‘माही’ने त्याच्या कारचा स्कूटीवरून पाठलाग करणा-या चाहतीला दिले खास गिफ्ट!

‘माही’ने त्याच्या कारचा स्कूटीवरून पाठलाग करणा-या चाहतीला दिले खास गिफ्ट!

Tuesday November 08, 2016,

2 min Read

देशाच्या क्रिकेटचा कर्णधार माही, म्हणजे महेद्रसिंग धोनी याला अत्याधुनिक बाईकची आवड आहे. भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचे देशभरात लाखो चाहते आहेत. धोनीने आजवर भारतीय संघासाठी केलेली कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. याशिवाय सामन्यात दबावाच्या क्षणी डोकं थंड ठेवून परिस्थिती हाताळण्याच्या कौशल्याने धोनीने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. धोनीच्या कामगिरीचे शब्दांत वर्णन करणे जितके कठीण आहे. तितकेच त्याच्या चाहत्यांना आपले धोनीवरच्या प्रेमाचे मोजमाप ठरवणे देखील अशक्य आहेत. नुकतेच भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्त्वाखाली न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका ३-२ अशी जिंकली. यातील चौथा सामना धोनीच्या रांची म्हणजेच त्याच्या घरच्या मैदानात खेळविण्यात आला.

धोनीला आपल्या वैयक्तिक आयुष्यात मॉर्डन बाईक्स आणि कारची देखील आवड आहे. त्याच्या ताफ्यात अनेक बाईक्स आणि विविध कार आहेत. मग चौथ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघ रांची विमानतळावर दाखल झाल्यानंतर धोनीने संघाच्या बस मधून हॉटेलमध्ये जाण्याऐवजी आपली हौस पूरवून घेतली. धोनी विमातळावरून आपल्या नव्या ‘हमर’ कारमधून निघाला. धोनी स्वत: ड्राईव्ह करत होता. धोनीची हमर कार पाहून उपस्थित चाहते काय, तर न्यूझीलंडचे खेळाडू देखील थक्क झाले होते.

image


सामना झाल्यानंतर पुढील सामन्यासाठी विमानतळाच्या दिशेने रवाना होतानाही धोनीने आपल्या ‘हमर’ कारनेच विमानतळ गाठायचे ठरवले. यावेळी धोनीच्या एका चाहतीने तर धोनीचा पाठलागच केला. आराध्या नावाच्या तरुणीने आपल्या स्कूटीवरून धोनीच्या ‘हमर’चा पाठलाग करण्याचे ठरवले. विमानतळाच्या टर्मिनलपर्यंत आराध्याने धोनीच्या ‘हमर’चा पाठलाग केला आणि धोनी जसा आपल्या कारमधून बाहेर आला त्यावेळी आराध्याने धोनी यांना मोठ्या आवाजात हाक मारली. मग धोनीनेही तिला प्रतिसाद देऊन आपल्या सुरक्षारक्षकांना तिला भेटायला येण्याची परवानगी देण्यास सांगितले. आराध्याला धोनीला जवळून पाहता आले आणि तिने आपल्या आवडच्या खेळाडूसोबत सेल्फी देखील टीपला. धोनीनेही त्यास कोणतीही हरकत दर्शविली नाही. धोनीसोबत सेल्फी घेता आल्याबद्दलचा आनंद आराध्याने व्यक्त केला. याशिवाय धोनी हा इतका मोठा खेळाडू असूनही त्याचे पाय अजूनही कसे जमिनीवर आणि तो किती विनम्र असल्याचे सांगितले.