संदेश राजू यांनी बंगळुरूच्या श्रमिक पशूंच्या सुटकेसाठी आपली कॉर्पोरेट नोकरी सोडली!

1

संदेश राजू यांचे जीवनात एकमेव ध्येय आहे, प्राण्यांची सुटका. जरी यासाठी अनेक जण काम करत असले तरी त्यांना इतर कुणापेक्षा या ध्येय़ाची जाणिव अधिक आहे. ज्यावेळी ते जनावरांच्या डोळ्यात पाहतात आणि त्याला कोणतीही भिती आणि दु:ख नसल्याची खात्री करून घेतात.


बंगळुरू निवासी संदेश यांचे जनावरांवर नेहमीच प्रेम राहिले आहे. आणि त्यांना मदत करून त्यांची सुटका करण्याचे काम १९व्या वर्षापासून त्यांनी हाती घेतले. त्यांनी ब्ल्यू क्रॉस मध्ये सचीव म्हणून काम केले ज्या वेळी ते हैद्राबाद मधून फ्रेंचमध्ये मास्टर्स करत होते. त्यानंतर बंगळूरूत येवून एका कॉर्पोरेट संस्थेत त्यांनी काम सुरू केले. त्यानंतर काही काळाने त्यांना वाटले की हीच वेळ आहे की नोकरी सोडावी आणि त्यानी संभव नावाची सेवाभावी संस्था सुरू केली. याबाबत बोलताना ते म्हणाले की, “ मला वाटले की बंगळुरूमध्ये श्वानप्रेमी मंडळी खूप आहेत, आणि या पलिकडे जावून  काम करणा-या प्राण्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे. त्यांच्यासाठी शहरात कोणतीच संस्था नाही जी त्यांच्या कल्याणासाठी काम करत असेल. त्यामुळे मी माझ्या तीन मित्रांना सोबत घेत संभव ची स्थापना केली.”

सन २०१०मध्ये त्यांनी त्यांची नोकरी सोडली आणि सारी जमापूंजी या सेवाभावी कार्यात लावली. हे सारे त्यावेळी झाले ज्यावेळी त्यांनी स्वत:च्या पहिल्या ‘रूग्णाची’ सुटका केली, ज्याला इलेक्ट्रोक्यूटेड (वीजेचे धक्के देण्यात)  आले होते आणि जो मृत्यूच्या दारात होता. सुरूवातीच्या दोन वर्षात त्यांना दारोदार जावून लोकांमध्ये जागृती निर्माण करावी लागली की या प्राण्याची काळजी कशी घेतली पाहिजे.  त्यावेळी त्यांनी ५३ मोकाट प्राण्यांची सुटका केली. त्यांच्या मते ते म्हणाले की, “ आम्हाला वाटले की दोन वर्षानी काहीच काम नसेल, कारण या मालक आणि काळजीवाहकाना जागृत केले आहे की प्राण्याची काळजी नीट कशी घ्यावी. मात्र त्यात आम्ही पूर्ण यशस्वी झालो नाही. मला सांगण्यात आले की आमचे केवळ सात आठ टक्के प्रयत्न यशस्वी झाले.”


संदेश यांना केवळ या गोष्टीची काळजी असते की जनावरांना त्यांची काळजी घेण्यासाठी आत घेतले की झाले, असे नाही तर त्यांना मदत करताना पूर्णत: सुटका केली पाहिजे  जेणेकरून ते नंतरही निरोगी जगले पाहिजेत. संदेश याच्या अनुभवानुसार बंगळुरूचे नागरिक इतर शहरातील लोकांच्या तुलनेत दयाळू आहेत, सध्या संभवचे चार निवारे आहेत. त्यातील महत्वाचे पॅलेस ग्राऊंड भागात आहे.

या प्राण्याच्या खर्चासाठी निधी जमा करणे हे सर्वात कठीण काम आहे मात्र संदेश आणि त्यांच्या सेवाभावी संस्थेला ते मदत करू शकतील इतके पैसे सप्टेंबर २०१६ पासून मिळाले नाहीत. संदेश यांचा हा प्रयत्न आहे की त्यांनी काळजी घेतलेली जनावरे आणि इतर जनावरे त्यांच्या वाढत्या वयात पुन्हा आजारी होवू नयेत. त्यामुळे ते उद्याची चिंता करण्यावर भर देतात आणि प्राण्यांना सेवानिवृत्तींनतर चांगले जीवन मिळावे असा त्यांचा प्रयत्न आहे.