भारताची अव्वल टेनिसपटू शिखा ओबेराय दूरचित्रवाणीच्या कार्यक्रमातून जग जिंकताना!

भारताची अव्वल टेनिसपटू शिखा ओबेराय दूरचित्रवाणीच्या कार्यक्रमातून जग जिंकताना!

Monday November 30, 2015,

6 min Read

एकेकाळी भारताची अव्वल मानांकीत असलेली आणि जगातील १२ व्या स्थानावर असलेली प्रसिद्ध टेनिस खेळाडू शिखा ऑबेरॉय यांनी आता ३२ वर्षानंतर आपल्या टेनिस रॅकेटस् खुंटीला टांगली आहे आणि दूरचित्रवाणीनिर्मितीच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात आपले नशीब आजमावत आहेत. त्यांनी प्रिंसटन येथून दक्षिण आशियाई अध्ययनासोबतच मानव विज्ञान (एंथ्रोपोलॉजी) मध्ये उच्चपदवी घेतली, तसेच अर्थपूर्ण कार्यक्रमासाठी अंकात्मक यंत्रावर आधारित प्रबंधात A+ श्रेणी प्राप्त केली, जी त्यांच्या या नव्या इनिंगसाठी खूपच महत्वाची ठरली.

त्यांनी आपले बालपण भारत आणि अमेरिकेत व्यतित केले. चार अन्य बहिणींसोबत त्या वाढल्या तरी त्यांच्या आई - वडिलांना आपल्या घरात मुलाचा जन्म व्हावा अशी अजिबात अपेक्षा नव्हती.

image


“आज माझे वडिल आम्हाला सांगतात की, पाच मुलींनी त्यांना इतके गौरवान्वित केले आहे, जितके ५० मुले मिळूनही करू शकले नसते. आज मी जे काही आहे आणि ज्या शिखरावर आहे, ते केवळ यासाठीच कारण माझ्या वडिलांनी आमचे पालन - पोषण खूप चांगल्या प्रकारे केले आहे, इतकेच काय तर एखाद्या मुलापेक्षाही जास्त चांगल्या पद्धतीने.’’

मात्र काही कामांमध्ये स्वत:ला पारंगत करण्याची सवय त्यांना आपल्या आजीपासून मिळाली आहे, ज्यांना ती लाडाने ‘दादू’ म्हणते. त्यांनी नेहमीपासूनच या गोष्टीला महत्व दिले की, प्रत्येक मुलीने कमीतकमी एका खेळाला किंवा आपल्यातील गुणाला निवडावे आणि त्याच्यात पारंगत होण्याच्या स्तरापर्यंत पोहोचावे. असे वाटते की, शिखा आणि त्यांची बहिण नेहा टेनिससाठीच जन्माला आल्या होत्या. त्यांचे कुटुंबीय दोघींच्या या क्षमतेला पारखण्यास मागे राहिले नाहीत. त्यांनी नेहा आणि शिखा यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रिंसटनच्या थंड भागातून उष्ण भागातील फ़्लोरिडा येथे जाण्याचा निर्णय घेतला. कारण, त्यांच्या सखोल प्रशिक्षणासाठी ही जागा सर्वात अनुकूल होती. त्या सांगतात की, मी आपल्या बहिण आणि वडिलांसोबत फ्लोरिडाला आली आणि तेथे गेल्यानंतर माझे वडिल स्वयंपाकघरात आमच्यासाठी जेवण बनविण्यासोबतच आम्हाला प्रथिनांसाठी डाळ इत्यादीचे सेवन करण्यासही सांगत असे आणि त्याव्यतिरिक्त आम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाण्यापर्यंतची कामे ते करत असत. त्यांनी आम्हाला नेहमीच मुलांविरूद्ध खेळण्यासाठी आणि प्रतिस्पर्धा करताना त्यांना हरविण्यासाठी प्रोत्साहित केले.

