ओला- उबेरकडून निराशा झालेल्या चालकांनी एकत्र येवून सुरू केले त्यांचे स्वत:चे ‘अॅप’!

0

राज्य सरकारच्या परिवहन विभाग आणि ओला-उबेर टॅक्सी चालकांच्या संघटना यांच्यातील वादातून बंगळूरू येथील टॅक्सी चालकांचे रोजचे जगणे कठीण झाले आहे. या सा-यातून त्रासल्यानतर शेवटी, चालकांच्या संघटनेने ठरविले की, या संभ्रमातून बाहेर यावे आणि स्वत:चे स्वतंत्र अॅप सुरू करावे ज्यातून ते ग्राहकांशी थेट संपर्कात येवू शकतील.

तन्विर पाशा, यांच्या नेतृत्वातील चालक संघटनेने, या योजनेबाबत माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांच्याशी एक मार्च रोजी चर्चा केली, ज्यावेळी ते उपोषणाला बसले होते. पाशा जे ओला- उबेर आणि टॅक्सी फॉर शुअर च्या चालकांच्या संघटनेचे प्रमुख आहेत, त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

याबाबतच्या वृत्तानुसार चालकांनी सांगितले की हे अॅप कुमारस्वामी यांच्या पैशातून तयार केले जाणार आहे. आणि या जद (से)च्या नेत्याने त्यांना आश्वासित केले आहे की, अभियंत्याना नेमून हे अॅप तयार करण्यात ते मदत करतील. चालकांच्या विविध संघटनाच्या सुकाणू समितीने सर्वानुमते हे अॅप तयार करण्याचे ठरविले आहे. प्राथमिक अंदाजानुसार ८० हजार कॅब चालकांनी या कल्पनेला पाठींबा दिला आहे, आणि कार्यालयाच्या जागेकरीता तसेच सक्षम ग्राहक सेवा चमूचा शोध सुरू झाला आहे.


या बाबतच्या वृत्तात असेही म्हटले आहे की, कुमार स्वामी यांनी चालकांना विनंती केली आहे की, विदेशी कंपनीचे नियम उल्लंघन न करता त्यांनी स्वत:चे मालक बनावे. हा चमू आणखी चालकांना या योजनेत जोडण्याचा प्रयत्न करत असून इतरही शहरातून ही सेवा दिली जाण्याचा प्रयत्न केला जात आहे. या बाबतच्या वृत्तानुसार कमिशनच्या जास्तीच्या दरामुळे, भत्यांच्या कपातीमुळे, कमी उत्पन्नामुळे तसेच कामाच्या जास्तीच्या वेळांमुळे चालकांनी फेब्रूवारी महिन्यात संप पुकारला होता. या संपाचा परिणाम मेट्रो शहराच्या रोजच्या जन-जीवनावर झाला, महागडा प्रवास आणि चालकांच्या वानवा यामुळे हा संप आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. सध्या कॅबच्या फे-या आणि किमती पुन्हा पूर्ववत झाल्या असल्या तरी चालकांच्या संपामुळे त्या सामान्य झालेल्या नाहीत.

जरी अजूनही संप सुरूच असला तरी, हा चमू चालकांसोबत काम करत आहे. आणि त्यांचा संपूर्ण पाठिंबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. जेणे करून सर्वजण या साठी अजूनही सकारात्मक नाहीत.