भारतीय वंशाच्या महिलेने लिहिला अमेरिकेतील टपाल सेवेच्या इतिहासात एक नवा अध्याय

अमेरिकेतील टपाल सेवेच्या इतिहासात पहिली महिला पोस्ट मास्तर बनण्याचा मान भारतीय वंशाच्या जगदीप ग्रेवाल यांना

0

भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक जगदीप ग्रेवाल यांना अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील साक्रामेंटो मध्ये पोस्टमास्तर पद देण्यात आले आहे. १६६ वर्षांच्या इतिहासात हे पद मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.

अमेरिकन टपालसेवे अनुसार, ग्रेवाल यांनी ३ सप्टेंबर रोजी साक्रामेंटो च्या पहिल्या महिला पोस्टमास्तर म्हणून शपथ घेतली.

अमेरिकन टपालसेवेने एका विधानात म्हंटले आहे की " साक्रामेंटो चे पहिले पोस्टमास्तर हेनरी ई. रॉबिन्सन (वर्ष १८४९) यांच्या वारसा चालवणाऱ्या जगदीप ग्रेवाल शहराला सेवा देणाऱ्या २९ व्या पोस्ट मास्तर असतील" ग्रेवाल यांनी १९८८ मध्ये एका लिपिकाच्या रुपात टपाल सेवेत काम सुरु केले होते.

जगदीप ग्रेवाल यांनी एका विधानात सांगितले की " लोकांना चांगली सेवा देणे आणि खर्च कमी ठेवणे या लक्षाला आपण एकत्रित प्रयत्नानेच गाठू शकतो"

Related Stories

Stories by Suyog Surve