‘फुलऑन शुभमंगल.कॉम’

‘फुलऑन शुभमंगल.कॉम’

Monday October 19, 2015,

4 min Read

इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडील विवाह वैविध्यपूर्ण पद्धतीने थाटामाटात पार पडले जातात. असे असले तरी ही थाटामाटाची संकल्पना ही प्रत्येकाच्या कुवतीनुसार बदलते. हा लग्न सोहळा संस्मरणीय व्हावा यासाठी त्यासंबंधीच्या साऱ्या कामांचे किंबहूना योजनांचे व्यवस्थापन उत्तमरित्या केले तर समारंभ अधिक शानदार होऊ शकतो. यामुळे आयत्या वेळी होणारी धावपळ टळते. तसेच लग्न समारंभ पूर्ण पार पडेपर्यंत यजमानांना जो ताणतणाव येतो तोही ही दूर होऊ शकतो.

लग्न समारंभ पार पडेपर्यंत अनेक महत्वाच्या गोष्टींची गरज असते. उदा. - लग्नहॉल, कपडे , दागिने, बस्ता, फोटोग्राफर्स, ब्यूटिशियन इत्यादी...मात्र अशा सर्व गोष्टींची पूर्तता करताना वधु पित्याची किंवा समारंभ आयोजकाची चांगलीच तारांबळ उडते. त्यांना त्रास होतो.. त्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी आणि लग्नसमारंभासारखा खास सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अनेकजण लग्नसमारंभाविषयक सेवा पुरवणाऱ्या विक्रेत्यांचे सहाय्य घेतात. ‘फुलऑन शादी.कॉम’ ही अशीच एक वेबसाईट आहे जी ग्राहकांना ‘एन्ड टू एन्ड सोल्यूशन’ अर्थात 'एका छत्राखाली सर्व बाबींची उपलब्धता करून देत आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून अनेकजण लग्नसमारंभाचे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडत आहे.


फुलऑन शादी.कॉम टीम

फुलऑन शादी.कॉम टीम


फुलऑन शादी.कॉम या वेबसाईटला गेल्या तीन महिन्यात ब-याच लोकांनी भेट दिली आहे. लग्न कार्यातील अनेक सोयी-सुविधांची इत्यंभूत माहिती तुम्हाला या वेबसाईटवर पाहायला मिळेल. या वेबसाईटवर एकूण ९५० हून अधिक विवाह संबंधी सेवा/साहित्य पुरवणाऱ्या विक्रेत्यांची (वेंडर्स लिस्ट) यादी आहे. ही वेबसाईट अजूनही चांगल्या आणि दर्जेदार सेवा देणाऱ्या विक्रेत्यांच्या शोधात आहे. लवकरच आणखी विक्रेत्यांची नावे या वेबसाईटवर दिसणार आहेत

लग्न सोहळ्यात लोक अनेक गोष्टींवर खर्च करण्यास मागे पुढे पाहात नाहीत. मात्र काही वेळा या समारंभात अनावश्यक खर्च होत असतो. अशाच अनावश्यक खर्चास आळा बसावा आणि कमीत कमी खर्चात विवाह सोहळा पार पडावा यासाठी इंदूरमध्ये राहणारे खुशबू आणि शल्लभ यांनी फुलऑनशादी ही वेबसाईट तयार केली आहे.


