पिंकसिटीत नव्या वर्षाची सुरुवात एका अनोख्या संस्कृतीच्या दर्शनाने, ‘दारूने नव्हे दुधाने’ नव्या वर्षांचे स्वागत!

0

एक चांगले आणि योग्य काम कशाप्रकारे लोकांचे समर्थन मिळवते, याचे एक उत्तम उदाहरण आहे राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर शहरात “मद्याने नव्हे तर दुधाने करावी नव्या वर्षाची सुरुवात.” तेरा वर्षापूर्वी पहिल्यांदा लोकांच्या मदतीने ५०० लिटर दुधाने हा शुभ प्रारंभ करण्यात आला होता. हे योग्य आहे की, या प्रकारच्या योजनेची एक मर्यादा असते. येथे मद्याच्या बंदीसाठी राजस्थानचे गांधी म्हणून ओळखले जाणारे गोकुळ भाई भट्ट, सिद्धराज ढढ्ढा सारखे स्वातंत्र्यसैनिक संपूर्ण जीवनभर संघर्ष करत राहिले. जनता पार्टीचे माजी आमदार गुरुशरण छाबडा यांनी तर अनिश्चित कालावधीसाठी उपोषण करतानाच आपले प्राण त्यागले. झोपडपट्टी भागात मद्याने उद्ध्वस्त व्यक्तींची अवस्था आजही बघितली जाऊ शकते. त्याव्यतिरिक्त हे प्रयत्न संस्कृतीचे सकारात्मक उदाहरण आहे.

एका दशकापेक्षा अधिक काळ व्यतीत झाला. राजस्थानात सर्वोद्याचे विश्वासू अनुयायी आणि विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार एका अभिनव संस्कृतीची सुरुवात करण्यात आली. आज ते अभियान म्हणून परिवर्तित झाले आहे. एक चांगले आणि योग्य काम कशाप्रकारे लोकांचे समर्थन मिळवते, हे त्याचे उदाहरण आहे. त्यासाठी निस्वार्थ दृढता आणि निश्चल मनाने कायम राहणे गरजेचे असते. “मद्याने नव्हे दुधाने व्हावे नव्या वर्षाचे आगमन” आता गांधीवादी किंवा नैतिकवादी लोकांची घोषणा राहिलेली नाही. हे प्रत्यक्षात पाहू इच्छित असाल तर, नव्या वर्षात जयपूरमध्ये जवळपास प्रत्येक बाजार, प्रत्येक भागात आणि मुख्य रस्त्यांवर बँनर लागलेले दिसतील. नव्या वर्षात तरुण – तरुणी, प्रौढ महिला आणि पुरुष, वृद्ध लोक स्टॉल सजवताना, दुध पाजताना हा संदेश देताना दिसतील, “मद्य आयुष्य खराब करते, दुधामुळे पोषण मिळते.” ते तेरा वर्षापूर्वी, जेव्हा त्याची सुरुवात झाली होती, त्यापूर्वी नव्या वर्षात राजस्थान विद्यापीठाबाहेर मद्य पिऊन नशेत असलेल्या तरुणांमुळे जवाहरलाल नेहरू रोड वर जेडीए सर्कल ते गांधी सर्कलचा रस्ता इतका भयावह होता की, लोक त्या रस्त्यावरून न जाता दुसरा रस्ता पकडत असत. अशाच वातावरणात संत विनोबा यांच्याद्वारे स्थापित प्राकृतिक चिकित्सा केंद्र, बापू नगरचे तात्कालीन महासचिव धर्मवीर कटेवा आणि अन्य गांधीवादी लोकांनी निश्चय केला की, देशाच्या तरुण वर्गाला नशेच्या धुंदीत घेऊन जाणा-या या वाईटा विरोधात सक्रियतेची गरज आहे.

