पडद्या बाहेरच्या विश्वातही तारे म्हणून चमकण्याचे धाडस दाखवणारे कलावंत!

उद्यमीकौशल्याचे अभिनव उदाहरण देणारे प्रसिध्द कलावंत खेळाडू

पडद्या बाहेरच्या विश्वातही तारे म्हणून चमकण्याचे धाडस दाखवणारे कलावंत!

Wednesday July 27, 2016,

4 min Read


या चेह-यांना आपण आतापर्यंत पडद्यावर देशभक्त, डॉक्टर, खलनायक, गायक, झोपडीत राहणारा गरीब अशा वेगवेगळ्या भूमिकांतून पाहिले असेल. परंतू आपणांस हे माहिती आहे का की आमचे हे सेलिब्रिटी सफल उद्योजक म्हणून वास्तवात आणखी एक यशस्वी भूमिका साकारत आहेत. या आम्ही आपला परिचय करून देतो अश्याच दहा अभिनेता-अभिनेत्रींशी जे आज कुशल अभिनयाशिवाय पडद्याबाहेरच्या जगात यशस्वी उद्यमीसुध्दा आहेत.

शिल्पा शेट्टी

आपल्या मादक अदा आणि आकर्षक देहयष्टीने युपी-बिहार लुटणा-या शिल्पा यांची गणना बॉलोवूडच्या त्या अभिनेत्रींमध्ये होते ज्या एकीकडे कुशल गृहिणी आहेत, तर दुसरीकडे कुशल उद्यमी देखील. राजस्थान रॉयल्समध्ये शिल्पा यांची भूमिका जगजाहीर आहेच, त्याशिवाय शिल्पा आज अनेक स्पा च्या साखळीचे संचालनही करत आहेत. आपणांस हेदेखील सांगायला हवे की, एकेवेळी शिल्पा यांनी आभुषणांच्या व्यवसायात देखील आपला जम बसविण्याचा प्रयत्न केला होता. सन २०१४मध्ये त्यांची कंपनी इसेंशियल स्पोर्टस ऍण्ड मिडिया ने एका सिनेमाची निर्मितीदेखील केली होती.

image


सुनील शेट्टी

सुनील शेट्टी यांनी ज्या प्रकारे मोठ्या पडद्यावर नाव मिळवले त्या प्रमाणेच उद्योगांच्या दुनियेतही त्यांनी प्रसिध्दी मिळवली आहे. आज जिथे त्यांना त्यांच्या रेस्तरॉंसाठी ओळखले जाते तिथेच दुसरीकडे ते एक कुशल निर्माता सुध्दा आहेत आणि आता कपडे तसेच शोभिवंत घर सजावटीच्या वस्तू (होम डेकोर)च्या व्यापार क्षेत्रातदेखील नशिब अजमावत आहेत.

सुष्मिता सेन

माजी मिस युनिवर्स सुश्मिता सेन या सुध्दा एक सफल उद्यमी आहेत. त्या दुबईत एका किरकोळ दागिन्यांच्या दुकानाच्या मालकीण आहेत. त्याच बरोबर नजिक भविष्यात त्या हॉटेल आणि स्पाच्या क्षेत्रात देखील उतरण्याचा विचार करत आहेत.

जॉन अब्राहम

आपल्या आरोग्याबाबत सजग राहणा-या अभिनेत्यांमध्ये गणती होणारे जॉन अब्राहम त्यावेळेपासून उद्यमी होण्याचा विचार करत आहेत, ज्यावेळी सिनेमा शिवाय अन्य बाबींचा विचारही कुणी केला नसेल. आपणांस सांगावे लागेल की त्यांची निर्मितीसंस्था जे ए प्रॉडक्शनच्या माध्यमातूनच त्यांना एनडीटिव्ही प्रॉफिट ऍवॉर्ड मिळाला आहे. असे सांगण्यात येते की येत्या काही काळात जॉन ब्रिटिश बॉक्सिंग लिजेंट डेविड हाय यांच्यासोबत भागिदारीत एक फिटनेस संस्था सुरू करत आहे ज्यात बॉक्सिंगचे कौशल्य शिकवले जाईल.

लारा दत्ता

बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री समजल्या जाणा-या लारा यांची ओळख वेगळी करून देण्याची गरज नाही. माजी ब्युटी क्विन जिथे एक कुशल अभिनेत्री आहे तिथेच स्वत:ला कुशल उद्यमी म्हणून देखील प्रस्थापित केले आहे. लारा आजा भिगी बसंती नावाच्या निर्मिती संस्थेच्या मालकीण आहेत. याशिवाय लारा यांनी छाबडा५५५ यांच्या सोबत देखील आपल्या साडी कलेक्शन आणि एक फिटनेस डिविडीचे अनावरण केले आहे.