असे असूनही, एक पैलू असाही आहे, जो वास्तवात खूप अंधकारमय देखील होता. शिखा यांना केवळ १२व्या वर्षानंतरपासूनच आपल्या आई पासून वेगळे रहावे लागले. त्या सांगतात की, काही असे त्याग असतात जे प्रत्येकाला आपल्या आयुष्यात करावे लागतात. माझ्यावर चारही बाजूने स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आणि उत्तमोत्तम कामगिरी करण्यासाठी दबाव होता. १२ वर्षाच्या मुलीसाठी हे मोठे आव्हानच होते. मातृत्वाच्या सानिध्यातून लांब राहण्याचा दुसरा अर्थ त्यांच्याजवळ असे कुणीही नव्हते, ज्यांना त्या आपल्या मनातल्या भावना हक्काने सांगू शकतील. त्यामुळेच त्या बाहेरून इतक्या मजबूत झाल्या की, त्यांनी याच भक्कमपणाला आपले शस्त्र बनविले.

image


केवळ १० वर्षांच्या असताना शिखा यांनी अमेरिकेत कनिष्ठ क्रमवारीत अव्वल स्थान पटकाविण्यात यश मिळवले. त्यांनी सलग कठोर परिश्रम घेणे सुरू ठेवले आणि लवकरच डब्ल्यूटीए दौ-यात अमेरिकेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांची निवड झाली.

त्यानंतर त्यांनी आपला पूर्ण वेळ टेनिसला देण्याचे निश्चित केले. ज्यामुळे त्यांना वर्ष २००० मध्ये १७ वर्षांच्या असताना शाळा सोडावी लागली. मात्र त्यावेळी त्यांचा हा निर्णय चुकीचा नव्हता. कारण त्यावेळी त्यांची चांगली लय(फॉर्म) होती आणि त्यांना हरविणे जवळपास अशक्यच होते. ज्यामुळे त्या दिवसेंदिवस आपल्या शिखराची पायरी चढत होत्या. शिखा यांनी आपल्या पहिल्याच वर्षात अनेक खिताब जिंकण्यास यश मिळविले आणि त्या आपल्या मातृभूमीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उत्सूक होत्या.

त्यांचे हे स्वप्न पुढीलवर्षी पूर्ण झाले, जेव्हा त्या एखाद्या ग्रॅंडस्लॅममध्ये दुस-या फेरीत पोहोचणा-या दुस-या भारतीय महिला बनण्यात यशस्वी झाल्या आणि त्यावेळी फ्लशिंग मिडोस ही स्पर्धा होती. भारतीय मिडियाने त्यांच्या या यशाचा आनंद साजरा करण्यास आणि त्यांचे कौतुक करण्यास कुठलीही कसर सोडली नाही. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, यानंतर त्या भारताचे प्रतिनिधित्व करणार का? तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्वरित या संधीचा फायदा घेतला.

आपल्या पाच वर्षाच्या कारकिर्दीदरम्यान त्यांना तीन आयटीएफ खिताब पटकाविण्यास यश मिळाले आणि बहिण नेहासोबत दुहेरीच्या दोन डब्ल्यूटीएच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करण्यात त्या यशस्वी झाल्या. मात्र एका गोष्टीने त्यांना त्यांच्या जीवनातील उद्देशाबाबत विचार करण्यास विवश केले आणि त्या या विचारात पडल्या की, टेनिसच त्यांची खरी ओळख आहे का? जी त्यांना बनवायची आहे. सुरुवातीला सरकार आणि तत्वांमध्ये झालेल्या बदलाने त्यांना भारताचे प्रतिनिधित्व करण्याची अनुमती दिली नाही. कारण, कायदेशीररित्या त्यांच्याकडे एका दुस-या देशाचे नागरिकत्व होते. थरथरणा-या आवाजात त्या सांगतात की, “येथे मुद्दा हा असला पाहिजे होता की, माझे ह्रदय आणि निष्ठा कोठे आहेत? मात्र भारत सरकार आपल्या एथलिट सोबत अशाच प्रकारचा व्यवहार करते.

image


त्यांना या आघातातून आणि नैराश्यातून निघण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला. या काळाने त्यांना डोळे बंद करून आपल्या कारकिर्दीची शाश्वती नसल्याचे दाखविले आणि सोबतच त्यांना त्यांच्यामधील काही अन्य कमतरतेचे विश्लेषण करण्याची देखील संधी दिली. मानव विज्ञानाची आकांक्षा असलेल्या आणि राजकारण विज्ञानाची शौकीन असलेल्या शिखा यांना एकाही दौ-यात त्यांच्या विचारांना मेळ खाणा-या सखी-सोबती मिळाल्या नाहीत. त्या सांगतात की, “मी टेनिस सोडून इतर कुठल्याही विषयावर बोलण्यासाठी तडफडत असे आणि या परिस्थितीमुळे माझी ही इच्छा अपूर्णच राहिली. अशातच त्यांनी त्या काळात परतण्याचा निर्णय घेतला, ज्यात त्यांनी आपले शिक्षण सोडले होते. जेणेकरून त्यांच्या जीवनाला एक नवे वळण मिळू शकेल आणि त्यासाठी त्यांना कुणीही प्रिंसटनची शिखा आंटी म्हटले तरी चालणार होते.

