एक्सेल शीट ते कॉफी बिन्स बनवण्यापर्यंचा त्यांचा एकत्र प्रवास ! एक नर्तिका तर दुसरी तत्वज्ञानाची विद्यार्थिनी. या दोघींनी सुफी संत बाबा बुदान यांना वाहिलेली अनोखी श्रद्धांजली!!

एक्सेल शीट ते कॉफी बिन्स बनवण्यापर्यंचा त्यांचा एकत्र प्रवास !  एक नर्तिका तर  दुसरी तत्वज्ञानाची विद्यार्थिनी. या दोघींनी सुफी संत बाबा बुदान यांना वाहिलेली अनोखी श्रद्धांजली!!

Thursday May 05, 2016,

4 min Read

मृणाल शर्मा आणि साधवी अश्वनी, महाविद्यालयीन मैत्रिणी ! २०१३ साली त्यांनी 'बाबा'ज बिन्स'ची स्थापना केली. त्यांनी कॉफीच्या बिया वेगवेगळ्या प्रांतामधून आणून स्वत:चे वेगळे असे मिश्रण तयार करून कॉफीचा स्वाद अधिक लज्जतदार बनवला. १६व्या शतकातील सुफी संत बाबा बुदान यांच्या नावावरून त्यांनी आपल्या या नवीन मिश्रणांच नाव ठेवलं बाबा'ज बिन्स. बाबा बुदान यांच्यासंदर्भातील एक आख्यायिका आहे ती म्हणजे त्यांनी आपल्या काठीमध्ये कॉफीच्या सात बिया लपवून आणल्या आणि आपल्या परसदारी लावल्या. आज तेच शहर चिकमंगळूर म्हणून ओळखलं जात. बाबा'ज बिन्स ही त्यांना वाहिलेली श्रद्धांजली... कारण भारतात कॉफीची ओळख त्यांनी करून दिली असे मानले जाते. इथल्या मातीचा गुणधर्म म्हणजे ती पदार्थांमध्ये आपला आत्मा रुजवते आणि ज्यामुळे इथले खाद्यपदार्थ अधिक रंजक बनतात. मृणाल ही भरतनाट्यम नर्तिका आहे आणि ती त्यावेळी केपीएमजी या कंपनीत ऑडीट एनॅलिस्ट म्हणून काम करत होती जे अर्थात तिला अत्यंत कंटाळवाणं वाटू लागलं होतं. तर दुसरीकडे साधवी ही त्यावेळी दिल्ली विद्यापीठातून तत्वज्ञानाचा अभ्यास करत होती. विशीतल्या या दोन महाविद्यालयीन मैत्रिणीचा होरा स्वत:चं काहीतरी वेगळं करण्याचा आणि कॉफी पिण्याची या दोघींनाही आवड, त्यामुळे या आवडीतून आणि इच्छेतून साकारलं गेलं त्याचं हे स्वप्न!


त्यांच्या कॉफीच्या बिया येतात त्या कुर्ग आणि चिकमंगळूर मधून. या दोघीही कॉफी बागायतदारांशी खूप चर्चा करून, प्रश्न विचारून आणि कॉफी संदर्भात स्वत:चं ज्ञान वाढवून घेत होत्या. " आम्ही त्यांना खूप मुर्खासारखे प्रश्न विचारायचो आणि हे आता कुठे आम्हाला समजायला लागलं आहे ." साधवी सांगत होती. कॉफीचं हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आणि त्यासंदर्भात अधिक माहिती मिळावी यासाठी स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यापूर्वी त्यांनी बेंगळूरूमध्ये कॉफी बोर्ड मध्ये व्यावसायिक प्रशिक्षण सुद्धा घेतलं. " सर्वात रंजक गोष्ट म्हणजे त्या वर्गात फक्त आम्ही दोघीच होतो त्यामुळे आम्ही खूप प्रश्न विचारायचो. त्या वर्गात मिळालेलं पुस्तकी ज्ञान आणि विविध कॉफी इस्टेट मधल्या बागायतदारांशी संवाद यामुळे आमच्या ज्ञानात अधिक भर पडली .." मृणाल म्हणाली.

या दोघींनीही त्या कॉफी क्लास मध्ये मास्टर्स डिग्री मिळवली. कॉफी या पेयाबद्दल असलेली आस्था आणि कॉफीविषयी त्यांना मिळालेली माहिती त्या आपल्या ग्राहकांना सुद्धा हमखास देतात. त्यांचा व्यवसायात असलेला चाणाक्षपणा आणि कॉफी प्रसिद्ध करण्यासाठी वापरलेल्या निरनिराळ्या कल्पना यामुळे त्या अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या आहेत. नुकतंच त्यांनी सुप्रसिद्ध शेफ टीआर अरुण कुमार यांच्यासमवेत त्यांच्या तटवर्तीय खाद्यपदार्थांच्या जोडीला त्यांच्या कॉफीच्या वेगवेगळ्या चवींचं सादरीकरण केलं." कॉफीची चव ही वाइन प्रमाणे घ्यायची असते. पण या मिश्रणामध्ये अधिक गडद चव तुम्हाला चाखायला मिळू शकते. एखाद्या अस्सल निष्णात कॉफी पिणाऱ्या रसिकांसाठी वैयक्तिक आवड, धुम्रपान करणारे अथवा न करणारे, शाकाहारी या सर्व बाबींवर लक्ष केंद्रित करून मगच बनतो कॉफीचा एक अप्रतिम अनुभव !" साधवी त्यांच्या ग्राहकांसाठी त्यांची चव, त्यांचं अंदाजपत्रक आणि आहाराच्या सवयी आदी बाबी लक्षात घेऊन कॉफीच्या विशेष चवी निर्माण करतानाचे अनुभव सांगत होती.

