आयआयएम लखनौच्या या ९०%दृष्टीहिन मुलीने अनेक अडचणीतून प्रतिष्ठेची नोकरी मिळवलीच!

0

परिधी वर्मा, या भारतीय व्यवस्थापन संस्था लखनौच्या २१ वर्षांच्या तरुणीने केवळ दहा टक्के दृष्टी असूनही अनपेक्षीतपणे प्रतिष्टीत नोकरी मिळविण्यात यश संपादन केले आहे. तेथे अनेकांना तिने हे करणे अशक्य वाटत होते कारण तिची दृष्टी अधू आहे. तसे असले तरी तिच्या सध्याच्या सुक्ष्म वित्तीय बँकेच्या ग्राहक समन्वय अधिकारी या पदाच्या नोकरीच्या ऑफरमुळे सा-यांना सुखद धक्का बसला आहे.


Image source: Storypick
Image source: Storypick

परिधी या केवळ १९ वर्षांच्या आहेत, त्याच्या बँचमध्ये सर्वात तरूण ज्यावेळी त्यानी भारतातील या सर्वोच्च व्यवस्थापन संस्थेत प्रवेश घेतला होता, परिधी यांच्या अधू दृष्टीच्या समस्येला प्रामाणिक आणि मोकळेपणे मान्य करण्याच्या स्वभावाने अनेकजण चकीत होतात. त्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “ होय मी अधू आहे, मला ९०टक्के दृष्टीदोष आहे. केवळ दहा टक्केच पाहता येते, त्यामुळे मी इतरांपेक्षा काहीश्या प्रमाणात वेगळी असेनही, हा दुर्मिळ आजार आहे, सात लाख लोकांपैकी एखादयालाच होणारा. माझ्या बाबतीत तो टाळता न येणारा आणि प्रगतीसाठी कारक असाच आहे.”

शैक्षणिक दृष्ट्या परिधी नेहमीच अव्वल राहिली आहे, त्यामुळेच त्यांच्या पालकांना हा धक्का होता ज्यावेळी पाचव्या इयत्तेत असताना त्यांचे गुण कमी होवू लागले. सुरुवातीला पालकांना वाटले की त्या नीट अभ्यास करत नसतील, पण ज्यावेळी होळीचा रंग त्यांच्या डोळ्यात गेला त्यावेळी डॉक्टरंच्या कडे जावे लागले. त्यांनी चष्मा लावण्यास सांगितले. त्याने काही फरक पडला नाही त्यावेळी त्यांच्या अनेक चाचण्या करण्यात आल्या, आणि हा दुर्मिळ रोग असल्याचे स्पष्ट झाले.

परिधी यांच्यासाठी हे मान्य करणे कठीण होते, त्यांच्या अभ्यासावर परिणाम होत होता आणि त्यांचा क्रमांक घसरत होता. त्याने सारे चिंतीत होते. मात्र लहान वयातच अध्यात्मिक साधना केल्याने त्यांना मनोबळ मिळाले. त्यातून या धक्क्यातून त्या सावरल्या. वेळेवर त्यांना समजूतदार पणा आला त्या म्हणाल्या की, त्या सर्वात स्वयंभू आणि आत्मविश्वास असलेल्या व्यक्ती आहेत.

त्यानंतर त्या बीबीए करिता आय सी जी जयपूरमध्ये गेल्या, आणि मास कम्युनिकेशन तसेच व्हिडीओ निर्मिती या विषयात पदविका मिळवली. परिधी यांना सुरुवातीला नागरी सेवा मध्ये जायचे होते, त्यासाठी त्यांनी प्रवेश परिक्षा देण्याचे ठरविले. केवळ अडिच महिने अभ्यास करून त्यांनी ही परिक्षा दिली.

त्यांच्या महाविद्यालयीन काळात केलेल्या संघर्षाबाबत त्या सांगतात की, “ सुरुवातीला मला नीट जमत नव्हते, कारण वाचन खूप करावे लागे, घरी वडील मला वाचून दाखवत. त्यावेळी मी विचार केला की मी त्यातून बाहेर पडेन, मात्र त्यानंतर माझ्या वरिष्ठानी मदत केली अणि पाठिंबा दिला. त्यामुळे मी आव्हान स्वीकारायचे ठरविले, मी अधू आहे, पण मी केवळ माझ्या जवळ काय आहे त्यावर लक्ष दिले”. त्यांच्यासारख्यांसाठी लेखनिकांची किती गरज पडते ते सांगताना त्या म्हणतात की, “ साधरणत: परिक्षेत प्रत्येकजण आपले नशीब लिहीत असतो, माझ्या बाबतीत माझे नशीब माझ्या लेखनिकांच्या हाती असे. मी स्वत:ला त्यासाठी नशिबवान समजते की मला तसे मनापासून मदत करणारे हितचिंतक लहानपणापासून मिळत गेले. देवाची माझ्यावर दया झाली.”

स्वत:च्या कमजोरीला त्या त्यांच्या व्यक्तिगत विकासाची अडचण मानत नाहीत. १८ वर्षा खालच्या फुटबॉल संघात त्या खेळल्या आहेत ज्याने  जेते पद मिळवले होते. महाविद्यालयात असताना त्यांनी गिटार वादन शिकले आणि स्वत:चा महाविद्यालयीन बँण्ड तयार केला ज्याने नंतर खुले कार्यक्रमही सादर केले. महाविद्यालयातील रँम्पवरील स्पर्धेतही त्या सहभागी झाल्या आहेत.

परिधी यांना अनेक सन्मान आणि पुरस्कार मिळाले आहेत ज्यातून त्यांच्या गुणांसोबत त्यांच्या मेहनत आणि हिमतीचा परिचय होतो. त्यांच्या महाविद्यालयातील अखेरच्या वर्षी २०१५मध्ये त्यांना राजस्थान सरकारचे ‘वुमन ऑफ दी फ्यूचर’ ऍवॉर्ड देखील मिळाले आहे. त्यांच्या पालकांनी नोबेल विजेता कैलास सत्यार्थी यांच्या हस्ते कन्यादिनाच्या निमित्ताने पुरस्कारही स्विकारला आहे.

पालकांच्या एकुलत्या एक असलेल्या त्यांना घरातून कायम पाठिंबा मिळाला आणि कधीही वेगळ्या शाळेत पाठविण्यात आले नाही, शिवाय त्यांना चांगल्या शाळेतून शिक्षण मिळावे यावर लक्ष देण्यात आले. त्यांच्या झोकून देण्याच्या वृत्तीने हेच दाखवून दिले आहे की, अशक्य काहीच नसते, जर तुम्ही ठरविले तर जीवनात तुम्हाला यश नक्कीच मिळते.