त्या सांगतात की, केवळ २१ वर्षांच्या युवकांमध्ये पुन्हा एकदा महाविद्यालयात शिकायला जाणे, त्यांच्यासाठी मोठ्या बहिणीची भूमिका साकारणे, महाविद्यालयातील विविध अनुभव आणि त्या पाठ्यक्रमाच्या वेगवेगळ्या विषयाने त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृ्ष्टिकोन पूर्णपणे बदलला. त्या सांगतात की, त्यावेळी मी असा विचार करायला लागले की, मी एक एथलीट बनू शकते आणि मानव वैज्ञानिक देखील बनू शकते. मी एक विद्यार्थी बनण्यासोबतच एक उद्योजिकाही बनू शकते. त्यानंतरपासूनच त्यांनी सामाजिक उद्योजकतेच्या वर्गात भाग घेण्यास सुरूवात केली आणि विकासासाठी सामाजिक उद्योजिकेच्या कल्पनेचा देखील अभ्यास केला.

“ हीच मी आहे. मी अशी आहे आणि मी हेच करू इच्छिते.”

कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर त्या भारतात परतल्या आणि यावेळी त्यांचा विचार मिडियाच्या प्रभावाचा वापर सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रात करण्याचा होता. त्या सांगतात की, “मी उच्चारण, हावभाव, मुल्य आणि सिद्धांत यांच्याशी ताळमेळ घातला. मी चपातीच्या तुकड्यांना हाताने तोडण्यास सुरुवात केली आणि चॉपस्टिक्स अमेरिकेत असणा-या जेवणासाठी सोडली. माझा सामना अद्यापही त्या संकटाशी झालेला नाही, ज्यामुळे इंडो-अमेरिकी अधिकाधिक वेळा समोरासमोर येतात. कारण मी नेहमीच संस्कृतीच्या त्या सर्व पैलूंच्या संपर्कात आली, ज्या माझ्या बालपणीच पालन-पोषणाच्यावेळी संपर्कात आल्या होत्या.

शिखा यांनी इंडिडॉटकॉम च्या भारतीय संपादनाची सहस्थापना केली, ज्यामार्फत त्यांनी अर्थपूर्ण कार्यक्रमाच्या संकल्पनेवर काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी ‘कौन बनेगा हिरो’ या शीर्षकावर आधारित वेबीसोड्सच्या एका मालिकेचा प्रारंभ केला, जी प्रकाशझोतात न आलेल्या नायकांची कथा लोकांसमोर आणते.

अर्थपूर्ण कार्यक्रमात परिवर्तनासाठी प्रेरित करण्याची खूप शक्ती असते. ती लोकांना कारवाई करण्यासाठी प्रेरित करते. माझी कंपनी कथेच्या माध्यमातून जागरुकता आणण्याचे आणि मनोरंजनाचे काम करते. लोकांनी मला एका अशा मुलीच्या रुपात पाहिले, जिने संपूर्ण जीवन केवळ टेनिस खेळले आणि अचानक ती राष्ट्रीय टिव्हीवर प्रसिद्ध होण्यासाठी प्रयत्न करायला लागली. त्यांनी माझ्या आतील सिंहिणीला अद्याप पाहिलेले नाही.

image


त्यांच्यामार्फत सुरु करण्यात आलेला कार्यक्रम एनडीटीवी प्राइम त्यांच्या आकर्षण आणि दृढसंकल्पाचा परिणाम होता. केवळ याला बघणारेच समजू शकतात की, शिखा यांनी याची निर्मिती करण्यासाठी किती मेहनत आणि खोल संशोधन केले आहे. त्यावेळी त्या या कार्यक्रमाला जगासमोर आणण्यात यशस्वी झाल्या. त्या सांगतात की, मला असे वाटले की, सर्व विखुरलेले गट माझ्यासोबत आहेत. माझ्या कुटुंबाने कधीच माझ्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव टाकला नाही. माझ्या गुंतवणूकदारांनी हे सुनिश्चित केले की, धन येत रहावे आणि माझ्या गटाने नेहमीच माझ्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मला साथ दिली आणि लवकरच एनडीटीवीने आम्हाला सहाय्य करण्याबाबत सांगितले. मी एक प्रकारे त्यांना एक रोपटे सोपविले होते आणि त्यांनी देखील माझ्या उपक्रमाला वाढविण्यासाठी कुठलीही कसर सोडली नाही.


लेखिका: बिंजल शाह

अनुवाद: किशोर आपटे.