उडिशाच्या या चौदा वर्षांच्या कन्येने इंधन विरहित बाईकचा शोध लावला आहे!

0

कार्बन डायोक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईडच्या हवेतील वाढत्या प्रदुषणाने भारतामधील मोठ्या शहरातील हवेत प्रदुषित घटकांचे प्रमाण वाढत आहे.  उडिशामध्ये १४ वर्षांच्या कन्या तेजस्विनी प्रियदर्शनी यांनी हवेवर चालणारी बाईक शोधून काढली आहे, जी ६०किमी प्रति तास वेगाने धावू शकते.


दहा किलो वजनाच्या कॉम्प्रेस्ड सिलींडरच्या मदतीने पेडल नसलेल्या या बाईकवरुन त्या फेरफटका मारून दाखवतात. तेजस्विनी हिला ही संकल्पना सायकल दुरुस्तीच्या दुकानात गेल्यावर सुचली. निरिक्षण करताना तेथील मेकॅनिक कसे एअर गनचा वापर करत टायरमधील पंक्चर काढतात हे तिने वारंवार पाहिले आणि त्याचाच वापर करत एअर गनच्या दबावावर चालणारी बाईक तयार केली. या बाबत बोलताना ती म्हणाल्या की, “ मला वाटले की एअर गनच्या माध्यमातून हे होवू शकते. मी सायकल देखील चालविली. मी माझी कल्पना माझ्या वडिलांना सांगितली, ज्यांनी मला त्यासाठी मदत केली आणि साहित्यासोबत प्रात्यक्षिक करताना बाहेर सोबत येवून प्रोत्साहनही दिले.”

हा प्रयोग यशस्वी होण्यापूर्वी खूप दिवस आधी तिने साधनांच्या आभावे देखील मेहनत घेतली. ज्यावेळी तिने सायकल काही किलोमिटर चालवून दाखविली,तिला जाणवले की तिच्या प्रयोगाला अखेर यश आले आहे. तिच्या वडिलांनी तिला या प्रयोगा दरम्यान नेहमीच प्रोत्साहन दिले. त्यासाठी त्यांनी एअर टँकही विकत घेतला जेणे करून हवा भरता यावी. टँक बटनाच्या सहाय्याने मोजपट्टीका आणि सेफ्टीवॉल्वसह बसविण्यात आला. सेफ्टी वॉल्वच्या मदतीने टँकमध्ये नको असलेल्या हवेचा दाब कमी करता येतो. बटन सुरु करताच सिलींडरमधून हवा एअर गनच्या मदतीने पायडल जवळ सोडली जाते. पायडल गिअरना फिरवतो जे सहा वेगवगेळ्या पात्यांसोबत बसविण्यात आले आहेत. या सा-या तंत्रातून सायकल चालू लागते.तेजस्विनी हिचे वडील नटवर गोच्चायत म्हणाले की, “ दहा किलो हवेवर सायकल साठ किमी चालते. हेच तंत्रज्ञान कार आणि बाइकमध्ये वापरले जावू शकते. तेजस्विनी हिला  यासाठी अनेक तज्ञांकडून कौतूकाची थाप मिळवली आहे. ही सायकल अपंगासाठी आणि पर्यावरणवाद्यांसाठी देखील वरदान सिध्द झाली आहे कारण त्यामुळे बहुमुल्य इंधनाची बचत होणार आहे.”

तेजस्विनीने सांगितले की, “ अशीच संकल्पना जर मोटरसायकलसाठी वापरली गेली , तर  तिला पेट्रोल किंवा डिजेलची गरज राहणार नाही.कारण ही संपूर्णत: हवेवर चालते. जर मोटरबाइक्स हवेवर चालू लागल्या तर त्यांच्या इंधनाचा मोठा खर्च वाचेल. माझे महत्वाचे उद्दीष्ट प्रदुषण विरहित वाहन तयार करण्याचे आहे.”

उडिशाच्या या ‘वंडरगर्ल’ला आता राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनातून तिचा हा शोध प्रदर्शित करण्याची प्रतिक्षा आहे.

या सारख्याच आणखी काही कहाण्या तुम्हाला माहित असल्यास आम्हाला कळवा. यासाठी marathi@yourstory.com वर संपर्क साधा.