image


या वेबसाईटवर नमूद केलेल्या विक्रेत्याव्यतिरिक्त इतर कुठल्याही बाहेरच्या विक्रेत्यांची सेवा घेता येणार असल्याची माहिती या वेबसाईटच्या संस्थापिका खुशबू जगवानी जलावाड या देतात. खुशबूचा पती शल्लभ जलावाड सांगतो की आमच्या मित्राच्या लग्नात त्याच्या घरच्या मंडळींची एवढी धावपळ झाली की त्यामुळे लग्नाची मजाच घेता आली नाही. यावरूनच आम्हाला या वेबसाईटची संकल्पना सुचली. खुशबू सांगते की एका ब्युटीपार्लरमध्ये ५ ते ६ वधू एका रांगेत मेकअप करण्यासाठी बसल्या होत्या. आणि तो मेकअपमॅन एका मागून एक त्या वधूंचा मेकअप करत होता..मात्र अशा गोष्टींचे योग्य नियोजन न केल्यामुळे त्या वधूंचा वेळ वाया गेला होता. त्यामुळे अशा समारंभात वेळ वाया जाऊ नये आणि चांगल्या सुविधांसह योग्य नियोजन करता यावे, या हेतूने ऑगस्ट २०१५ मध्ये ही वेबसाईट तयार केली असल्याचे खुशबू यांनी सांगितले. खुशबू यांनी दिल्लीतून एमबीए फायनान्सची डिग्री घेतली असून त्यांना ५ वर्षाचा product strategic planning या विषयाचा अनुभव आहे. शल्लभ मॅकॅनिकल इंजिनिअर असून त्याच्याकडेही सात वर्षांचा बिझिनेस मार्केटिंगचा अनुभव आहे.

काय आहे वेबसाईट

ही वेबसाईट आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलीय. चांगल्या आणि मेहनती वेंडर्सचा शोध घेण्याच्या कामावर भर दिला जातोय. लग्नाचे कपडे - दागिने, फोटोग्राफर्स, ब्यूटिशियन, मंडप डेकोरेटर्स, ढोल ताशे, पंडित असे वेंडर्स आम्ही शोधत आहोत. अधिक वेंडर्स असले की ग्राहकांसाठी तेवढे पर्याय उपलब्ध होतील. त्यामुळे ग्राहकांना जेवढी ऑर्डर द्यायची आहे तेवढीच देता येईल आणि जर का लग्न मालकाला बाहेरची ऑर्डर द्यायची असेल तर तीही देता यणार असल्याचे शल्लभ म्हणतो..लग्नात काय -काय करावे लागणार त्यासंबंधी सर्व महत्त्वाची यादी आणि गेस्ट लिस्टही वेबसाईटवर पाहायला मिळते.

वेबसाईटवर नमूद सर्व वेंडर्सची तपशीलवार माहिती घेऊन तसेच सर्व बाबींची पूर्तता करूनच वेबसाईटवर नावे जाहीर केल्याचा दावा खुशबी यांनी केलाय. ज्यांना कुठेही काम करण्याची संधी मिळाली नाही अशा मेहनती आणि गुणी वेंडर्सना शोधून आम्ही त्यांना संधी देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचा फायदा ग्राहकांनाही होत असल्याचचे शल्लभ सांगतात.


हिमांशु जगवानी हे वेबसाईटची तांत्रिक जबाबदारी सांभाळत असून आयआयटी खरगपूरचे ते विद्यार्थी आहे तसेच या वेबसाईटच्या संस्थापिका खुशबू यांचा भाऊदेखील आहे. सध्याच्या धावत्या जगात अशा समारंभाचे नियोजन करण्यासाठी कुणाला वेळ मिळत नसल्याने अनेकजण अशा वेबसाईटची मदत घेत आहेत. या वेबसाईटच्या माध्यमातून विवाहविषयक सर्व बाबींची पूर्तता होत असल्याकारणाने ही वेबसाईट अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. अनेकजण या माध्यमाचा वापर करत आहे.

ज्यावेळी ही वेबसाईट सुरू केली त्यावेळी बाजारात शादीसागा, सातवचन, वेडमीगूड यासारख्या वेबसाईटच्या स्पर्धेत आम्ही होतो. मात्र ग्राहकांना एन्ड टू एन्ड सोल्यूशन देणारी ही एकमेव वेबसाईट असल्या कारणाने अल्पावधीतच आम्हाला अनेकजणांपर्यंत पोहोचणे शक्य झाले. येत्या वर्षभरात पंधरा हजार वेंडर्स अर्थात विक्रेत्यांची नावे या वेबसाईटवर देण्याच्या आम्ही प्रयत्नात आहोत.