ऑनलाईन कार्यशाळेच्या माध्यमातून कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देणारं स्टार्टअप 'डिझायर'

0

सध्या बाजारपेठेत शैक्षणिक क्षेत्रातील साधारणपणे ६० यशस्वी स्टार्ट अप्स आहेत, असा शैक्षणिक तज्ज्ञांचा अंदाज आहे.दरवर्षी अशाप्रकारची अंदाजे १००-२०० स्टार्टअप्स सुरु होतात. या स्टार्टअप्समधल्या बऱ्याच कंपन्यांचा भर अभ्यासक्रम, मजकूर विकास यांच्यासोबतच कौशल्य प्रशिक्षण, व्यावसायिक अभ्यासक्रम आणि ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रम यावर असतो.

देशात निर्माण झालेली नोकरदारांची गरज आणि सिलीकॉम व्हॅलीसारख्या प्रकल्पांचं यश यांमुळे गेल्या काही वर्षांमध्ये शैक्षणिक स्टार्टअप्समध्ये नक्कीच वाढ झाली आहे, असं डिझायर डॉट कॉमचे सहसंस्थापक बिन्नी मॅथ्यूज सांगतात.

याच गोष्टीमुळे त्यांनाही प्रेरणा मिळाली. बिन्नी आणि ओमेर आसीम यांनी नोव्हेंबर २०१२ मध्ये डिझायर (DeZyre) डॉटकॉमची स्थापना केली. व्यावसायिकांना प्रत्यक्ष कौशल्य प्रशिक्षण देणं हा यामागचा हेतू होता.

या ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून ज्या व्यावसायिकांना पुढे आपलं करिअर आणखी चांगलं करायचं आहे त्यांच्यासाठी मोठ्या डेटा प्रोग्रामिंग आणि एम एस एक्सेलचे जवळपास सात अभ्यासक्रम करता येऊ शकतात. सुरुवातीला यातील बहुतेक सर्व अभ्यासक्रम आधीच रेकॉर्ड केलेले होते. फक्त यात बिग डेटा प्रोग्रमिंगची हडूप ही भाषा थेट शिकविली जायची.

आतापर्यंत ते जवळपास भारतातील आणि अमेरिकेतील ९००० उत्सुक शिकाऊ उमेदवारांपर्यंत पोहोचले आहेत. तसंच काही मोठ्या गुंतवणुकदारांकडून निधीही त्यांना मिळाला आहे. यामध्ये फ्लिपकार्टचे सहसंस्थापक बिन्नी बन्सल, न्यूटॉय चे सहसंस्थापक डेव्हिड बेटनर आणि मायकेल चॉ, क्विझेचे सहसंस्थापक गुरू गोवरप्पन, इमॅजिनके १२ आणि हेडगे आणि निधी व्यवस्थापक श्रीकांत राममूर्ती यांचा समावेश आहे.

गेल्यावर्षीही त्यांनी आयबीएम च्या सहकार्यानं बिग डेटा एनॅलिटिक्सवर पाच संयुक्त प्रमाणत्र अभ्यासक्रम सुरु केलेत.

वर्गात बसून शिकविण्यापेक्षा उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि प्रतिष्ठित व्यक्तिंकडून कौशल्य प्रशिक्षण द्यायला पाहिजे हे आमच्या लक्षात आलं, असं बिन्नी सांगतात.

शिकाऊ उमेदवारांना फक्त नवीन तंत्रज्ञान शिकवण्यासोबतच या क्षेत्रात जे आधीपासून काम करत आहेत, त्यांना तंत्रज्ञानासोबत, विकासासोबत अद्ययावत राहण्यासाठीही मदत करणं गरजेचं आहे, हे त्यांच्या लवकरच लक्षात आलं.

यासाठी त्यांनी सदस्यत्वावर आधारित हॅकरडे हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरु केला. यामध्ये दर पंधरा दिवसांनी उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ सध्याच्या तंत्रज्ञानाच्या प्रकल्पांवर आधारित कार्यशाळा घेतात.

हॅकरडे ही जगातील आतापर्यंतची पहिली करिअर अद्ययावत करणारी सेवा आहे, असं बिन्नी सांगतात. ही सेवा दर महिना ९ डॉलर्स शुल्क देणाऱ्या सदस्यांसाठी आहे. ही सेवा अजून बेटा फेजमध्ये आहे. सध्या ही सेवा फक्त निमंत्रण देऊनच मिळवता येऊ शकते. पण लवकरच ही सेवा सगळ्यांसाठी खुली होणार आहे.