तर मृणाल म्हणते ,"आपला देश हा कृषिप्रधान देश आहे आणि आमच्या दृष्टीपथात भारतात उगवणाऱ्या कॉफीचं पिक सर्वोत्तम आहे. अगदी सुरुवातीपासून आम्ही ठरवलं होत की आम्ही भारतीय कॉफीच्याच बियांवर प्रयोग करणार आहोत कारण त्यात अनेक प्रकारांच्या शक्यता आहेत. आम्ही स्वत: निवडून, ताज्या बिया भाजून, दोनदा तपासणी करून, सुगंधी कॉफीचा पुरवठा आमच्या ग्राहकांच्या घरी करतो." साधवीनं मधेच येउन उत्साहात सांगायला सुरुवात केली.

image


बाबा'ज बिन्स मधल्या या मुलींसाठी कॉफी हा विषय उर्जेचं, चवीचं, मोहकता आणि उत्तेजन या सर्व बाबी पुरवणारा केंद्रबिंदू आहे ." कॉफी क्षेत्रातला आमचा प्रकल्प हा आमच्या कॉफीवरच्या प्रेमासारखा आहे, त्याचबरोबर आमच्या ग्राहकांना आमचा हा नवनवीन अविष्कार समजावा, त्यांना पचावा आणि त्यांच्या जिभेला याची सवय व्हावी ही सतत उसळणारी अंत:प्रेरणा आमच्या या प्रकल्पाला कारणीभूत ठरली." साधावी सांगत होती. " आम्ही व्यावसायिक म्हणजेच बी टू बी क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे. दिल्लीतल्या अनेक कॅफे, हॉटेल्स, कार्यक्रम आदींमध्ये आमच्या कॉफीचा स्वाद घेतला जातो." ती पुढे सांगत होती. आता यापुढचं पाउल म्हणजे, बी २ सी म्हणजे बिजनेस टू कस्टमर, क्षेत्रात त्यांना विस्तार करायचा आहे. त्यासाठी कॉफी किऑस्क आणि कार्यशाळा यांच्यावर त्या भर देत आहेत. कॉफीच्या बियांची प्रात्यक्षिकं लोकांना दाखवून, भाजण्याची प्रक्रिया त्यांच्यासमोर सादर करून विविध मिश्रण खवैय्यांसमोर मांडण्यासाठी या कार्यशाळा त्या सुरु करणार आहेत . दरवर्षी २८ सप्टेंबर रोजी होणारा राष्ट्रीय कॉफी दिवस त्या काटेकोरपणे साजराही करतात आणि त्यादिवशी त्या कॉफीचे नमुने सुद्धा वाटतात.

image




सध्या त्या इ-कॉमर्स पोर्टल आणि त्यांच्या फेसबुक पेज वरून विक्री करतात. बाबा'ज बिन्स आता लवकरच दिल्ली बाजारपेठेतल्या कॅफे आणि स्टोअरमध्ये सुद्धा उपलब्ध होणार आहेत. त्यांच्या उत्पादनाविषयी बोलताना त्या सांगतात," आमचं प्रत्येक उत्पादन म्हणजे उदाहरणादाखल सांगायचं झालं तर, रोस्टर बुस्टर ब्लेंड हे बिया उत्कृष्टपणे भाजणं म्हणजे काय हे दर्शवत. आता ही म्हणजे अगदी उच्च प्रतीची कॉफी आहे असं नाही तर रोजच्या धावपळीत हवी असणारी कडक कॉफी मात्र नक्कीच आहे. आर्सेनल हे दोन जातींच मिश्रण आहे ज्यामध्ये एक आहेत धुतलेल्या बिया आणि दुसऱ्या म्हणजे उन्हात कडकडीत वाळवलेल्या बिया. हे मिश्रण कॅपॅचीनोसाठी कडक कॉफी देतं. आणि यामध्ये दुध मिसळलं तरी कॉफीचा मुळ स्वाद तसाच राहतो आणि दुधाने त्याची लज्जत अधिक वाढते." त्याचं पुढचं ध्येय आहे ते म्हणजे कॉफीच्या या बिया दिल्लीमध्ये स्थानिक पातळीवर भाजून घेणे. ज्यामुळे त्यांना त्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवता येईल त्याचबरोबर त्यांना उत्तरेकडच्या राज्यात नवनवीन चवी आणि मिश्रण यांची सवय लोकांना करवून द्यायची आहे. 

यासारख्या आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा :

दोन क्रिएटीव्ह महिलांनी घेतलाय क्रिएटीव्ह नाशिक बनवण्याचा ध्यास

एका विरामानंतर नव्याने कारकीर्दीस सुरुवात करणाऱ्या महिलांना मदत करण्याचे लक्ष्य...

पाच अॅसिड हल्ला पीडित महिलांची ताजमहालाच्या सौंदर्याला टक्कर देणारी कामगिरी ‘शिरोज हँगाऊट’!

लेखक : इंद्रोजित डी चौधरी

अनुवाद : प्रेरणा भराडे