गावातील सा-या महिलांना उद्योजक बनविणा-या ‘शांता’ यांच्या गरिबीच्या लढ्याची प्रेरक यशोगाथा!

0

एका अहवालानुसार भारतात कामकाजी महिलांचे प्रमाण झपाट्याने कमी होत असल्याचे सांगण्यात आले आहे. हे प्रमाण ग्रामीण  भारतात चिंताजनक आहे कारण २००५च्या तुलनेत ते ४९%आहे, केवळ ३६टक्के महिलांना सध्या काही कामकाज उरले आहे.असे असले तरी शांता(५३) या महाकाय संकटाशी शांतपणे झुंज देत आहेत.

अत्यंत हालाखीच्या स्थितीत असलेल्या गरीब घरात शांता यांचा जन्म झाला आणि बालवयातच त्यांचा विवाह सुध्दा झाला. लग्नानंतर त्यांना कोडापट्टणम या गावी जावे लागले जे तामिळनाडू राज्यातील कांचिपूरम जिल्ह्यात आहे. शिक्षण आणि अनुभवाचा अभाव असला तरी शांता यांनी काम करायचे ठरविले आणि स्वत:च्या कुटूंबाला दारिद्र्यातून बाहेर काढले. त्यांनी स्थानिक सरकारी कार्यालयात तात्पुरते काम मिळवले. त्या कामातून त्यांना त्यांच्या बसच्या खर्चापेक्षा जास्त काही मिळत नव्हते. त्यांनी असा विचार केला की कामाचा सराव आणि अनुभव मिळवत कौशल्य मिळवले की अजून काही काम त्यांना मिळू शकेल.

हे ते दिवस होते ज्यावेळी त्यांनी स्वयंसहायता बचतगटांबाबत माहिती घेतली. सुक्ष्म भांडवलाच्या आधारे काम करणा-या बचतगटांमध्ये दारिद्र्याच्या मुक्तीचा मार्ग होता. प्रत्येक सदस्यांना त्यांच्याकडून काही बचत करून वर्गणी जमा करायची होती जी बँकेत बीज भांडवलाच्यासाठी कर्ज मिळवताना भरायची होती जे सवलतीच्या दराने मिळणार होते. उद्योगाची संकल्पना त्यांनाच द्यायची होती, आणि बँकेने त्याला मंजूरी दिल्यानंतर त्यांना त्यांचा व्यवसाय करता येणार होता. 

शांता यांनी जास्तीत-जास्त महिलांना सहभाग घेण्याबाबत सांगितले. त्यांच्या गावात बहुतांश लोक गरीब होते, त्यामुळे २० महिलांना एकत्र करताना त्यांना दोन वर्ष लागली ज्या दहा रुपये देण्यास तयार होत्या. “फक्त मलाच त्याबाबत उत्सुकता होती, पण मला विश्वास होता की, माझ्या गावात मी हे सुरू करु शकेन” शांता यांनी सांगितले. त्यांनी गायी घेतल्या आणि त्यांचे दूध विकण्याचा उद्योग सुरू केला. काही काळाने बँकानी देखील शांता आणि त्यांच्या गटावर विश्वास ठेवायला सुरुवात केली. “आज बँक गावातील कुणाही माणसांपेक्षा आमच्यावर जास्त विश्वास ठेवते” शांता सांगतात.

त्यांचे भाग्य त्यावेळी उजळले जेंव्हा २००९मध्ये त्या चेन्नईमध्ये दूध सीलबंद करायच्या पिशव्या पहायला पिशव्यांच्या उत्पादकांकडे गेल्या. जरी या सा-यासाठी काही काळ जावा लागला आणि बरीच मेहनत करावी लागली तरी त्यांना नवे काम मिळाले आणि अनेक महिलांना त्यात सहभागी व्हा असे आवाहन करावे लागले.

आज २६ महिला पॅकेजिंग युनिटमध्ये काम करतात आणि पाच हजार पिशव्या प्रत्येक सप्ताहात पॅकबंद करतात. आर्थिक स्वातंत्र्य आणि कौशल्य यांच्या बळावर या महिला उद्योजिका गरीबीशी आणि इतर सामाजिक कुप्रथांशी त्यांच्या पध्दतीने लढत आहेत. शांताकरीता म्हणाल तर मात्र त्या या सा-या महिलांना बचतगट सुरू करण्यासाठी प्रेरणा देणा-या मदत करणा-या आणि त्यांच्यातील कौशल्य विकसित करणा-या कल्पक मार्गदर्शक ठरल्या आहेत.

सौजन्य : थिंक चेंज इंडिया