घरी बसल्या आपल्या मुलांना द्या खेळणी आणि पुस्तके, ‘ friendlytoyz’ देते भाड्याने!

घरी बसल्या आपल्या मुलांना द्या खेळणी आणि पुस्तके, ‘ friendlytoyz’ देते भाड्याने!

Saturday January 02, 2016,

5 min Read

नेहा भटनागर आणि रितिका गुप्ता यांनी वर्ष २०१२मध्ये दिल्ली जवळील फरीदाबाद मध्ये मुलांना त्यांच्या वयानुसार खेळणी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने आपल्या प्रकारच्या पहिल्या भाडेतत्वावर खेळणी उपलब्ध करणा-या ‘friendlytoyz.com’ची स्थापना केली आणि आज त्यांचा हा व्यवसाय दिल्ली आणि एनसीआर व्यतिरिक्त हैदराबाद आणि कोलकत्याच्या मुलांना देखील खेळणी खेळण्यासाठी उपलब्ध करून देत आहे.

नेहा सांगतात की,“आजच्या धावपळीच्या दिवसभरातील कामात अधिकाधिक पालकांकडे आपल्या मुलांसाठी खेळणी विकत घेण्यासाठी देखील वेळ नसतो. त्याव्यतिरिक्त बाजारात इतक्या प्रकारची खेळणी उपलब्ध आहेत की, त्यातून आपल्या मुलांसाठी उपयोगी खेळणी निवडणे देखील खूप मोठे काम असते. अशातच आम्ही पालकांच्या या अनुभवाला सहज बनवून त्यांचा भार कमी करण्याचा आणि मुलांना अशी खेळणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत, ज्याच्या मदतीने ते खेळातून काही शिकू देखील शकतील. फरीदाबादमध्ये याची स्थापना करण्यात आली आहे.”

image


सुरुवातीस केवळ फरीदाबादमध्ये एका स्थानिक सेवेच्या रुपात स्थापित झालेला हा मंच खूपच कमी वेळेत दिल्ली आणि सर्व एनसीआर क्षेत्रात पालक आणि मुलांमध्ये आपली वेगळी ओळख बनविण्यात यशस्वी झाला आहे. ‘युअर स्टोरी’ सोबत झालेल्या संवादात नेहा सांगतात की, “अधिकाधिक मुलांसोबत असे होते की, त्यांच्याकडे जी खेळणी असतात, त्यातून त्यांचे मन लवकर भरते आणि त्यांना खेळण्यासाठी नव्या खेळण्याची आवश्यकता असते. बाजारात मिळणारी अधिकाधिक खेळणी इतकी महाग असतात की, कित्येक पालकांना ती विकत घेणेदेखील परवडणारे नसते. त्यामुळे आम्ही दोघींनी असा विचार केला की, एक असा मंच उपलब्ध करावा, जेथे मुलांना खेळणी भाड्यावर खेळण्यासाठी दिली जातील आणि ज्यामुळे मुलांच्या आई-वडिलांना देखील त्रास होणार नाही. अशाच प्रकारे वर्ष २०१२मध्ये ‘friendlytoyz’ची स्थापना फरीदाबादमध्ये झाली.” सध्या हा मंच दिल्ली आणि संपूर्ण एनसीआरमध्ये आपल्या सेवा दिल्यानंतर हैदराबादमध्ये देखील आपली एक फ्रेंचायजी उघडण्यात यशस्वी झाला आणि कोलकत्यात देखील त्यांनी एका वाचनालयाची स्थापना केली आहे.

image


मुलांना खेळण्यासाठी खेळणी उपलब्ध करणा-या या व्यवसायात सध्या आपल्या ग्राहकांना चार प्रकारची सेवा उपलब्ध करून देतात, ज्यात वाचनालय, रिटर्न गिफ्ट, मुलांसाठी विशेष वॉलपेपर्स आणि विभिन्न प्रकारच्या कार्यशाळा सामील आहेत. नेहा सांगतात की, “आमची पहिली सेवा वाचनालयाची आहे, ज्यात आम्ही मुलांसाठी खेळणी आणि पुस्तके उपलब्ध करून देतो. या सेवेच्या माध्यमातून पालक आपल्या मुलांसाठी खेळणी किंवा पुस्तके तसेच दोन्हीही भाड्यावर मागवू शकतात. आमची दुसरी सेवा रिटर्न गिफ्टची आहे, ज्यात आम्ही मुलांना वाढदिवसाला येणा-या पाहुण्यांना जाताना दिल्या जाणा-या भेटवस्तू देतो. भेटवस्तू निवडताना आम्ही या गोष्टीकडे देखील लक्ष देतो की, ते मुख्यत: भारतीय स्टार्टअप्समार्फत तयार करण्यातच आलेले असतील. त्याव्यतिरिक्त आमचा पूर्ण प्रयत्न असतो की, आम्ही घरी राहून खेळणे तयार करणा-या महिलांकडूनच खेळणी इत्यादी निवडतो.” या प्रकारे हे महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी देखील स्वतः कडून मदत करण्याचा प्रयत्न करतात.

image


त्याव्यतिरिक्त हे मुलांसाठी विशेषरित्या तयार करण्यात आलेले वॉलपेपर्स देखील उपलब्ध करत आहेत. याबाबत पुढील माहिती देताना नेहा सांगतात की, “आम्ही पालकांना त्यांच्या मुलांच्या आवडीचे कार्टून इत्यादीचे वॉलपेपर्स देखील उपलब्ध करतो. त्यांच्याबाबत सर्वात महत्वाची बाब ही आहे की, आमचे हे वॉलपेपर्स इको-फ्रेंडली होण्या व्यतिरिक्त पर्यावरण अनुकूल आहेत आणि त्यांना विशेष पद्धतीने आयात करत आहोत. त्याव्यतिरिक्त आम्ही मुलांसाठी विभिन्न प्रकारच्या कार्यशाळांचे देखील आयोजन देखील करत असतो, जेथे मुले कला आणि हस्तकलेशिवाय सर्जनशील लेखन इत्यादी शिकण्यात यशस्वी होतात.”

