केरळला आरोग्यपूर्ण आहार मिळावा म्हणून तरुण आयएएस प्रयत्नशिल!

0

टि. व्ही. अनुपमा या तरूण आय एएस अधिकारी सध्या केरळच्या अन्न सुरक्षा आयुक्त म्हणून कार्यरत आहेत, त्यांच्या या कामाचा भाग म्हणून त्यांना केरळ राज्यभर अन्नभेसळ करणारांविरुध्द धाडी घालाव्या लागतात, आणि असा उद्योग करणारांच्या कारवायांना त्यांनी मोठ्या प्रमाणात आळा घातला आहे. 


Image Source: Kenfolios
Image Source: Kenfolios

हे सारे १५ महिन्यांपूर्वी सुरु झाले, ज्यावेळी त्यांनी प्रसिध्द अन्नपदार्थाच्या ब्रँण्डवर धाडी घातल्या. अशी माहिती हाती आली की, ते ब्रँण्ड मोठ्या प्रमाणात अप्रमाणित पदार्थांची भेसळ करतात. धाड घातल्यानंतर त्या पदार्थांना मनाई करण्यात आली. त्यानंतर अनेक धाडी घालण्यात आल्या त्यातही काही भाज्या - फळांमध्ये किटकनाशकांचे अंश तीनशे टक्के पर्यत सापडले, जे प्रमाणाच्या बाहेर असल्याचे दिसून आले. त्यांच्या या कारवाईच्या माध्यमातून त्यानी न्यायालयासमोर जप्त केलेल्या वस्तूंच्या सहा हजार अश्या नमुन्यांना सादर केले ज्यात भेसळ केली जाते. त्यात ७५० व्यापा-यांवर खटले दाखल करण्यात आले. 

२०११मध्ये अन्न सुरक्षा विभाग सुरु केल्यानंतर, काही काळ या विभागाची घडी बसविण्यात गेला. स्त्रोत, कार्यालये आणि ब-याच गोष्टी जसे की विश्लेषण किंवा कार्य ज्यातून भेसळ शोधुन काढता येवू शकेल. याबाबत सांगताना अनुपमा म्हणाल्या की, “ ब-याच गोष्टी रोजच घडत असतात,मात्र त्यावर तातडीचा उपाय नसतो, कारण आम्हाला त्या नव्या असतात. आम्हाला माहिती असते की घातक किटनाशके वापरली जातात. पण आम्ही त्यापर्यंत कसे पोहचणार? लोकांना रोजच भाज्या लागतात, त्यांवर तुम्हाला बंदी घालता येत नाही. आम्हाला त्यावर वेगळी उपाय योजना केली पाहिजे.आम्ही त्याचा भाग आहोत. आम्ही त्यावर बोलतो, बैठकीत सादरीकरण करतो. मात्र त्यावर बाकी सर्वकाही समाज किंवा सरकारला करायचे असते. लोकांना जागृत केले जात आहे, आणि आम्ही सातत्याने नमूने गोळा करतो.( तपासणी नाक्यांवरून आणि बाजारातूनही.)”

अनुपमा यांना हे देखील माहिती आहे की, वेगवेगळ्या गुन्ह्याना वेगळ्या प्रकारे हाताळावे लागते. त्यावर बोलताना त्या म्हणतात,

“ त्यावेळी काही पदार्थांवर बंदी येते, केवळ काही प्रकाशात येतात, येथे अनेक प्रकारचे अन्न पदार्थ असतात, त्यांचे कायदे आणि चाचण्या वेगळ्या असतात, आम्हाला माहिती असतात की ते घातक आहेत, तुम्ही त्यांना एकाच तराजूत पाहता. यात काही सराईत  गुन्हेगारही काम करतात, त्यांच्याशी आम्हाला वेगळ्या प्रकारे वागावे लागते”.

एकदा मिडियात माहिती आली की, केरळी लोक मोठ्या प्रमाणात  जागृत होत आहे,  आणि आम्ही त्यांना विचार करण्यास भाग पाडतो त्यांनी कसे अन्न पदार्थ घ्यावे आणि कुणावर विश्वास ठेवायचा? सध्या त्यांचा कल स्वत:च भाज्या लावण्याकडे होत आहे, आणि त्याला सरकारने पाठिंबा दिला आहे. सरकारने त्यासाठी नुकतेच अनुदान घोषित केले जे स्वत:च भाज्या पिकवतील, त्यातून भाज्यांच्या खरेदीवर ७०टक्के परिणाम झाला, ज्या कर्नाटकातून किंवा तामिळनाडूमधून आणल्या जात होत्या.

२०१०,मध्ये अनुपमा खूपच  प्रकाशझोतात आल्या होत्या, ज्यावेळी त्यांनी नागरी परिक्षेत चवथा क्रमांक पटकाविला होता. त्यानंतर त्यानी पुन्हा लोकप्रियता आणि प्रसिध्दी मिळवली ज्यावेळी त्यांनी अन्न सुरक्षा या विषयात धडाकेबाज कृती केली. या लोकप्रियतेबाबत त्या सांगतात की, “ मला अशा प्रकारच्या उल्लेखाने अस्वस्थ व्हायला होते, मी माझ्या व्यक्तिगत एफबी पेजचा फारसा वापर करत नाही. व्टिटर नाही किंवा कोणतेही अधिकृत पेज वापरत नाही. मात्र त्याचवेळी मी सहजपणे उपलब्धही असते. हे बंधनकारक असते की आम्ही सारे आदेश लोकांना समजावे म्हणून जाहीर केले पाहिजेत. जेंव्हा भेसळचे प्रकरण येते, आम्ही ते संकेतस्थळावर मांडतो. मला अश्या प्रकारच्या प्रतिसादाची अपेक्षा नसते ज्यावेळी तुमच्या व्यक्तित्वावर अतिक्रमण केले जाते ती वेळ फारच असह्य असते. माझे कुटूंब त्याला बळी पडते. सुदैवाने ते पाठिंबा देणारे आहेत, ब-याच प्रमाणात सहकारी देखील तसेच लोकही”.

या दयाळू आणि प्रामाणिक तरुण महिला अधिका-याने सिध्द केले आहे की एकमेव माणसाच्या कृतीनेही बदल घडविला जावू शकतो.

- थिंक चेंज इंडिया