महिलांच्या कपड्यांची दहाहजारपेक्षा जास्त डिझाइन्स, दररोज शंभर मागण्या पूर्ण करणारे 'बैंगलवाले डॉट कॉम’ !

0

देशात ऑनलाइन व्यवहार प्रत्येकवर्षी वेगाने वाढत आहेत. या बाजारात सर्वाधिक विकल्या जाणा-या वस्तूमध्ये कपड्यांचा समावेश होतो. विशेष म्हणजे ऑनलाइन खरेदीतून जिथे ग्राहकांना एकाच जागेवरून अनेक प्रकारच्या कपड्यांचे डिझाइन्स पाहता येतात, तिथे दलाल नसल्याने ग्राहकांना ते स्वस्त दरात घेण्यास परवडतात. लोकांचा हा कल पाहून आगरा येथे राहणारे अखिल अग्रवाल यांनी सन २०१३मध्ये ‘बैंगलवाले डॉट कॉम’ सुरू केले. आज त्यांच्या या संकेतस्थळावर महिलांच्या करिता एकापेक्षाएक पारंपारीक पोशाख आणि विविध प्रकारच्या दागिन्यांची रेलचेल आहे.

अखिल अग्रवाल यांनी अहमदाबाद येथून बिझनेस आंत्रप्रेन्योरशीप मध्ये पोस्ट ग्रँज्यूएशन डिप्लोमा इन मँनेजमेंट चे शिक्षण घेतले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, त्यांचा परिवार वर्षानुवर्ष अनेक प्रकारचे व्यवसाय करत आहे, त्यामुळे त्यांना बालपणीच व्यवसायात आपली स्वत:ची ओळख असावी असे वाटू लागले होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी या दिशेने काम सुरू केले. त्यानंतर त्यांनी पाहिले की, फिरोजाबाद येथे काचेच्या बांगड्यावर चांगले काम केले जाते, तर का नाही याच कामात आपलेही कौशल्य अजमावून पहावे? त्यानंतर त्यांनी ‘बैंगलवाले डॉट कॉम’ची स्थापना केली.

ऑनलाइन बाजारात काचेच्या बांगड्या विकणे ही कल्पना जरी नविन असली तरी अखिल यांच्या अपेक्षेनुसार त्या व्यवसायात यश आले नाही. अशावेळी त्यांनी विचार केला की, या व्यवसायासोबतच आणखी दुसरा जोड व्यवसाय करावा. त्याचवेळी त्यांना कुणीतरी सल्ला दिला की, त्यांनी महिलांसाठी कपडे विकण्याचे काम सुरु करावे. अखिल यांनाही कल्पना आवडली आणि त्यांनी आपल्या संकेतस्थळावर बांगड्यांसोबतच काही कपडे विकण्याचे काम सुरु केले. हळूहळू त्यांच्या संकेतस्थळाच्या मदतीने महिलांच्या कपड्यांची मागणी वाढली त्यामुळे त्यांनाही ते गंभीरपणाने घ्यावे लागले.

आज ‘बैंगलवाले डॉट कॉम’ मध्ये महिलांच्या पारंपारीक पोशाखाची (एथेनिक) मोठी रेंज आहे, येथे विविध डिझाइन्स आणि कपड्यांचे दहा हजारपेक्षा जास्त पर्याय उपल्ब्ध आहेत. अखिल यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या या संकेतस्थळावर कोणत्याही उत्पादनाचे एकच मूल्य असते, मात्र दुस-या संकेतस्थळांवर एकाच वस्तूच्या अनेक किंमती दाखवल्या जातात. कारण तेथे एकच वस्तू विकणारे अनेक लोक असतात मात्र ‘बेंगालवाले’ मध्ये तसे नाही. अखिल दावा करतात की, ते आपल्या उत्पादनाबाबत ग्राहकांना पारदर्शी आणि योग्य किंमती सांगतात. या संकेतस्थळावर मिळणारे पारंपारीक कपडे १२०० रुपयांपासून पंधराहजार रुपयांपर्यंत मिळू शकतात. आता त्यांची योजना लेहंग्यासरखे उत्पादन बाजारात आणण्याची आहे, ज्यांची किंमत एक लाख रूपयांपर्यंत असू शकते. ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये त्यासाठी ते दूरध्वनीवरूनही त्यांच्या अडचणी दूर करतात.

‘बेंगलवाले डॉट कॉम’ मध्ये केवळ महिलांच्या एथनिक कपड्यांची नव्हेतर वेस्टर्न ड्रेस आणि आभूषणांची देखील विक्री केली जाते. अखिल सांगतात की त्यांच्या संकेतस्थळावर मिळणा-या अधिकांश वस्तू सुरत मधून येतात परंतू अनेक उत्पादने अन्य ठिकाणांवरूनही आणले जातात. आज त्यांच्या संकेतस्थळावर सुमारे दहा हजारपेक्षा जास्त लोक जोडले गेले आहेत. त्यांच्या ग्राहकांची श्रेणी एक आणि दोनच्या शहरातील आहे.२०१३मध्ये आपला व्यवसाय सुरू करणारे अखिल यांच्याकडे आधी दिवसाला एकही मागणी नसायची आतामात्र शंभरपेक्षा जास्त मागण्या नोंदवल्या जातात. विशेष म्हणजे त्यांच्या या मागण्या पंधरा ते दोन हजाराच्या दरम्यानच्या असतात.

त्यांचा दावा आहे की ‘बेंगालवाले डॉट कॉम’ प्रतीमहिना २० ते तीस टक्के वेगाने प्रगती करत आहे. असे असले तरी ते मानतात की, त्यांचा स्वत:चा खर्च जास्त आहे तसेच वाहतूक खर्चही जास्त आहे. याशिवाय वस्तू परत येण्याची त्यांना मोठी डोकेदुखी आहे. त्यांच्या संकेतस्थळावर विकलेल्या वस्तूपैकी किमान वीसटक्के वस्तू वेगवेगळ्या कारणांनी परत केल्या जातात. सध्या त्यांच्यासोबत तीन जण काम करतात,याशिवाय काही कामे बाहेरून करून घेतली जातात. गुंतवणूकीबाबत अखिल सांगतात की, सध्या त्यांना त्याची गरज नाही, कारण त्यांचे लक्ष किरकोळ बाजारात मजबूत होण्यावर आहे, मात्र वर्षभराने त्यांना यावर गांभिर्याने विचार करावा लागणार आहे.

वेबसाइट :- www.banglewale.com

working as accridated jurno from last15yrs.at mumbai mantrly political beat. working for documentry films making, scriptting, tv shows &print media .intersted in social issues.

Related Stories

Stories by kishor apte