सायकलीवरून पोलिस चेन्नईला कसे सुरक्षित चांगले शहर बनवित आहेत

0

चेन्नई पोलिसांनी अलिकडेच एका आगळ्या-वेगळ्या पध्दतीने समाजाच्या सुरक्षेचा प्रयत्न केला आहे, तो देखील सायकलींगच्या माध्यमातून. गस्त घालण्याच्या जुन्या पध्दतीचा अवलंब करताना चेन्नईच्या पोलिसांनी शहराचे खरेखुरे तारणहार आणि पालक म्हणून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची कामगिरी बखुबी निभावली आहे.

स्थानिक वृत्तानुसार, ८८ सायकल स्वारांच्या टोळ्या रात्रीच्या वेळी चेन्नईत गस्तीवर जातात. त्यात कार आणि बाईकच्या माध्यमातून त्यांना गुन्हेगारांपर्यंत वेगाने पोहोचण्यास मदत केली जाते, ज्यावेळी या गस्ती पथकाचे सायरन वाजतात त्यावेळी अनेकदा असामाजिक तत्व आणि समाजकंटक काही वेळ लपून बसतात किंवा पळून जातात. गल्लीबिळातून पळून जाणा-या अशा गुन्हेगारांचा माग काढणे पोलिसांना त्यामुळे शक्य होत नाही.

सायकलिंगमुळे पोलिसांना त्यात आता सहजपणे पाठलाग करणे शक्य होत असल्याचे दिसून आले आहे. त्यातून लोकांच्या मनात विश्वास आणि कायद्याचा दरारा देखील वाढण्यास मदत झाली आहे. “ ही संकल्पना आम्हाला लोकांच्या आणखी जवळ घेवून जाण्यास यशस्वी झाली आहे.” मायलापोरचे उपायुक्त व्ही बालकृष्णन यांनी सांगितले.

अलिकडेच तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी सर्व पोलिस ठाण्यांना २५० नव्या सायकली आणि शंभर मोटार बाईक देण्यास सुरुवात केली. प्रत्येक पोलिस ठाण्यात किमान दोन सायकली देण्यात आल्या आहेत, त्यामुळे चेन्नईचे पोलिस रस्त्यांवर आणि गल्लीबोळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गस्त घालताना दिसू लागले आहेत!