गरीब मुलांना शिक्षणासोबतच जीवनमूल्यांची शिकवण देण्याचा प्रयत्न!

गरीब मुलांना शिक्षणासोबतच जीवनमूल्यांची शिकवण देण्याचा प्रयत्न!

Tuesday November 03, 2015,

3 min Read

एखादा दिवा जसा अंधारात उजळून निघतो, ध्रुव तारा नाविकांना योग्य मार्ग दाखवतो, त्याचप्रमाणे व्यक्तीच्या जीवनात एखाद्या आदर्शवत व्यक्तीचे खूप महत्वाचे स्थान आहे. अशा व्यक्ती मन-बुध्दीवर ठसा उमटवतात आणि त्यांच्याप्रमाणेच किंवा त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात. अश्या आदर्शवत व्यक्ती कुणीही असू शकतात परंतू स्वत:चे वडीलच अशी आदर्शवत व्यक्ती असते, तेंव्हा यापेक्षा अधिक चांगले काय असू शकते? कारण आपण आपल्या वडीलांना सर्वात जवळून पाहिलेले आणि समजलेले असते.

मयंक सोलंकी

मयंक सोलंकी


मयंक सोलंकी यांनी केवळ वयाच्या चोवीसाव्या वर्षी दोन प्रकल्प ‘युवा इग्नाइटिड माइंड्स’ आणि ‘वेल इड’ वर काम सुरू केले. आज आपल्या यशाचे सारे श्रेय ते वडीलांना देतात. मयंक यांचे वडील डॉक्टर नरपत सोलंकी यांनी आपले सारे जीवन गरीब आणि अनाथांच्या नावे केले आहे. त्यांनी तेरा लाखपेक्षा जास्त जणांची मोफत चिकित्सा केली, तसेच एक लाख बेचाळिस हजार जणांची डोळ्यांची मोफत शस्त्रक्रिया केली आहे. हे सारे लोक गरीब होते, ज्यांना शुल्क परवडणारे नव्हते. डॉ. नरपत यांच्याकडे जे कुणी आले त्यांच्यावर त्यांनी उपचार केले. आणि हीच गोष्ट त्यांनी आपल्या मुलाला समजावून दिली की, लोकांना मदत करावी आणि पैश्यापलिकडे जाऊन काम कसे करावे? गरीबांना मदत करणे हाच आपला ध्यास असला पाहिजे. मयंक यांनी देखील या गोष्टीची खूणगाठ बांधली आणि सुमारे वर्षभर त्यांच्यासोबत काम केले, मात्र मयंक यांना आणखी काहीतरी करायचे होते. आणि मग त्यांनी सुरूवात केली ‘युवा इग्नामाइंडस्’ची. त्यांचा मुख्य उद्देश होता तरुणांना शक्ती प्रदान करणे आणि आत्मनिर्भर बनविणे.

‘युवा इग्नामाइंडस्’ ला चांगले काम करण्यासाठी अनेक संस्थांनी पुरस्कृत केले आहे. परंतू मयंक यांना अजूनही काही उणिवा जाणवल्या. त्यामुळे त्यांनी शोध घेतला, आणि लवकरच दुस-या प्रकल्पाची सुरूवात केली त्याचे नाव होते ‘वेल- एड इनीशिएटिव’.

संशोधनादरम्यान मयंक अनेक पालकांना भेटले, विद्यार्थ्यांशी चर्चा केली; आणि त्यांच्या असे लक्षात आले की, आई-वडील मुलांना अधिक वेळ देऊ शकत नाहीत त्यामुळे मुलांना नैतिकमूल्य शिक्षणाला वंचित राहावे लागत आहे. याशिवाय मुले वाईट संगतीत गेल्याने वाईट गोष्टी नकळत शिकत आहेत. वेल-एड चा उद्देश मुलांना आवश्यक शिक्षण देणे हा होता, जे ब-याच शाळांमधून दिले जात नाही. शाळेत पुस्तकी ज्ञान तर दिले जाते परंतू नीतिमत्ता, नैतिक मुल्यांचे शिक्षण मात्र दिले जात नाही. त्यामुळे तेथील ज्ञान केवळ पुस्तकी प्रकारचे ठरते व्यावहारिक ठरत नाही. अश्यात आवश्यक ठरते की, मुलांना पुस्तकी ज्ञानाशिवाय नैतिक मूल्यांचे शिक्षणदेखील मिळावे, त्यामुळे समाजाचे आणि देशाचे भले व्हावे.

वेल-एड

वेल-एड


मयंक यांनी एक असा अभ्यासक्रम निर्माण केला जो मजेदार होता आणि त्याचे परिक्षण त्यांनी वेगवेगळ्या तज्ञ आणि मानसोपचार तज्ञांकडून करून घेतले. मुलांनी देखील त्यातून खूप आनंद मिळवला. एका कार्यक्रमात त्यांनी एका सैन्याधिका-याला, पोलिस अधिका-याला आणि वैज्ञानिकाला निमंत्रित केले. सैन्याधिका-यांनी मुलांना यु्ध्दात कसे संयमाने काम केले जाते त्याबाबत, पोलीस अधिका-याने मुलांना समाजात वाढलेल्या भ्रष्टाचाराशी कसे लढायचे ते सांगितले. वैज्ञानिकाने सांगितले की, छोट्या-छोट्या गोष्टीतून कसे संशोधन करण्यात आले? या सा-या गोष्टी बहुतांश शाळांच्या पाठ्यक्रमात नसतात. पण या प्रकारचे ज्ञान मुलांना जास्त उपयोगी असते. मयंक यांनी याप्रकारच्या शिक्षणावर जोर दिला आहे. जे केवळ पुस्तकी नसून व्यावहारिक देखील आहे.