ट्विंकल खन्ना

सध्याच्या काळात व्टिंकल खन्ना यांची गणती त्या अभिनेत्रींमध्ये केली जाते ज्या हे मिथक तोडण्यात यशस्वी झाल्या आहेत की एक अभिनेत्री ऍक्टिंगशिवायही बरेच काही करू शकते. डीएनए इंडिया आणि दी टाइम्स ऑफ इंडिया यांच्यासाठी नियमित स्तंभलेखन करणा-या ट्विंकल ‘मिसेस फनिबोंस’ च्या माध्यमातून आपल्या लेखनाचे प्राविण्य दाखवत आहेत. या शिवाय सिनेनिर्मिती क्षेत्रातही त्यांनी आपले नाव कमाविले आहेच. आज त्यांची कंपनी ग्रेटिंग गोट यश मिळवत आहे. त्याच बरोबर मुंबईत बेस आणि अंतर्गत सजावटीच्या क्षेत्राशी संबंधित ट्विंकल यांची कंपनी व्हाईट विंडो देखील चांगलीच परिचित आहे.

आज जेंव्हा बॉलिवूडच्या या दिग्गजांनी आपल्या सुरक्षित कोशातून बाहेर पडून यशाच्या नव्या कमानी उभारल्या आहेत, तेंव्हा तारकांची दुसरी दुनिया समजल्या जाणा-या खेळाची मैदानेदेखील या पासून अस्पर्श राहिली नाहीत. खेळाच्या क्षेत्रातही काही चेह-यांनी आपली नवी ओळख कुशल उद्यमी म्हणून निर्माण केली आहे. यशाचे सुक्ष्म अवलोकन करणारे आणि त्याला समजून घेणारे हे खेळाडू आज असे बरेच काही करुन चुकले आहेत की, ज्याच्या स्मृती दीर्घकाळ स्मरणात राहाव्यात.

image


वीरेन्द्र सहवाग

एकीकडे जिथे आपल्या धडाकेबाज खेळीने प्रतिस्पर्धी संघात धडकी भरविण्याचा पराक्रम करणा-या विरेंद्र सहवाग यांना आपण क्रिकेटपटू म्हणून ओळखतो, तर दुसरीकडे समाजासाठी देखील ते चांगले कार्य करत आहेत. सहवाग यांनी हरियानातील झज्जरमध्ये सहवाग इंटरनॅशनल स्कूल सुरू केले आहे जेथे हा प्रयत्न केला जातो की, येथे शिकलेल्या काही विद्यार्थ्यांच्या माध्यमातून देशाचे उज्वल भवितव्य निर्माण व्हावे.

ज़हीर खान

एक चांगले गोलंदाज म्हणून स्वत:चे स्थान निर्माण करणा-या जहीर यांनी क्रिकेट शिवाय आपल्या रेस्तरॉं झेड साठी देखील आपली ओळख कमाविली आहे. हे लक्षणिय आहे की सन २००५ मध्ये जहीर यांनी त्याची सुरुवात पुण्यात केली होती. आपणांस माहिती असेल की आतिथ्य व्यवसायात जहीर यांच्या रेस्तरॉंचे मोठे नाव आहे.

सानिया मिर्ज़ा

आपल्या चपळतेने कोर्टवर प्रतिस्पर्धी खेळाडूला नामोहरम करणा-या आणि दररोज यशाच्या नव्या पताका झळकवणा-या सानिया मिर्जा यांची ओऴख कुणाला करून द्यावी लागत नाही. टेनिस शिवाय सानिया यांना कॉफीवरही प्रेम आहे आणि याच कॉफीने त्यांना उद्यमी बनविले आहे. सानिया यांनी हैद्राबादमध्ये आपले कॉफीशॉप सुरू केले आहे ज्याचे नाव रिस्टरेट्टो कॉफी शॉप आहे. सांगितले जाते की सानिया लवकरच विशाखापट्टणम शिवाय सा-या दक्षिण भारतात या कॉफी शॉपच्या शाखा सुरू करणार आहेत. याशिवाय त्यांचे स्वप्न असलेल्या प्रकल्प सानिया मिर्जा टेनिस अकादमीला देखील लोकांच्या प्रशस्तीचा प्रतिसाद मिळत आहे.

इतकी माहिती घेतल्यानंतर आम्हाला हे सांगताना अतिशयोक्ती होणार नाही की, स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती पाहणे, आणि त्यांचा पाठलाग करणे आवश्यक आहे. असे म्हणता येईल की आपल्या सुरक्षित कोशातून बाहेर पडून आमच्या या तारे-तारकांनी स्वत:ला यशस्वी उद्यमी म्हणून स्थापित केले आहे. त्यातून इतरांसाठी एक उदाहरण घालून दिले आहे ज्यातून प्रेरणा मिळत राहते.

या सारख्या आणखी काही यशस्वी उद्यमींच्या कहाण्या वाचण्यासाठी YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

अनेक फिल्मी ताऱ्यांचे सौंदर्य खुलवणाऱ्या शुभा धर्माना

रॅकेटची राणी हा शाहरुख खाननं नवीन सन्मान दिला टेनिसपटू सानिया मिर्झाला. सानियाची आत्मकथा ‘एस अगेन्स्ट ऑड्स’ प्रकाशित

त्रासदायक बालपणापासून भारतासाठी खेळण्यापर्यंत : सुरेश रैना एक कहाणी

लेखिका : दिशा कथुरिया

अनुवाद : नंदिनी वानखडे -पाटील