ठाण्यातील ही शाळा आज्जींना शिक्षण देते, सर्वाधिक वयस्कर विद्यार्थीनी ९० वर्षांची

ठाण्यातील ही शाळा आज्जींना शिक्षण देते, सर्वाधिक वयस्कर विद्यार्थीनी ९० वर्षांची

Monday February 13, 2017,

3 min Read

आजी बाईंची शाळा, अशी शाळा जी केवळ वृध्द महिलांसाठीच आहे. सध्या सा-या माध्यमातून आणि समूह माध्यमातून चर्चेचा विषय झाली आहे. येथील विद्यार्थीनीचे वय आहे ६० ते ९० दरम्यान. याची सुरुवात केली आहे, योगेंद्र बांगर आणि मोतीराम दलाल धर्मादाय संस्थेने. ठाणे जिल्ह्यात सुरु केलेल्या या उपक्रमाने फांगणे आणि आजूबाजूच्या भागात कुतूहल आणि संवेदना जागविल्या आहेत. अशा प्रकारची ही देशातील पहिलीच शाळा आहे जी आजीबाईंसाठी आहे, ज्यांना शिकण्याची संधी कधीच मिळाली नाही.


image


ही शाळा दिवसांतून दोनच तास भरते, आणि सारे विद्यार्थी ठराविक गुलाबी साडीचा गणवेश घालून येतात. त्याबाबत बोलताना मोतीराम दलाल धर्मादाय संस्थेचे संस्थापक दिलीप दलाल म्हणाले की, “ आम्ही ही शाळा सुरू केली ती वडीलधा-यांबद्दल आदराची आणि सन्मानाची भावना वृध्दींगत व्हावी म्हणून.” संस्थेचा हेतू आहे की वडीलधा-या व्यक्ति देखील समाजात महत्वाच्या आहेत.

८ मार्च २०१६ला जागतिक महिला दिनी सुरुवात झालेल्या या उपक्रमात, शाळेत २७ विद्यार्थिनी आहेत. ज्या एकत्रित बसून वाचतात, लिहितात, आणि मराठी शिकतात. ९० वर्षांच्या सिताबाई देशमुख या सर्वात वयाने मोठ्या विद्यार्थीनी आहेत. त्या म्हणाल्या की, “ माझ्या आयुष्यात कधीच मला वाटले नाही की शाळेत जाण्याची संधी मिळेल. ज्यावेळी मी लहान होते, माझे कुटूंबिय गरीब होते आणि मुलीना शिकवण्याची आमच्याकडे प्रथाच नव्हती. या शाळेत येवून मला नवे जीवन मिळाले आहे.” सिताबाई यांच्या सोबत नेहमी त्यांची नात अनुश्का असते. जी आज्जीला तिच्या गृहपाठासाठी मदत करते. त्याबाबत बोलताना ही लहानगी म्हणाली की, “ आम्हाला दोघींना एकत्र शिकताना मजा येत आहे.”

प्रजासत्ताक दिनी शाळेचा वर्ग मोठ्या जागेत सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आज्जी विद्यार्थिनींचा उत्साह वाढला आहे. तेथील लहान मुलांसोबतच त्यानी प्रजासत्ताक दिन साजरा केला आणि राष्ट्रध्वजाला मानवंदनासुध्दा दिली. “ मला हे पाहून आनंद आणि अभिमान वाटला की, आज्जी या सा-या कार्यक्रमात सहभागी होतात, तेही विदयार्थिनी म्हणून.” दलाल यांनी विनम्रपणे सांगितले.

योगेंद्र बांगर, ज्यांनी हा अभिनव उपक्रम सुरु केला, त्यांनी सांगितले की, “ गावातील सारेजण आम्हाला प्रोत्साहन देतात, कुणीही शाळेला कधी शब्दानेही हरकत घेतली नाही. उलट लोक म्हणतात, या पूर्वी कधी कुणी काही केले नाही. पण तुम्ही हे करता आहात ते समाजाच्या हिताचे आहे.आम्ही तुमच्या सोबत आहोत.” या सा-या प्रतिसादाने आनंद व्यक्त करताना बांगर म्हणतात की, “ ज्ञानाला जीवनात वेगळेच महत्व आहे. या ज्येष्ठांना शिकवणेही मोलाचे आहे, ज्यांना कधीच ती संधी मिळाली नाही. आम्ही त्यांच्या जीवनात आनंद देण्यासाठी ही शाळा सुरु केली. आणि गावाला त्यामुळे शंभर टक्के साक्षर करता येणार आहे. आम्ही काही सक्रीय उपक्रम देखील राबविण्याचे ठरविले आहे जे त्यांना करता येतील जसे की कागदाच्या पिशव्या बनविणे.”

कांतीबाई मोरे, ६५ वर्षीय आनंदी विद्यार्थीनी म्हणाल्या की, “ आता आम्ही सा-या वयोवृध्द विद्यार्थीनी एकाच वर्गात आहोत, आम्हाला सा-या जणींना बागकामात मजा येते. आम्ही दिवसभराच्या दौ-यावरही जातो. दिलीपजी यांनी आम्हाला पिकनिकला नेण्याचेही वचन दिले आहे.ज्याची आम्ही सा-याजणी आतूरतेने वाट पाहात आहोत.”