आंध्रप्रदेशाला आता मिळाले आहे तृतीयपंथी कल्याण महामंडळ!

0

तामिळनाडू आणि केरळ यांच्या पावलावर पाऊल टाकत, आंध्र प्रदेशात आता तृतीयपंथीयांच्या विकासासाठी महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. ‘आंध्रप्रदेश हिजडा तृतीयपंथी कल्याण महामंडळ’ याची सुरूवात मागील गुरूवारी श्री वेंकटेश्वरा विद्यापीठ तिरूपती येथे झाली. त्यावेळी सुमारे शंभर तृतीयपंथी समाजाचे प्रतिनिधी  होते.


हे महामंडळ थेट लोकशाही पध्दतीने चालवले जाईल अशी अपेक्षा असून त्यात तृतीयपंथीयाना सरकारला त्यांच्या कल्याण योजना राबविण्यासाठी सूचना करण्याचा अधिकार असेल. कार्थिक बिट्टू कोंडीयाह, हे अशोक विद्यापीठात सह प्राध्यापक आहेत, त्यांनी सांगितले की, “ यामध्ये केवळ तृतीयपंथी महिलाच नाहीतर पुरुषांची देखील देखभाल केली जाईल. लैंगिक दृष्ट्या अक्षम व्यक्ती, आणि तृतीयपंथातील अल्पसंख्य समाजाला यात काम करण्यास तसेच शिक्षणाच्या सोयी सवलती घेण्यास प्राधान्य असेल. हे महामंडळ सरकारी असेल. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या उतरंडीची रचना नसेल. हे कल्याण मंडळ असेल ज्यात तरुण सदस्यांना त्याच्या ओळखीनुसार काम करण्याची संधी मिळेल.”

पुढचे पाऊल म्हणून, तृतीयपंथी समाजाला संरक्षण देणारे कायदे करण्याचा सरकार विचार करत आहे. या साठी रचना मुद्राबोईनी या काम करत असून त्यांना आशा आहेत की या मंडळाच्या माध्यमातून लैंगिक, मानसिक आणि शाररिक शोषणाचे प्रकार समाजाला जे सध्या भोगावे लागतात ते कमी होतील. हैसिनी ज्या तृतीयपंथी कार्यकर्ता आहेत त्या म्हणाल्या की, “ एप्रिल २०१४मध्य आलेल्या नाल्सा निवाड्यानंतर, येथे खूप काही करण्यासारखे शिल्लक राहिले आहे, ज्यावर अजूनही राज्य सरकारचे निर्देश प्राप्त व्हायचे आहेत. पदवीधरांना रोजगार मिळाले तर त्यांना त्याच्या पायावर उभे राहता येणार आहे. किंवा व्यवसायासाठी कर्ज, घरांचा प्रश्न आणि शिधावाटप पत्रिकांचे वितरण”.

या निर्णयाने, सामाजिक न्यायाच्या दिशेने मोठे पाऊल पडले आहे, ज्याचे राज्यातील तृतीयपंथी समाजाने स्वागत केले आहे.