आपल्या करिअरमध्ये अद्ययावत राहण्यासाठी हॅकरडे सेवा अत्यंत काळजीपूर्वक तयार करण्यात आली आहे. यापूर्वी प्रकल्प सुरु असताना नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी व्यावसायिकांना अन्य कोणताही सोपा मार्ग नव्हता. मी डेटा अॅनालिस्ट म्हणून काम करत असताना जर अशी सेवा असती, तर मला नक्कीच आवडलं असतं, असं हॅकरडेचे उत्पादन प्रमुख सुमन कुमार सांगतात.

पहिली हॅकर डे २१ नोव्हेंबरला झाली.त्याचा विषय होता, ‘डेटा सायन्स वापरून टायटॅनिकवर कोणी जिवंत असू शकेल का याचा अंदाज लावणे’ . टायटॅनिकवर जे संकट ओढावलं, जो अनर्थ झाला त्याचां विश्लेषण उपलब्ध माहितीच्या आधारे करण्यावर या कार्यशाळेत भर देण्यात आला होता.

आपल्याला माहिती आहे अशा वेळेस उच्चभ्रू वर्ग, लहान मुलं आणि महिलांसाठी लाईफबोट्स देण्याला प्राधान्य होतं. त्यावरून कोणते प्रवासी या संकटातून वाचले आणि जे वाचले ते टायटॅनिकवर होते का याचा अंदाज लावायला शिकण्यासाठी मशिन्सची काही साधनं वापरायला या कार्यशाळेनं मदत केली, असं बिन्नी सांगतात.

त्यापुढील सत्रांचा उद्देश हा डेटा सायन्स आणि बिग डेटा विश्लेषण हा होता. पुढच्या महिन्यात वेब डेव्हलपमेंट आणि डिजीटल मार्केटिंग या विषयाची ओळख करून देण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

इकॉनॉमिस्ट किंवा फोर्ब्ससाठी महिन्याच्या सदस्यत्वाच्या दृष्टीकोनातून याचा विचार करा. तुम्हाला हवं असेल तोपर्यंत तुम्ही तुमचं सदस्यत्व ठेवू शकता. नवीन तंत्रज्ञान शोधणं, त्या तंत्रज्ञानावर आधारित कार्यशाळा आयोजित करणं, उद्योगक्षेत्रातील उत्तम तज्ज्ञ शोधणं आणि तुम्हाला अद्ययावत ठेवणं ही डिझायर ची जबाबदारी हे, असं बिन्नी सांगतात.

योग्य ती जागरुकता असेल, तर व्यावसायिक क्षेत्रात अशा प्रकारच्या स्टार्टअप्सना भरपूर वाव आहे.

उद्योग विश्लेषक, बाजारपेठ संशोधन संस्था, ऑनलाईन मार्केटवर आधारित प्रकल्प या सगळ्याची बाजारपेठ २०१५ मध्ये १०७ अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचणार आहे. विविध क्षेत्रांत कौशल्य विकासावर भर देणारेअनेक स्टार्ट अप्स आहेत.

कौशल्य विकासाचं ऑनलाईन प्रशिक्षण देणाऱ्या चांगल्या कंपन्यांपैकी काही म्हणजे- युडासिटी. या कंपनीनं नुकताच १०५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा नफा कमावला आहे. तर लिंकेडीन या कंपनीनं लिंडा ही कंपनी या वर्षाच्या सुरुवातीला १.५ कोटीला विकत घेतली. कौशल्य विकासाचं ऑनलाईन तसंच ऑफलाईन प्रशिक्षण देणारं व्यासपीठ म्हणजे जनरल एसेंब्ली ही कंपनी स्कीलब्ले ही याच यादीतली आणखी एक कंपनी.

गेल्या दोन वर्षांत ऑनलाईन अभ्यासक्रमांची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यासाठी कोर्सिआ आणि इडीएक्स यासारख्या वेबसाईट्सचे पर्याय उपलब्ध आहेत.


हॅकर डे साठी यूस्टोरीचे वाचक इथे रजिस्टर करू शकतात.

Website : https://www.dezyre.com/

स्टोरी- अपर्णा घोष

अनुवादक- सचिन जोशी