११ वी पास असलेल्या एका शेतकऱ्याची कमाल, ऊसाच्या शेतीमध्ये केले क्रांतिकारी बदल.

0

ते एक शेतकरी आहे,लोक त्यांना इनोवेटर (नवनिर्मितीकार )म्हणून ओळखतात, ते फारसे शिकलेले नाही पण त्यांनी आज जो शोध लावला आहे त्याचा लाभ जगातल्या सगळ्या शेतकऱ्यांना झाला आहे. मध्यप्रदेशमधल्या नरसिंहपूर जिल्ह्यातल्या मेख गावात राहणाऱ्या रोशनलाल विश्वकर्मानी पहिल्यांदा नवीन पद्धतीने कमी खर्चात ऊसाची लागवड केली आणि उत्पन्नात वाढ केली; त्यानंतर त्यांनी अशी मशीन तयार केली की जिचा वापर ‘कलम’ बनविण्यासाठी आपल्या देशातच नाही तर परदेशात पण होत आहे.

रोशनलाल विश्वकर्मा ने ११वी पर्यंतचं शिक्षण शेजारील गावातून पूर्ण केलं. त्यांचे वाड-वडिल पण शेती हा व्यवसाय करत होते,म्हणून त्यांना शेतीची आवड निर्माण झाली. शेती करताना त्यांना जाणवलं की ऊसाच्या पिकामध्ये जास्त फायदा आहे.पण सामान्य शेतक-यांना ऊसाच्या शेतीसाठी कष्ट पडायचे म्हणून मोठे शेतकरीच ऊसाची लागवड करत असे. रोशनलालनी तेव्हाच ठरविले की आपण पण आपल्या दोन-तीन एकरात ऊसाची लागवड करायची, त्यासाठी त्यांनी नवीन पद्धतीने ऊस लावणी केली. रोशनलाल सांगतात की,’’माझ्या मनात विचार आला ज्या पद्धतीने शेतात बटाटे लावतात त्याच प्रमाणे ऊसाचे तुकडे लाऊन बघायचे. त्यांची ही पद्धत यशस्वी झाली आणि त्यांनी सलग १-२ वर्ष याच पद्धतीने शेती केली आणि ते यशस्वी झाले. या प्रमाणे त्यांनी कमी खर्चात ऊसाचे फक्त कलमच तयार नाही केले तर ऊसाचे उत्पन्न सरासरी पेक्षा २० पटीने वाढविले.,एवढेच नाही तर १ एकर शेतामध्ये ३५ ते ४० क्विंटल ऊस पेरणी करावी लागायची, त्यासाठी १० ते १२ हजार रुपये खर्च करावा लागायचा. छोटे शेतकरी ऊस लागवड करू शकत नव्हते, पण रोशनलालच्या ह्या नव्या पद्धतीमुळे एक एकर शेतामध्ये फक्त ३ ते ४ क्विंटल ऊसाचे कलम लावून चांगले उत्पन्न मिळू लागले.

ह्या पद्धतीमुळे छोटे शेतकरीच ऊस लावू शकत होते असे नाही तर त्या पासून त्यांना दुसरे फायदे पण मिळायला लागले. जसे शेतकऱ्यांचा वाहतुकीचा खर्च बराच कमी झाला, कारण त्यांचा ३५ ते ४० क्विंटल ऊस शेतात ट्रक्टर ट्राली मध्ये ने-आण करण्याचा खर्च वाचला आहे. या शिवाय ऊसाचे बियाणे सोपे आणि स्वस्त झाले होते. हळूहळू जवळपासचे शेतकरी पण ह्याच पद्धतीने ऊस लागवड करू लागले. आता दुसऱ्या राज्यात पण ह्या पद्धतीने ऊसाची लागवड केली जात आहे .


रोशनलाल इथेच थांबले नाही,तर त्यांनी बघितले हाताने ऊसाचे कलम करणे फार अवघड आहे म्हणून त्यांनी अशा मशीनचा विचार केला की ज्यामुळे हे काम सोपे होईल यासाठी त्यांनी कृषी तज्ञ आणि कृषी विज्ञान केंद्रात जाऊन त्यांचा सल्ला घेतला व ते स्वतः लोकल वर्कशॉप आणि अवजारांच्या कारखान्यात जाऊन मशीन बनविण्याची माहिती गोळा करत होते. शेवटी ते ‘सुगरकेन बड चीपर’ मशीन बनविण्यात यशस्वी झाले. सर्वप्रथम त्यांनी हाताने चालणारी मशीन तयार केली. जिचे वजन साडेतीन किलोग्रामच्या जवळ पास होते, आणि त्याने एक तासात ३०० ते ४०० ऊसाचे कलम तयार होऊ लागले. हळूहळू त्या मशीनमध्ये सुधारणा होऊ लागली. आता त्यांनी हाता ऐवजी पायाने चालणारी मशीन सुरु केली जी १ तासात ८०० ऊसाचे कलम करत होती. आज त्यांनी बनविलेली मशीन मध्यप्रदेशमध्ये तर विक्रीकरिता उपलब्ध आहेच, या व्यतिरिक्त महाराष्ट्र, ओरिसा, कर्नाटक, हरियाना आणि दुसऱ्या राज्यात सुद्धा विकली जात आहे. त्यांच्या मशीनची मागणी आपल्या देशाबरोबरच आफ्रिका आणि दुसऱ्या देशात पण खूप आहे. आज रोशनलालने बनविलेल्या मशीनचे विभिन्न मॉडेल १५०० रुपयापासूनच्या विक्री दराने बाजारात उपलब्ध आहे.

एकीकडे रोशनलालने बनविलेले मशीन शेतकऱ्यामध्ये प्रसिद्ध होत होते तर दुसरीकडे बरेच साखर कारखाने आणि फॉर्म हाउस त्यांच्याकडे विजेवर चालणाऱ्या मशीनची मागणी करत होते. त्यानंतर त्यांनी विजेवर चालवणारी मशीन बनवली जी १ तासात दोन हजार पेक्षा जास्त ऊसाचे कलम करत होती.आता या मशीनचा वापर ऊसाची नर्सरी बनविण्यासाठी होऊ लागला आहे.यामुळे कितीतरी लोकांना रोजगार मिळाला.

भारावलेले रोशनलाल इथेच थांबले नाही तर आता त्यांनी अशी मशीन विकसित केली की जिच्या वापरामुळे ऊसाची लागवड करणे सोपे झाले. ह्या मशीनला ट्क्टरच्या मागे जोडून २-३ तासात एक एकर शेतात ऊसाची पेरणी होते. पूर्वी ह्या कामाला खूप वेळ लागायचा तसेच मजुरांची संख्यापण जास्त असायची. हे मशीन निश्चित अंतराने आणि खोलवर ऊस लावायचे. याव्यतिरिक्त खतपण ह्या मशीनद्वारे शेतात टाकता यायचं. रोशनलालने ह्या मशीनची किमत १ लाख रुपयापर्यंत निश्चित केली आहे. त्यानंतर विभिन्न कृषी विज्ञान केंद्र आणि साखर कारखानदारांनी हे मशीन विकत घेण्यास रुची दाखवली. त्याच बरोबर त्यांनी ह्या मशिनच्या पेटेटसाठी निवेदन पण केले. आपल्या कौशल्यामुळे रोशनलाल यांना विभिन्न पुरस्कारांनी सम्मानित केले गेले. तसेच शेतकीय क्षेत्रातल्या संशोधनासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार पण मिळाला आहे.

लेखक : हरीश बिश्त

अनुवाद : किरण ठाकरे