हस्तकला आणि त्यांचे वैविध्य जपण्यासाठी ‘इंडितत्व’च्या क्षीरसागर दंपतीचा अनोखा प्रयत्न!

0

दिप्ती क्षीरसागर (३७) आणि स्वप्निल क्षीरसागर (३८) हे दोघे अनोख्या प्रकारचे पर्यटक आहेत. ते संग्राहक आहेत आणि आगळ्यावेगळ्या वस्तूंचा संचय करण्याची गुणग्राहकता त्यांच्या जवळ आहे. 

भारतभर चौफेर प्रवास करून झाल्यावर, या दंपतीना ही अनुभूती झाली की वैविध्याने नटलेल्या आपल्या देशात कलात्मकतेच्या दृष्टीने संग्रह करुन ठेवता येतील अशा खूप काही गोष्टी आहेत. अगदी हातमागावरील कापडा पासून हस्तकलेच्या दागिन्यांपर्यत. म्हणून, त्यांनी ठरविले की हा अमुल्य ठेवा जतन केला पाहिजे आणि प्रेमपूर्वक आणि कौशल्यपूर्णतेने त्याला या पिढीकडून दुस-या पिढी पर्यतं पोहोचविता आले पाहिजे.

याच महिन्यात (नोव्हे.१६) या दोघांनी त्यासाठी एका मंचाची स्थापना केली आहे. त्यामध्ये या कलात्मक वस्तूंचा संग्रह केला जाईल, त्यांच्या वैविध्यांची काळजी घेतली जाईल आणि संवर्धन केले जाईल. हे करताना त्याचे मुळ आणि तत्व याला कोणतीही इजा होणार नाही याचे खास ध्यान ठेवले जाणार आहे. या मंचाला त्यांनी ‘इंडीतत्व’ असे नाव दिले असून त्या स्वहस्तकला वस्तूंचा संचय ऑनलाईनच्या माध्यमातून करण्याची सोय करण्यात आली आहे.

“सात लाखापेक्षा जास्त स्थानिक कलावंतांच्या माध्यमातून, ज्यात प्रामुख्याने महिलांचा समावेश आहे, आणि समाजाच्या मागासलेल्या घटकातील माणसे आहेत, भारतीय हस्तकलाउद्योग बहरला आहे. आमचा हेतू हा आहे की या हस्तकलेमागच्या संघर्षपूर्ण कहाण्या जगासमोर मांडाव्या आणि त्यातून या कलावंताना आणि त्यांच्या अनमोल कलाकृतीना नवी ओळख आणि वैभव मिळवून द्यावे.”असे स्वप्निल यांनी सांगितले जे सीईओ आहेत.त्यांनी इलेक्ट्रॉनिक इंजिनीरिंग केले आहे. अभियांत्रिकीमध्ये पदविका घेतली आहे. ते १५वर्षापासून डिजीटल तज्ज्ञ म्हणून अनेक नावाजलेल्या उद्यागांसोबत विभागीय संचालक म्हणून काम करतात. त्यात ग्रे वर्ल्ड वाईड, मेडिटर्फ आणि एसटीसी असोसिएट सारख्या संस्थांचा समावेश आहे.

त्यांच्या सहसंस्थापिका आहेत दिप्ती. त्यांनी मुंबईतील सोफिया पॉलिटेक्निक येथून कला शाखेत पदवी घेतली आहे. आता त्या गेल्या दहा वर्षापासून आरेखन आणि ब्रँण्डिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या ‘वॉवडिजाईन’च्या संस्थापक आहेत. ही मुंबईतील एक आरेखन आणि ब्रँण्डिंग संस्था आहे. या मंचावरून हस्तकला आणि हस्तउत्पादीत वस्तू विकल्या जातील, त्यात यादीत समाविष्ट वस्तू या हस्तकला, हस्त उत्पादीत वापरायोग्य उत्पादने असतील.

स्वप्निल यांना भारताच्या कला आणि संस्कृती मध्ये असलेल्या वैभवशाली वारश्याला जगासमोर न्यायचे आहे. तसेच देशातील आणि विदेशातील शहरी भागातील घरा-घरात पोहोचविण्याचा त्यांचा विचार आहे. यातून इथल्या लोकांची संस्कृती आणि कला यांची ओळख होणार आहे. भारत हा वैविध्यपूर्ण कलाकृतीसाठी अद्भूत अशा प्रकारचा देश आहे. भारतातील या कलाकारांसाठी अमेरिकेन बाजारपेठेत मोठा वाव आहे. या मंचाच्या निर्मितीसाठी साधारणत: १५ लाख रुपयांचा खर्च आला. त्यात नाविन्यपूर्ण नमूने असून ३० प्रकारच्या कलाकृती आहेत तसेच ६००पेक्षा जास्त कलाकृतींची नोंद करता येते.

विकासाच्या संधी आणि आव्हाने

हस्तकला उद्योगात खूप मोठ्या संधी आहेत आणि आव्हाने देखील आहेत. भारतीय हस्तवस्तूना जगातून पसंती आहे आणि मागणी देखील. प्रत्येक भारतीय राज्यातून येणा-या वस्तूंना वेगळा इतिहास आणि सांस्कृतिक वारसा आहे,त्यांचे वैविध्य़ हा देखील प्रतिष्ठेचा विषय आहे. असे असले तरी असंघटीत असल्याने या उद्योगा समोर अनेक आव्हाने आहेत.

स्वप्निल म्हणतात की सुदूर भारतात, जाऊन तेथील कला आणि कलाकार यांना शोधून सामिल करून घेणे हे देखील मोठे आव्हान आहे. वेगळ्या पोताच्या विविध कलाकारांना एकत्र जोडताना समाजाच्या वेगवेगळ्या स्तरात जाणे आणि मध्यस्थांच्या मार्फत त्यांची होणारी पिळवणूक थांबविणे हे देखील आव्हान आहे.

बाजारपेठ आणि स्पर्धा

भारतीय बाजारात वर्षाला पाच हजार दशलक्ष डॉलर्सच्या कलात्मक वस्तू आणि उत्पादने यांना मागणी असते, त्यात अनेकजण नवखे म्हणून येत असतात. क्राफ्टविला, इंडियनरुटस्, सीबझार, उत्सवफँशन, आणि नमस्ते क्राफ्ट यासारखे काही जुने मंच आहेत. याशिवाय अनेक इ-कॉमर्स मंच देखील आहेत. यावर्षी फ्लिपकार्टने सरकारच्या विविध विभागांशी यासाठी संपर्क केला आहे. त्यातून ऑनलाइनवर या वस्तू मिळणे सुरू होणार आहे. स्नँपडिलेनेही इंडिया पोस्ट सोबत भागीदारी केली आहे. त्यात बनारसी हस्तवस्तूंचा पुरवठा केला जाणार आहे.

उद्याेगातील जाणकारांच्या मते या उद्योगातील ९०-९५% उत्पादने शंभर पेक्षा कमी कारागिर काम करत असलेल्या छोट्या उद्योगात तयार होतात. भारतात या उद्योगाची स्पर्धा यंत्राने तयार केलेल्या वस्तूंशी आहे. त्यामुळे संख्या आणि किंमत यांच्यात तफावत असते. भारतीय उद्योग कामगार प्रधान असून त्यांची वाढ केवळ १५ टक्के आहे. त्यात सात दशलक्षपेक्षा जास्त कलाकार काम करतात. त्यातून विदेशातील चलन मिळविण्यात मोठा हातभार लागतो.

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा. 

लेखक : तौसीफ आलम