मिरीचा स्प्रे तयार करून तो स्वसंरक्षणासाठी कसा वापरावा याचे प्रशिक्षण देणाऱ्या आयपीएस अधिकारी

मिरीचा स्प्रे तयार करून तो स्वसंरक्षणासाठी कसा वापरावा याचे प्रशिक्षण देणाऱ्या आयपीएस अधिकारी

Monday August 21, 2017,

2 min Read

सौम्या सांबशिवन, सिमला येथील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी ज्या सिमूर येथील महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देतात आणि मिरीपासून स्प्रे तयार करण्याचे प्रशिक्षण देतात. हा मिरीचा स्प्रे अर्धातास प्रभाव दाखवतो आणि त्या दरम्यान कुणालाही डोळे उघडणे अशक्य असते.


image


हिमाचल प्रदेशच्या राजधानीचे हे शहर अलिकडेच बातम्यांमध्ये झळकले ते अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि खून प्रकरणांमुळे, जिला कोलथाई जिल्ह्यातून ४जुलै रोजी पळवून आणले होते, तिचे शव नंतर जंगलात सापडले. या गुडीयाला न्याय देण्यासाठी राज्यात आंदोलने झाली. त्यानंतर पोलिसांना गुन्हेगार शोधण्यात यश आले नाही आणि जनतेच्या दबावामुळे त्यांच्या बदल्या करण्यात आल्या.

संशयावरून सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आणि जिल्हा पोलिस प्रमुख डि डब्ल्यू नेगी यांची बदली करण्यात आली आणि त्या जागी सौम्या यांना आणण्यात आले. त्यामुळे सौम्या या सिमला येथे रूजू होणा-या पहिल्या महिला पोलीस अधिकारी ठरल्या आहेत. या पूर्वी त्यांना हिमाचल प्रदेशच्या सिरमूर जिल्ह्यात दोन वर्षांसाठी नेमणूक करण्यात आली होती, तेथे त्या कडक शिस्त आणि स्वभावाच्या अधिकारी म्हणून परिचित होत्या. त्या नेहमी त्यांच्या धडक कृती आणि गुन्हेगारीला लगाम घालण्यात अग्रेसर म्हणून नावारूपाला आल्या, ज्यामुळे पोलीस दलाचा दरारा त्यांनी वाढविला.

२०१०च्या आयपीएस तुकडीच्या अधिकारी असलेल्या सौम्या यांनी अमली पदार्थाच्या माफियांविरोधात कठोर अभियान सुरू केले, त्यापैकी अनेकांना गजाआड देखील केले. त्यांच्या कार्यकाळात त्यानी सहा खूनाच्या प्रकरणांचा छडादेखील लावला, सिरमूर जिल्ह्यातून त्यांचे नाव राष्ट्रपती पदकासाठी शिफारस करण्यात आले. महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्याच्या त्यांच्या कामामुळेही त्या परिचित आहेत. त्यात त्यांनी मिरीचा स्प्रे तयार करून तो स्वसंरक्षणासाठी कसा वापरावा याचे प्रशिक्षण महिलांना दिल्याने त्या चर्चेत आल्या.

    Share on
    close