विक्रम अग्निहोत्री यांना भेटा, पहिले हात नसलेले व्यक्ती ज्यांनी वाहन परवाना मिळवला आहे!

0

इंदूरचे विक्रम अग्निहोत्री यांना दोन्ही हात नाहीत, ते सात वर्षांचे असताना एका दुर्घटनेत त्यांनी हात गमावले. परंतू त्यातून उमेद न हारता त्यांनी जी कामे हाताने करत असत ती पायाने करण्याचे कसब प्राप्त केले. त्यामुळे त्यांना कधी हाताची उणिव भासली नाही. त्यांनी साधारण मुलांप्रमाणे शिक्षण घेतले, मास्टर पदवी पर्यंत शिकले आणि सध्या गॅस एजन्सी चालवितात आणि प्रेरक वक्ता म्हणून काम करतात.


जरी विक्रम हातानी सगळी कामे करत असले तरी, एका बाबीवर त्यांनी तीन वर्षापूर्वी फारसे लक्ष दिले नव्हते—वाहन चालविण्यास शिकणे जेणे करून त्यांना कुणावर अवलंबून राहावे लागू नये. एका वृत्ता नुसार ते म्हणाले की, “ माझ्या जवळ पूर्णवेळ वाहन चालक होता, मात्र नंतर मला जाणवले की, आपण असे इतरांवर अवलंबून का रहावे? जेणे करून मला मुलभूत गोष्टीसाठी अडून रहावे लागेल.”

मग त्यांनी स्वयंचलित गियरची कार विकत घेतली, मात्र ती कशी चालवायची याचे ज्ञान त्यांना नव्हते आणि त्यासाठी कुणी त्यांना मदत देखील करत नव्हते. कोणत्याही वाहन चालविण्याच्या संस्थेने त्यांना मदत करण्यात रस दाखवला नाही, एका अपंग व्यक्तीला ते शिकवू शकत नव्हते. मात्र या अडथळ्याने देखील त्यांना फारकाळ अडवणूक करून राहता आले नाही. त्यांनी ऑनलाइन व्हिडीओ पाहून शिकण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या अडचणींचा काही अंत होत नव्हता. त्यांना परिवहन विभागातील अधिकारी वर्गाने वाहन चालविण्याचा परवाना देता येणार नसल्याचे सांगितले. कारण तसे कायद्यानुसार त्यांना करता येत नव्हते.

त्यानंतर विक्रम यांनी या लढ्यात उतरण्याचे ठरविले, आणि न्यायालयात दाद मागितली की कायद्यात दुरूस्ती करावी जेणे करून त्यांच्या सारख्या लोकांना वाहन परवाना मिळावा. हा परवाना मिळेपर्यंत त्यांनी २२ हजार किलो मिटर वाहन चालविले होते आणि लवकरच त्याची नोंद लिम्का बूक मध्ये देखील होणार आहे.

सध्या ‘विक्रम विटल स्पार्क वेलफेयर सोसायटी’ या संस्थेचे अध्यक्ष आहेत, ज्यामध्ये ते प्रेरक विचार आणि प्रशिक्षण देतात, व्याख्याने, आणि उद्योग जगतातील शाळकरी विद्यार्थ्यांच्या कार्यशाळा घेतात.

विक्रम स्वत: पोहतात आणि फूटबॉलही खेळतात, आणि या सा-यां साठी त्यांच्या मित्रांचा आणि कुटूंबियांचा त्यांना नेहमीच पाठींबा असतो, जो बहुतांश शारिरीक दृष्ट्या दुर्बल व्यक्तींना भारतात आभावानेच मिळतो. याबाबत मुलाखती दरम्यान ते म्हणतात की, “ मी भाग्यवान आहे कारण मला पाठींबा देणारी माणसे माझ्या सभोवताली आहेत. त्यामुळे मी माझ्या उणिवांवर मात करू शकतो. त्यामुळे मला हात नाहीत याचा विषाद मला कधीच वाटला नाही. मला कुणी हिणवत नाही किंवा टोमणे मारत नाही, केवळ प्रोत्साहनच मिळत राहीले आहे.”