विनीत राय यांच्या ‘अविष्कारा’तून ‘इंटेलकँप’ ‘अविष्कार’!

0

विनीत राय शालेय अभ्यासात एक सामान्य विद्यार्थी राहिले, पण केवळ वयाच्या २४व्या वर्षी त्यांनी सीईओ होऊन हेच दाखवून दिले आहे की, शाळेत पहिला नसलेले देखील जीवनात पहिले यशस्वी होऊ शकतात. त्यासाठी हाती घेतलेल्या कामाबाबत निष्ठा, प्रामाणिकपणा आणि दृढ इच्छाशक्ती मात्र हवी. त्यामुळेच ज्या गोष्टी मनात होत्या त्यात विनीत आज मिळवू शकले.

अविष्कार
अविष्कार

विनीत यांचा जन्म जोधपूरचा. भारत-पाक सीमेजवळ असल्याने सेनेची वर्दळ त्या भागात नित्याचीच होती. देशाच्या सैनिकांना पाहताना त्यांच्या मनात देखील सैन्यात जाण्याची इच्छा निर्माण झाली. मात्र त्यांची निवड होऊ शकली नाही. त्यामुळे ते खूप नाराज आणि उदास झाले. मग त्यांनी विक्री प्रतिनिधीची नोकरी सुरु केली, मात्र लवकरच त्यांना लक्षात आले की, हे क्षेत्र त्यांच्यासाठी नाही. मग एका मित्राच्या सल्ल्याने त्यांनी ‘इंडियन इंन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मँनेजमेंट’ मध्ये प्रवेश घेतला. अभ्यास पूर्ण होताच त्यांनी बल्लारपूर इंडस्ट्रीत नोकरी सुरू केली. ही कंपनी कागदनिर्मितीसाठी प्रसिध्द होती. वनविभाग खाजगी कारखान्याला आपली जागा वापरण्यास देत होता, तेथून ते बांबू कापून कारखान्यात आणत होते. हे काम पूर्णत: नवे आणि जबाबदारीचे होते. एक वर्ष इथे घालवल्यावर विनीत यांची बदली बोइंदा जिल्ह्यात झाली. तिथली परिस्थिती खूपच वाईट होती. ना पाणी, ना वीज. इथे विनीत यांना दोन वनविभाग सांभाळायचे होते. सकाळी चार वाजता त्यांचा दिवस सुरू होत असे. केवळ वयाच्या चोवीसाव्या वर्षी त्यांना अशी जबाबदारी मिळाली होती, सकाळीच ते जंगलात जात, ही खूप मोठी गोष्ट होती.

सुमारे दीड वर्ष ही नोकरी केल्यावर राजीनामा देऊन त्यांनी दिल्ली गाठली. काही काळाने त्यांना प्रो अनिल गुप्ता यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. गुजरात सरकार आणि प्रोफेसर गुप्ता संयुक्तपणे एक संस्था स्थापन करीत होते. तीचे नांव ‘गेन’ म्हणजेच ‘ग्रासरुट इनोवेशन ऑज्मेंटेशन नेटवर्क’ असे होते. या प्रकल्पात विनीत यांनी व्यवस्थापक म्हणून अर्ज केला होता पण त्यांची निवड सीईओ म्हणून करण्यात आली. या कामात निधीची गरज असल्याचे विनीत यांच्या लक्षात आले. आणि गुंतवणूकदार तेंव्हाच मिळतील जेव्हा ‘गेन’ ला उद्योगाचे रुप येईल. मग त्यांनी शोध घेतला आणि ‘गेन’ ग्रामीण गुंतवणूकदार झाला तर त्याला निधी मिळू शकतो हे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर सिडबी आणि नाबार्ड सारख्या बँकांशी चर्चा सुरु झाली मात्र काम झाले नाही. अखेर सिंगापूरमध्ये चाळीस अनिवासी भारतीयांच्या समूहाने त्यांच्यावर विश्वास दाखवून पाच हजार डॉलर्सचा निधी दिला. या प्रकल्पाचे नांव ‘अविष्कार’ ठेवण्यात आले. मात्र कुणीही हे सांगू शकत नव्हते की, गावातील कुणी यंत्र बनवू शकतो. ‘गेन’ने दोन नाविन्यपूर्ण कामांवर हा पैसा लावला ज्यातून कापूस स्वच्छ करण्याचे यंत्र तयार करण्यात आले. परिणाम चांगलाच झाला. केवळ वर्षभरात गुंतवणूकीच्या २६टक्के परतावा मिळाला. गुंतवणूकदार अचंबित झाले. कारण कुणी ही अपेक्षाच केली नव्हती. मात्र प्रा. गुप्ता यांच्याशी मतभेद झाले आणि विनीत यांनी नोकरी सोडली.

