इस्लामिक कायदेतज्ज्ञ आणि विद्वानांचा विरोध पत्कारत राजस्थानातील दोन मुसलमान महिला बनल्या काजी

इस्लामिक कायदेतज्ज्ञ आणि विद्वानांचा विरोध पत्कारत  राजस्थानातील दोन मुसलमान महिला बनल्या काजी

Sunday February 21, 2016,

3 min Read

पुरुषी वर्चस्व असलेल्या क्षेत्रात महिलांनीही आपले कर्तृत्व वारंवार सिद्ध केले आहे. हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही, मात्र राजस्थान येथील दोन मुसलमान महिलांनी आपली कारकीर्द घडविण्यास असे क्षेत्र निवडले आहे जिथे आजवर राजस्थानातील एकाही मुसलमान महिलेने धाडस केले नाही.  जयपूरच्या चारदरवाजा मधील जहांआरा व बास बदनपुरा मधील अफरोज बेगम या जयपूरच्या पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या. त्यांनी मुंबईच्या दारूल उलेम निस्वान येथून दोन वर्षाचे प्रशिक्षण घेतले. मध्यमवर्गीय कुटुंबातील या दोन स्त्रियांच्या या निर्णयाने मुसलमान समाजातील काझी अर्थात न्यायाधीश, इस्लामिक कायदेतज्ञ व विद्वान मंडळींचे  डोळे मात्र विस्फारले.

image


संगणकावर आपले सगळे व्यवहार ऑनलाईन करणाऱ्या चार मुलांची आई जहांआरा यांचे लग्न वयाच्या १४ व्या वर्षी झाले. नवरा दिवस रात्र मारायचा. कंटाळून एक दिवस जहांआरा यांनी एका एनजीओशी संपर्क साधला. सामजिक संस्थानांमध्ये कामाच्या दरम्यान त्यांना कळले की लग्न करण्यापासून ते घटस्फोट आणि पोटगी मिळून देण्याबाबत स्त्रियांना समान अधिकार आहे. त्यानंतर त्या ऑल इंडिया मुस्लिम आंदोलनाशी संपर्कात आल्या. जिथे त्यांना महिला काझी प्रशिक्षणाबाबत कळले व त्यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. कारण फक्त एकच होते की जे त्यांच्या बाबतीत घडले तोच त्रास इतर स्त्रियांना होऊ नये. जहांआरा म्हणतात की,’’आम्ही अश्या स्त्रियांची मदत करणार आहोत ज्या तीन वेळा ‘तलाक’ म्हणण्याच्या या नियमांना बळी पडल्या आहेत. तसेच कुराणाच्या नावाचा दुरुपयोग करून स्त्रियांना नरकयातना भोगायला लावणाऱ्या काझींपासून त्यांना संरक्षण द्यायचे आहे. अशा स्त्रियांच्या मदतीसाठीच आम्ही प्रशिक्षण घेतले, कारण आज वर्तमानात काझी आपली जबाबदारी टाळत आहेत’’.

तीन मुलांच्या आईने जेव्हा काझी बनण्याचा निर्णय घेतला तेव्हा घरातील सगळ्यांनी त्यांना सहकार्य केले.

दहावी पास अफरोज यांना पाच मुलं आहेत. अफरोज यांना एका एनजीओ कडून कळले की स्त्रिया पण काझी बनू शकतात. त्यांनी पण संमती दर्शवली. कारण याने कुटुंबाला हातभरच लागेल व अन्य काझींप्रमाणे मिळकतही होईल. हे लोक विश्वासाने सांगतात की त्यांच्याकडे लग्नाला मान्यता देणाऱ्या प्रमाणपत्राची पदवी आहे व त्यांनी केलेले लग्न व घटस्फोट योग्य आहे.

image



अफरोज बेगम सांगतात की,’’ज्या महिला काझी लग्न लावतील त्यांच्या दृष्टीने स्त्री व पुरुष समान असतील कुणावरही अन्याय होणार नाही’’.

मुंबई स्थित दारूल उलेम निस्वान सध्या देशभरात पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, बिहार, उत्तरप्रदेश तसेच राज्यस्थान मधील स्त्रियांना काझी बनण्याचे प्रशिक्षण देत आहे. यांच्या प्रशिक्षणाचा पूर्ण खर्च ‘ऑल इंडिया महिला आंदोलना’ने निश्चित केला आहे. यातील दोघींनी राज्यस्थानमध्ये काझीच्या कामाला सुरवात केली आहे.

या दोघींनी युवर स्टोरीला सांगितले की,’’आम्ही केलेल्या या प्रारंभाने पुरुष प्रधान मुसलमान समाज हा नक्कीच विरोध करणार, पण आम्ही त्यांच्याशी संघर्ष न करता सगळ्यांना जोडीने घेऊन बदल घडून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. विरोध करणाऱ्यांनी सांगावे की कुराणात कुठे उल्लेख केला आहे की स्त्रियांना काझी बनण्याचा हक्क नाही’’.

image



काझी जहांआरा सांगतात की, पुरुष प्रधान समाजात महिलांकडून केलेल्या परिवर्तनावर नक्कीच गोंधळ निर्माण होईल मात्र आम्ही गोंधळ निर्माण करण्यासाठी नाही तर सगळ्यांना समान न्याय देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. इकडे या दोन स्त्रियांच्या काझी बनण्यामुळे शहरातील इस्लामिक कायदेतज्ज्ञ भडकले आहे. ऑल इंडिया दारूल कजातचे अध्यक्ष व प्रमुख काझी खालिद उस्मानीने स्पष्ट केले आहे की समाजात स्त्रियांना धार्मिक कामाची परवानगी नाही तसेच त्यांना काझीच्या पदावर स्वीकारले जाणार नाही, परंतु मुस्लीम महिला आंदोलनाशी जोडलेल्या महिला संघटनांनी काझी बनलेल्या दोन स्त्रियांच्या रक्षणाची जबाबदारी घेतली व लग्न जुळवण्यासाठी त्यांच्या मदतीचा निर्णय घेतला आहे.

सामाजिक कार्यकर्ता निशांत हुसैन यांनी प्रश्न केला की कुरणात न्याय व्यवस्थेत महिला असू नये असे कुठेही नमूद केलेले नाही किवा बंधनं घातलेली नाहीत, राज्यस्थानात मुस्लीम स्त्रियांमध्ये बदलाचे चिन्ह स्पष्ट आहे. प्रथमच राज्यस्थानात मदरसा बोर्डची अध्यक्ष मेहरुन्निसा टांक यांची नियुक्ती झाली आहे व सरकारने पण वक्फ बोर्ड मध्ये पहिल्यांदाच दोन स्त्रियांसाठी जागा आरक्षित करून त्यांना नियुक्त केले आहे.       

आणखी काही संघर्ष कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा खालील संघर्ष कथा :

धर्मापलीकडे जाऊन मुलांच्या शिक्षणाकरिता झटणारी ʻदिपालयʼ

कोण म्हणतं अनेक महिला एकत्र येऊ शकत नाही?

कारागृहातील वेदनांनी घडविली त्यांच्यातील शेकडो अनाथांची माय, संदिप कौर यांच्या जीवनसंघर्षाची कहाणी!



लेखिका : रिम्पी कुमारी

अनुवाद : किरण ठाकरे