आपल्या सेवेच्या बळावर त्यांनी वर्ष २०१४मध्ये आपले सर्वात मोठी प्रतिस्पर्धी गुडगावची कंपनी ‘टॉयपिडिया’ ताब्यात घेण्यात यश प्राप्त केले आणि हे खेळण्यांचा संग्रह आणि ग्राहकांच्या संख्येच्या आधारावर दिल्ली-एनसीआरच्या सर्वात मोठे खेळाडू बनण्यात यशस्वी झाले. त्यानंतर हे गुडगावचे एक खेळण्यांचे वाचनालय ‘खेळणी’ ला ताब्यात घेण्यात यशस्वी झाले.

आपल्या मुलांसाठी खेळणी भाड्यावर घेण्यासाठी इच्छुक असलेले पालक त्यांच्या संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी करू शकतात आणि त्यानंतर एक निर्धारित रक्कम देऊन या सेवांचा उपयोग घेणे सुरु करू शकतात. नेहा पुढे सांगतात की, “ कुणीही पालक आमच्या संकेतस्थळावर आपली नोंदणी करून आमची खेळणी आणि पुस्तके भाड्यावर घेऊ शकतात. आमची सेवा ६०० रुपये प्रतिमहिन्याने प्रारंभ होते, ज्यात ग्राहकाला एका महिन्यात चार वेळा प्रती आठवडा १ खेळणे उपलब्ध केले जाते. त्याव्यतिरिक्त आमच्या सेवांचे अजून अनेक वर्ग आहेत, ज्याचा उपयोग पालक सहजरीत्या करू शकतात.”

नेहा पुढे सांगतात की, “ आमच्या सेवेची सर्वात मोठी विशेषता ही आहे की, आमचे ग्राहक घरी बसून खेळणी आणि पुस्तकांच्या संग्रहातून आपल्या आवडीच्या वस्तूंना निवडतात आणि आमचे कर्मचारी त्यांच्या आवडीच्या वस्तू घरापर्यंत मोफतमध्ये पोहोचवतात. या प्रकारे पालकांचा बहुमुल्य वेळ वाचतो आणि त्यांना घरी बसल्या बसल्याच आपल्या मुलांसाठी खेळणी मिळतात. त्या व्यतिरिक्त आम्ही प्रत्येक खेळण्यासोबत त्याच्या उपयोगाशी संबंधित एक विस्तृत माहिती पुस्तिका उपलब्ध करून देतो, ज्यात त्या खेळण्याबाबत अनेक माहिती असते आणि सोबतच पालक सहजरीत्या हे जाणू शकतील की, ते खेळणे त्यांच्या मुलांसाठी कसे उपयोगी सिद्ध होऊ शकतात. सोबतच आमची प्रत्येक उत्पादित वस्तू एका स्वच्छ आवरणात असते. जेणेकरून खेळणे आपल्या मुलांपर्यंत खूपच सुरक्षित आणि आरोग्यदायी अवस्थेत पोहोचू शकेल.” त्यांचे म्हणणे आहे की, या लोकांचा पूर्ण प्रयत्न असतो की, पालकांना त्यांच्याकडून खर्च करण्यात आलेल्या पैशांचे पूर्ण मुल्य मिळावे आणि खेळणे भाड्यावर घेण्याचा त्यांचा हा अनुभव अविस्मरणीय बनवा.

image


विस्तार वाढवताना त्यांनी नुकतेच कोलकत्यात आपल्या वाचनालयाची स्थापना केली आहे आणि फ्रेंचायजी देताना मॉमप्रेनर्स बनविण्यासाठी देशभरातील अनेक मातांसोबत वार्ता करणे सुरु आहे.

नेहा सांगतात की, “आमचे उद्दिष्ट महिलांना आत्मनिर्भर करण्याचे आहे आणि त्यासाठी आमचा प्रयत्न आहे की, देशातील विभिन्न भागात राहणा-या महिला आमच्यासोबत सामील व्हाव्यात आणि व्यवसायाच्या क्षेत्रात याव्यात. आम्ही ऑगस्ट महिन्यात हैदराबाद मध्ये आपल्या पहिल्या फ्रेंचायजीचे संचालन प्रारंभ केले आहे आणि आम्ही देशभरातील वेगवेगळ्या भागात विस्तार करण्याच्या विचारात आहोत.”

अखेर आत्मविश्वासाने व्दिगुणीत झालेल्या नेहा सांगतात की, “ आमचे उद्दिष्ट एका अशा कंपनीची निर्मिती करण्याचे आहे, जी मुलांसाठी सर्वात चांगल्या खेळणी आणि सेवेला एकच मंच उपलब्ध करून देऊ शकेल आणि सोबतच पालकांचा वेळ वाचविण्यासोबतच त्यांच्या पैशांचे संपूर्ण मुल्य देखील त्यांना मिळेल. त्याव्यतिरिक्त आमचा विचार आहे की, या कंपनीच्या संचालनाची पूर्ण जबाबदारी पूर्णपणे आईच्या हातून व्हावी, कारण मुलांना आईपेक्षा चांगले कुणीही जाणू शकत नाही.

लेखक : निशांत गोयल

अनुवाद : किशोर आपटे.