व्यसनमुक्ती आणि गांधीविचारधारा यातून राजस्थानात स्वातंत्र्यपूर्वकाळापासून चेतना जागवली आहे. राजस्थान ब्रिटीश भारताचा अंग नव्हता. ब्रिटन संरक्षित संस्थानात त्याची विभागणी झाली होती. हा तो सामंती प्रदेश होता जेथे राजकीय मेजवानीत अफिम चाटणे राजवंशांची शान समजले जात होते.कॉंग्रेसचे कार्यक्षेत्र आणि त्यांचे नेतृत्व ब्रिटिश भारतापुरते मर्यादीत होते. अशावेळी राजस्थानात स्वातंत्र्याची चेतना ज्या कारणांनी जागवली त्यात खादी, नशाबंदी, अस्पृश्यता निवारण, हरिजन (दलित) उत्थान, शिक्षणाचा प्रचार-प्रसार आणि शेतकरी तसेच आदिवासींचा सामंतवादाविरोधातील लढा हे प्रामुख्याने होते. धर्मवीर कटावा देखील शेखावती सामंतवादी विरोधी परंपरा आणि गांधीवादाच्या पार्श्वभुमीतून आले होते, त्यामुळे त्यांच्याकडून यासाठी प्रयत्न करणे स्वाभाविक होते.राजस्थान विद्यापीठाचे विद्यार्थी नेता महेंद्र शर्मा यांनी राजकारणातून इतर युवकांना लोकजागृती, चारित्र्य निर्माण आणि सांस्कृतिक कार्यासाठी ‘राजस्थान युवा छात्र संस्था’ स्थापन केली. या संस्थेने ‘इंडियन अस्थमा सोसायटी’ यांच्या सहकार्यातून विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर स्टॉल लावून एक मोहिम राबविली- ‘दारूने नाही दुधाने करू नव्या वर्षाचे स्वागत’!

युवर स्टोरीला महेंद्र सांगतात की, “ त्यावेळी लोकांना समजावून त्यांना बोलावून दुध पाजावे लागे. पहिल्या वर्षी कसेबसे ३० ० लिटर दुध पाजता आले.शिल्लक राहिले. आता स्थिती अशी आहे की मागील वेळी सुमारे पंधरा हजार पेले आणि २०हजार थर्माकोलचे ग्लास दूध या केंद्रात पाजण्यात आले, आणि दरवर्षी त्यात पाचशे लिटरची भर पडते आहे. लोकप्रतिनिधी कोणत्याही पक्षांचा असो या मोहिमेत सहभागी होतो. आतातर ‘राजस्थान सहकारी डेअरी फेडरेशन’ दरवर्षी यात सहभाग घेत आहे. ते वितरणात दुधाचे सहकार्य करतात. त्याशिवाय उत्स्फूर्तपणाने व्यापार संघ, मोहल्ला समित्या देखील नव्या वर्षाच्या आधी ३१डिसेंबरच्या संध्याकाळपासून एक जानेवारीपर्यंत दुध वितरणातून हा संदेश देतात.

या आंदोलनाने गुलाबी शहराच्या वातावरणात असा काही बदल केला आहे की, जेथे अन्य शहरात मुली या भितीने घराबाहेर पडत नाहीत की, कुणी दारु पिऊन त्यांच्याशी अभद्रता न करो. तेथेच दारु नाही दुधाने नव्या वर्षांचे स्वागत हा संदेश बनला आहे.

तरूण ज्या उत्साहाने आणि भावनेने यात सहभागी होतात ते पाहून या प्रयत्नांचे चीज झाल्याचे जाणवते. नव्या वर्षासाठी प्रत्येक शहरात जितकी दारू प्यायली किंवा पाजली जाते ती वर्षभराच्या कोट्याइतकी असते. हे तर खरेच आहे की अशा उपक्रमांच्या काही मर्यादा आहेत. दारू संस्कृतीचे विरोधक इतके सशक्त आहेत की यातून दारूबंदीसाठी गोकूलभाई भट्ट, सिध्दराज ढढ्ढा जीवनभर संघर्ष करत राहिले. जनता पार्टीमधून १९७७मध्ये आमदार झालेल्या गुरुचरण छाबडा यांनी तर दारूबंदीसाठी बेमुदत उपोषणही केले आणि त्यातच प्राणही दिले आहेत. झोपडपट्ट्यांमध्ये दारुने उध्वस्त विधवा आणि मुले यांची दयनिय स्थिती आजही पहायला मिळते. असे असतानाही हे उदाहरण समांतर संस्कृतीचे सकारात्मक उदाहरण आहे.

लेखक : कमल सिंह.

अनुवाद : किशोर आपटे.