गावातील महिलांना सक्षम करत आहेत दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थी  

0

येथे समस्यांची कधीच कमतरता नसते ज्यावर आपण बोलावे, तसाच एक विषय आहे महिला सक्षमीकरण आणि त्यांना समान हक्क देण्याचा. नशिबाने आपण अशा काळात राहात आहोत जेथे याबाबत काम करणारे समूह, संस्था, आणि व्यक्ति आहेत, ज्यांनी यावर केवळ जागृती केली नाहीतर स्थिती सामान्य व्हावी यासाठी प्रयत्न केले आहेत. अर्थातच अशा प्रयत्नाला अनेकदा आडकाठी येते किंवा त्रास दिला जातो पण अनेकजण त्यानंतरही बरेच अंतर पार करून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. अश्याच प्रकारची एक कहाणी आदर्श म्हणून सांगता येईल ज्या प्रकल्पाचे नाव औरिक आहे. 


Source: The Better India
Source: The Better India

प्रकल्प औरिक हा ग्रामिण महिलांना त्यांचा स्वत:चा निर्मलके तयार करण्याचा व्यवसाय करण्यास मदत करण्याचा प्रयत्न आहे. गुरगाव-फैजाबाद द्रुतगती महामार्गावरील मनगर गावात या प्रकल्पाचा सहभागिता प्रयोग वर्षभरापूर्वी सुरु करण्यात आला. या प्रकल्पामागे आहेत लेडी श्रीराम महाविद्यालय समुह इन्कॉटस. इन्कॉटस हा जागतिक स्तरावरील ना नफा विद्यार्थी उपक्रम आहे, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील लोक हे प्रभावी उपक्रम माध्यम जीवन अधिक सक्षम करण्यासाठी चालवितात.

महविद्यालयातील व्दितीय वर्षातील विद्यार्थी आणि इनॉक्टसच्या उपाध्यक्ष अमिषा पटेल, यांनी सांगितले की, “ सुकार्य या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी दत्तक घेतलेल्या मंगर या गावात आम्ही आलो. आम्ही सांडपाणी व्यवस्थापन आणि आरोग्याच्या प्रश्नांची माहिती घेतली. आणि समजले की गावातील महिला भांडी घासण्यासाठी पारंपारीक साधनेच वापरतात.”

जेंव्हा हे विद्यार्थी या छोट्या गावात आले, दरवाजे ठोठावले आणि घरातील पुरुषांना त्यांच्या बायकोची ओळख करुन देण्यास सांगितले, त्यांनी टाळाटाळ केली. गावक-यांना त्यावेळीही धक्का बसला ज्यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितले की, त्यांना महिला सक्षमीकरणासाठी त्यांच्या कार्यशाळा घ्यायच्या आहेत आणि प्रशिक्षण द्यायचे आहे. लोकांचा याबाबत प्रतिसाद कसा होता यावर बोलताना कनपुरिया रामन, प्रकल्प औरिकचे प्रमुख म्हणाले की, “ ज्यावेळी याचा आर्थिक फायदा आम्ही सांगितला, त्यांनी याबाबत तयारी दाखवली. जरी हे पुरुष मेहनतीने काही मिळवत होते तरी त्यांना यात स्वारस्य दिसले”.

अमिषा यांनी निर्मलक व्यवसायाबाबत विस्तारपूर्वक सांगितले, “ तुलनेने साबण तयार करणे सोपे आहे,एकदा आम्ही महिलांना शिकवेल की, त्यांना कोणताही अनुभव नसला तरी त्या ते करू शकतात. आम्ही त्यांना त्यासाठी कच्चा माल दिल्लीतून चांदनी चौक सारख्या भागातून आणून देतो. महिला द्रव तयार करतात, पँक करतात,लेबल करतात. त्यातुन काही बाटल्या सुकार्य मार्फत विकल्या जातात आणि बाकीच्यांच्या विक्री तसेच मार्केटिंगची जबाबदारी आम्ही घेतो” नफ्याचा काही भाग काम करणा-या महिलांना जातो किंवा त्यांच्या व्यवसायाला जातो.  आता हा प्रकल्प अधिक सक्षम करण्यासाठी काही व्यक्तीचा सहभाग घेण्याचे ठरविण्यात आले आहे. तसेच काही मोठे लहान विक्री केंद्र सुरु करण्याचा विचार केला जात आहे.

या प्रकल्पातून ग्रामिण भागातील महिलांना मुक्ति मिळत आहे, आणि त्या स्वावलंबी होत आहेत. त्याचा दृश्य परिणाम या महिलांच्या दररोजच्या राहणीमानातून दिसू लागला आहे. 

या सारख्याच आणखी काही कहाण्या तुम्हाला माहित असल्यास आम्हाला कळवा. यासाठी marathi@yourstory.com वर संपर्क साधा. 

THINK CHANGE INDIA