ऑनलाईन भेटवस्तू देण्याचा सोपा मार्ग ‘गिफ्टेरी’

ऑनलाईन भेटवस्तू देण्याचा सोपा मार्ग ‘गिफ्टेरी’

Wednesday October 28, 2015,

3 min Read


स्टार्ट अपच्या जगात पहिल्यांदाच पाऊल ठेवणारे पारीख यांनी मुंबईच्या व्हीजेटीआयमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर म्हणून पदवी घेतली. तसेच त्यांनी दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातून इलेक्ट्रीकल इंजिनीअरिंग विषयात एमएसही केलंय. काही दिवस नोकरी केल्यानंतर त्यांनी ‘इनसीड’ या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण संस्थेमधून एमबीए करण्याचा निर्णय घेतला. स्टार्टअपच्या जगात प्रवेश केल्यानंतर त्यांनी सहसंस्थापक भविन बधेका यांच्यासोबत इन्स्टंट पॉडकास्ट टूल’ ऑरॅलिटी’ (विशिष्ट प्रकारचे डिजिटल माध्यम) ची निर्मिती केली. सुरूवातीला त्यांना खूप चांगला प्रतिसादही मिळाला. एवढंच नाहीतर ब्लूम व्हेंचर्स, श्रीजन कॅपिटल, गूगलचे राजन आनंदन यांच्यासह अनेकांनी यात गुंतवणूक केली.

टीमने अनेक आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये सादरीकरण केलं आणि सुरूवातीच्या काळातच त्यांचा विकास झाला आणि स्थैर्यही लाभलं. पण वर्षभरानंतर नोव्हेंबर २०१२ मध्ये त्यांना आपलं हे उत्पादन बंद करावं लागंल. टीमनं थोडा ब्रेक घेऊन आपल्या व्यूहरचनेवर पुन्हा विचार करण्याचा निर्णय घेतला. हळूहळू सह संस्थापक वेगळे झाले आणि ऑरॅलिटीची जबाबदारी जान्हवीनं स्वत:च्या खांद्यावर घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जान्हवीने सोशल गिफ्टिंगवर आपले लक्ष केंद्रित केले आणि यातूनच ‘गिफ्टेरी’ची सुरूवात झाली.

गिफ्टेरीची सुरुवात सोशल गिफ्टिंगच्या संकल्पनेतून झाली. यात वेबसाईटवर येणारे यूजर्स गिफ्टेरीचे भागीदार असलेल्या ब्रँड्सचे व्हाउचर्स आपल्या प्रियजनांना पाठवू शकतात. गिफ्टेरी वेबसाईटवर लोकांना गिफ्टेरी व्हाउचर्स मिळतात. ही व्हाउचर्स वेगवेगळ्या रकमांची असतात आणि ते घेणारे त्यांच्या मर्जीनुसार त्याचा वापर करु शकतात. व्हाउचर्स देणारे त्यांना हवं तर व्हाउचर्सला वैयक्तिक टच देऊ शकतात पण ते खर्च करण्याचा अधिकार फक्त ज्यांना ते व्हाउचर्स दिले जातात त्यांनाच असतो.

ऑनलाईन भेटवस्तू देण्याच्या या क्षेत्रात जान्हवीने वैयक्तिक कारणामुळे प्रवेश केला. “ आधी कोणाला भेटवस्तू द्यायची असेल तर काय द्यायचं हा प्रश्न पडायचा. मला वाटतं भेट म्हणून व्हाऊचर्स देणं हा खूप सोपा पर्याय आहे,” असं जान्हवी सांगतात. कोणाला भेटवस्तू द्यायच्या ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब असल्याचं काही महिन्यांनंतर त्यांच्या लक्षात आलं, उदा. एखाद्या लहान मुलाला मदर्स डेनिमित्त आपल्या आईला काही भेट द्यायची असेल तर ती काय द्यायची याचा अनुभव आमच्या गाठीशी आहे, असं जान्हवी सांगतात.

टश्की आणि पॉशवाईनसारख्या गिफ्टिंग स्टार्टप्सनाही हे लागू होतं. अनुभवातूनच सारं काही शिकता येतं. गिफ्टेरी दर महिन्याला चांगली प्रगती करत असल्याचा दावा जान्हवी करतात.


image


जान्हवीच्या मते भेटवस्तूंचे जग दोन प्रकारचे असते.

१. औपचारिक भटेवस्तू – कार्पोरेट क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू आणि असे काही मित्र आणि नातेवाईक जे आपल्या खूप जवळचे नाहीत. याप्रकारच्या औपचारिक भेटवस्तूंसाठी आता व्हाउचर्स किंवा गिफ्टेरीमार्फत दिल्या जाणाऱ्या खुल्या व्हाउचर्सची विक्री वाढलीये, कारण ही भेट देणाऱ्यालाही खूप सोपी आहे तर ज्याला ती मिळणार आहे त्याला हवी ती वस्तू खरेदी करता येते.

२. वैयक्तिक भेटवस्तू – वैयक्तिक भेटवस्तू निवडण्यासाठी देण्याऱ्याला खूप कष्ट घ्यावे लागतात. तसेच लग्न, बाळाचा जन्म आणि अशा काही खास प्रसंगी वैयक्तिक भेटवस्तू देण्याची गरज भासते. आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तींना आणि मित्रांना या भेटवस्तू दिल्या जातात. यात लोक खूप खास किंवा खूप महाग भेटवस्तूंना प्राधान्य देतात.

या क्षेत्रात गिवटर, गिफ्टीज या इतर वेबसाईट्स आहेत. या क्षेत्रात खूप लोक असले तरी अजूनही या क्षेत्रात बरंच काही करण्याची आवश्यकता आहे. गिवटरने खेळाचं साहित्य विक्री करण्यापासून सुरूवात केली होती पण नंतर ते रोपोसो या शिफारस करणाऱ्या कंपनीशी जोडले गेले.

या क्षेत्राबद्दल जान्हवी यांना खूप आशा आहे. आज आजी-आजोबा आपल्या नातवांसाठी ऑनलाईन भेटवस्तू खरेदी करायला लागलेत हे पाहून उत्साह आणखी वाढल्याचं त्या सांगतात. तसंच लोक आता ऑनलाईन खरेदीला पसंती द्यायला लागल्याचे हे पुरावे असल्याचं त्या नमूद करतात.

गिफ्टेरीची मुंबईबाहेर चार जणांची एक टीम आहे जी या कामाचा वेगानं विस्तार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. गुंतवणूकदार अजूनही गिफ्टेरीसोबत आहेत आणि त्यांचं समर्थन करत आहेत. “ जेव्हा तुम्ही चांगल्या संस्थापकांचं समर्थन करता तेव्हा तो वेगानं काम करतो आणि आपला व्यवसाय कसा विस्तारेल याचे पर्याय शोधत असतो,” असं राजन आनंदन सांगतात.