विनीत राय जी२० मध्ये
विनीत राय जी२० मध्ये

काही काळाने त्यांची ओळख अरुण डियाज यांच्याशी झाली. त्याआधी ते त्यांना सिंगापूरात भेटले होते. त्यांनी विनीत यांना पुन्हा ‘अविष्कार’ सोबत येण्याचे निमंत्रण दिले. त्याच दरम्यान विनीत यांनी ‘टि ऍन्ड व्हिसीएल तुंगरी मनोहर वेंचर कँपिटल फंड’ यांच्यासोबत एक करार केला. हे अगदी तसेच झाले जे त्यांना ‘अविष्कार’ मध्ये करायचे होते. मग त्यांनी टि ऍन्ड एम सोबत काम करण्यासाठी मुंबईचा मार्ग धरला. सोबतच अविष्कारला देखील एक न्यास म्हणून नोंदणीकृत केले. त्यानंतर सेबी कडे नोंदणी करण्यात आली. सेबीची अट होती की, न्यासाकडे एक दशलक्ष डॉलर्स जमा होणार नाहीत तोपर्यंत गुंतवणूक करता येणार नाही. पुढील काही महिने खूपच निराशेचे होते. टि एन्ड एमव्हिसीएल ने कामकाज बंद केले होते. खूप मेहनत करून एक कोटी रुपयांची व्यवस्था करण्यात आली आणि मग सेबीनेही हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर शोध सुरू झाला समाजाच्या मनात चालणा-या उद्योगांचा जेथे गुंतवणूक होऊ शकते. चेन्नईमध्ये ‘सर्वल’ नावाच्या कंपनीत असे स्टोव बर्नर बनवले जात होते जे इतरांच्या तुलनेत तीस टक्के जास्त चालणारे होते. त्यातून दोन फायदे होते, एक केरोसीनची बचत आणि दोन हरितवायूंचे उत्सर्जन कमी होत असल्याने पर्यावरणाच्या रक्षणाचे काम. सन २००२ मध्ये ‘अविष्कार’ ने पहिल्यांदा गुंतवणूक केली. पहिल्या दोन वर्षांचा अनुभव वाईट राहिला. अपेक्षेपेक्षा कमी बर्नर विकण्यात आले. संशोधन केल्यावर कऴले की, ग्रामिण भागातील लोकांना स्वस्तातील बर्नर उपल्बध असल्याने ते त्यांची अधिक खरेदी करतात. मग ‘सर्वल’ने नवा मिश्र धातूच्या बर्नरची निर्मिती केली जो स्वस्तातील होता. मग ‘अविष्कार’ला यश मिळू लागले.

विनीत यांना नेहमीच हेच सिध्द करायचे होते की, व्यापार करतानाच समाजाची सेवाही करता येऊ शकते.

‘अविष्कार’ने केवळ दुस-या कंपन्यांसाठीच नव्हेतर स्वत:साठी देखील गुंतवणूक केली. मग विनीत यांनी जगभरात फिरुन गुंतवणूकदारांना जोडण्याचे काम केले. काही काळातच ‘अविष्कार’ २३ कंपन्यांवर १६ दशलक्ष डॉलर्स गुंतवणूक करण्यात यशस्वी झाला.

आज ‘अविष्कार’ ग्रामिण उद्योजकांना कर्ज देते. अश्या लोकांना जे काही नवनिर्मितीकरण्यास सक्षम आहेत. सन २००२ मध्ये विनीत यांनी ‘इंटलेक्चुअल कँपिटल’ नावाने एक कंपनी नोंदवली. ही एक आगळीवेगळी कल्पना होती जी विनीत यांना त्यांचे मित्र पवन मेहरा यांनी सांगितली होती. ही एक अशी संस्था होती जी बौध्दिक गुंतवणूकीत व्यापार करत होती. ‘इंटलकँप’ने लवकरच जागतिक बँकेत एक हजार डॉलर्स प्रति महिना मिळण्याचा करार केला.

‘अविष्कार’ आणि ‘इंटेलकँप’चा विस्तार वेगाने झाला. कंपनीचा भर सामाजिक गुंतवणूक सल्लागार आणि सामाजिक महाविद्यालयीन व्यवस्थापनावर होता. थोडक्यात सांगायचे तर केवळ नफा मिळवण्याचा ‘अविष्कार’चा उद्देश कधीच नव्हता तर त्यांचे काम त्या कंपन्यांना उभे करण्याचे होते ज्या जास्तीत जास्त लोकांना रोजगार देऊ शकतात.

लेखक : आशुतोष खंतवाल

अनुवाद : किशोर आपटे.