. ज्यामध्ये छायाचित्रांच्या माध्यमातून उद्यमितेच्या क्षेत्रातील प्रतिभांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला जातो. बंगळूरूमध्ये झालेल्या जागृती एन्टरप्रायजेसच्या मेळ्यात आलेल्या सामाजिक उद्यमितेच्या क्षेत्रातील सहभागीदारांच्या कृतीत्मकता आणि संशोधकवृत्तीचा आम्ही घेतलेला हा मागोवा.


पुढल्या ११५ छायाचित्रांतून आम्ही आपल्याला या मेळ्यातील वैविध्याचा परिचय करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यात, कला मेळा, विश्व संगित महोत्सव, चित्रकला महोत्सव, टेलीकॉम प्रदर्शन, कला संग्रहालय, मोबाईल प्रदर्शन, गणिती संग्रहालय, सामाजिक हेकथॉन, पुस्तकालय, सहकार्य स्थान, सेन्सोरियम, आंतरराष्ट्रीय नक्षीकाम सप्ताह, पुष्प प्रदर्शन, बाह्य जाहीराती, स्टार्टअप रोड शो, संगणक संग्रहालय, स्टार्टअप टी शर्ट, व्यावसायिक ओळखपत्रे, कला उपचार पध्दती, स्टार्टअप महोत्सव, दिवाळी रांगोळ्या,वेसाक, जाझ महोत्सव, मॉडर्न आर्ट दालन, इकोप्रेनिअर्स, चित्रकार-कवी, आरोग्य कार्यकर्ता, सेवाभावी संघटना आणि डिजीटल शोधकर्ते असतील.

दरम्यान,अनेकांनी वर्षांखेरीच्या मेजवानीची तयारी केली आहे, ४८० सामाजिक उद्यमी या नवव्या वार्षिक जागृती मेळ्यात सहभागी होत आहेत. १५ दिवसांच्या आठ हजार किलोमिटर्सच्या रेल्वे प्रवासातून देशाभरातील बारा शहरातून२४ डिसें.२०१६ते ८जानेवारी२०१७ दरम्यान मोठे परिवर्तन घडविले जाणार आहे. २७ डिसेंबरला त्यांनी बंगळुरूमध्ये विश्रांतीसाठी आणि फोटो शोकेस साठी मुक्काम केला. आम्ही त्यातील काही कार्यकर्ते आणि संस्थापक सामाजिक-अर्थिक क्षेत्राच्या विकासात स्टार्टअपच्या माध्यमातून कार्य करणा-यांचा परिचय करुन दिला आहे (पुढील पृष्ठ पहा).उत्पादनाच्या वैशिष्टपूर्ण वर्गवारीतून आणि केलेल्या प्रयत्नातून सुरक्षीत अन्न, शेती औजारे, पावसाळी पाणी व्यवस्थापन, ग्रामिण हस्तकला, सौर उर्जा साधने, सुधारीत उत्पादने, पुनप्रक्रिया कार्यक्रम, इको टुरिझम, मोबाईल स्किल लँब, वेरेबल्स आणि आयओटी टुलकिट्स. विकसीत करण्यात आली आहेत.

यामध्ये सामाजिक उद्यमींनी भाग घेतला आहे जसे की, डेली डम्प, ऍन्ट क्रिएशन्स, लेटस एन्डोर्स, ग्रिनवे अप्लायन्सेस, बझ इंडिया, किन काइट, जीवाभुमी, कमल किसन, ग्रिन दुनिया, संकल्प, आओ हॉस्टेल्स, ग्रीन पाथ, हँन्ड ओव्हर हार्ट,विस्मय,ग्राम सेवा संघ, मेघशाळा, इको सोप्च, कार्डिओ ट्रँक, लूप रिआलिटी, कृषी नँचरल्स, एनेबल इंडिया, एम्पेरे टेक्नोलॉजी, इको-फेमी, बूंद कप, इडू स्पोर्टस्, डिजीटल एम्पॉवरमेंट कॉर्पोरेशन आणि किसान राजा. सर्व यात्रीप्रिनिअर्सना २०१७साठी आणि त्या पुढल्या वाटचालीसाठी आम्ही सुयश चिंतीतो,आणि पुढल्या जागृती इंटरप्रायजेसच्या मेळ्यासाठी देखील!

लेखक : मदनमोहन राव