पुण्याची जनसेवा फॉउडेंशन व सांगलीच्या माणकाबाई यादव यांना 'वयोश्रेष्ठ सन्मान'

पुण्याची जनसेवा फॉउडेंशन व सांगलीच्या माणकाबाई यादव

यांना 'वयोश्रेष्ठ सन्मान'

Monday October 03, 2016,

3 min Read

पुण्यातील ‘जनसेवा फॉउडेंशन’ यांना वरिष्ठ नागरीकांसाठी चांगल्या सेवा-सुविधा पुरविल्याबद्दल आणि सांगली जिल्ह्यांच्या माणकाबाई आकाराम यादव यांना ‘प्रतिष्ठित माता’ या पुरस्काराने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

‘प्रतिष्ठित माता’ हा पुरस्कार सांगली जिल्हयातील खानापूर तालुक्यामधील रेणावीच्या माणकाबाई आकाराम यादव यांना देण्यात आला. 1 जानेवारी 1928 ला माणकाबाई यांचा शेतकरी कुंटुबात जन्म झाला. अशिक्षित असतांना आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीचा सामना करून त्यांनी त्यांच्या मुलांना उच्च शिक्षण दिले. यावेळी पुरस्काराच्या रूपात मानचिन्ह प्रमाण पत्र आणि रोख रक्कम त्यांना देण्यात आली.

image


विज्ञान भवन येथे आंतरराष्ट्रीय वृद्ध दिवसानिमित्त केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीने ज्येष्ठ नागरीकांसाठी ‘वयोश्रेष्ठ सन्मान-2016’ या राष्ट्रीय पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत, राज्यमंत्री विजय सांपला, राज्यमंत्री क्रिष्णपाल गुर्जर सामाजिक न्याय विभागाच्या सचिव अनिता अग्निहोत्री उपस्थित होत्या. देशभरातील वरिष्ठ नागरीक, वरिष्ठ नागरीकांसाठी कार्यरत अशासकीय सहभागी झालेत. या कार्यक्रमात पुण्याच्या जनसेवा फाऊंडेशन व सांगलीच्या माणकाबाई यांना वयोश्रेष्ठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राष्ट्रपती म्हणाले, आपल्या देशाची पंरपरा ‘पितृदेवो भव’, ‘मातृदेवो भव’, ‘आचार्यदेवो भव’ अशी आहे. बालमनात वरिष्ठांचा मान-सन्मान करण्याचे संस्कार शिकविले जातात, मात्र काही वेळा वरिष्ठांची हेळसांड केली जाते. ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमुद केले.

संविधानामध्ये मार्गदर्शक तत्वाच्या कलम 41 नुसार समाजातील सर्व वर्गांना सन्मानपुर्वक जगण्याचा अधिकार आहे. या नियमाचा भंग केल्यास दंडात्मक कार्यवाही ही होते. त्यामुळे वरिष्ठ नागरिकांना आदरपुर्वक वागविणे अंत्यत गरजेचे आहे.

पुढील काही वर्षात देशातील वृद्धांच्या संख्येत मोठया प्रमाणात वाढ होणार असल्यामुळे, त्यांच्यासाठी अद्यावत तंत्रज्ञान, सोयी-सुविधा आणि या क्षेत्रात काम करणा-यांना कौशल्य पुर्ण बनविण्याच्या सूचनाही राष्ट्रपतींनी यावेळी केल्या. सामाजिक न्याय विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचे कौतूकही राष्ट्रपतींनी यावेळी केले.

image


जनसेवा फॉऊंडेशनचा राष्ट्रीय सन्मान

पुणे येथील जनसेवा फॉउडेंशन ही संस्था 15 जानेवारी 1988 ला स्थापन झाली. स्थापनेपासून आजपर्यंत या स्थंस्थेने वरीष्ठ नागरिकांसाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. संस्थेमार्फत डेयरी फार्म, किचन गार्डन, परित्यक्त्या आणि निराश्रित वृद्ध व्यक्तींसाठी निराश्रित पुनर्वसन केंद्र आणि एक ग्रामीण रूग्णालय चालविले जाते. जेथे वरिष्ठ नागरीकांना मोफत जेवन, औषधी आणि वस्त्र आदि दैंनदिन उपयोगांच्या वस्तु संस्थेमार्फत पुरविल्या जातात. रूग्णालयाच्या माध्यमातून दरवर्षी जवळपास 2000 रूग्णांवर औषधोपचार मोफत गेले केले. मागील 25 वर्षांपासून फॅाउडेंशनने 15 हजारहून अधिक वरिष्ठ नागरिकांच्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया निशूल्क केली आहे. जनसेवा फॉउडेंशन निशुल्क चिकित्सा शिबीरांचे आयोजन करते. निशुल्क ‘जबडयांचे’ वितरण करते. ऐज-फ्रेंडली या विषयांवर कार्यशाळेचे आयोजन करते. वरिष्ठ नागरिकांवर होणा-या अन्यायाच्या विरोधात आवाज उठविते तसेच या विषयांशी संबधित विविध प्रकारचे प्रकाशने प्रकाशित करते. 80 वर्षापेक्षा अधिक वय असणा-या ज्येष्ठ नागरिकांसाठी शताब्दी क्लब सुरू केले आहे. त्यांच्या या वैविध्यपुर्ण कामांसाठी त्यांना वयोश्रेष्ठ सन्मान-2016 प्रदान करण्यात आला. संस्थेचे संस्थापक डॉ.विनोद शहा आणि मीना शहा यांनी हा पुरस्कार स्वीकारला, पुरस्काराचे स्वरूप मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम अशी आहे.

सौजन्य : महान्युज

    Share on
    close