शंकर यादवला शाळेत पुस्तके परवडली नाहीत, त्यानेच ४० शैक्षणिक अॅप्स विकसित केले

0

राजस्थानातील जयपूर जिल्ह्यातील रावपूरा या छोट्या गावातील शंकर यादवला  शालेय पुस्तके मिळणे दुरापास्त होते. जी नियमित अभ्यासक्रमात देण्यात आली होती, ज्यावेळी तो शाळेत जात होता.   येथे अशा प्रकारचे दहा हजार पेक्षा जास्त विद्यार्थी असतील ज्यांना पुस्तके परवडत नसतील ही जाणिव ठेवून २१वर्षांच्या शंकर याने असे काहीतरी करायचे ठरविले ज्यातून या सा-यांना पुस्तके खरेदी करण्याची गरजच पडणार नाही.  त्याने डिजीटल शैक्षणिक अॅप्स तयार करून यातून मार्ग काढला. आता पर्यंत त्याने  अशा प्रकारचे ४० अॅप्स तयार केले आहेत. शंकर याचे अॅप्स आता पर्यंत गुगल स्टोरवरून वीस लाख जणांनी डाऊनलोड केले आहेत.

कोणतीही व्यावसायिक पदवी किंवा प्रशिक्षण नसताना, शंकर याने ठरविले की त्याचे गाव डिजीटल करायचे. त्याने कंपनी सुरू केली, 'एसआर डेवलपर्स' ती नेमक्या याच कारणाने. त्याच्या अॅप्लीकेशन्सची गुगल प्ले स्टोअरवर आठ महिन्यांपूर्वीच नोंद झाली आहे आणि वीस लाखापेक्षा जास्त लोकांनी ती डाऊन लोड देखील केली आहेत. त्याने तयार केलेली अॅप्लीकेशन्स प्ले स्टोअरवर shankharraopura.com. या नावाने उपलब्ध आहेत.

ज्यावेळी शंकर दहाव्या वर्गात होता आणि परिक्षेची तयार करत होता, त्याच्या शिक्षकांनी सुचविले की, त्याने त्यांच्या प्रश्नाची उत्तरे ऑनलाईनवरून शोधावी. त्याचवेळी त्यांना हे लक्षात आले की पुस्तके देखील याच माध्यमातून वाचता येतील. त्याचा तंत्रज्ञानातील कल पाहता, शंकर यांचे वडील कल्लूराम यांनी संगणक घेतला, जरी त्यांच्या कुटूंबाची आर्थिक स्थिती नव्हती तरी. त्यानंतर शंकरने  अॅप्लीकेशन शिकण्यास सुरूवात केली त्यासोबतच त्याचे नियमित शिक्षण देखील सुरू होते.

ऍन्ड्रॉईड डेवलपमेंट मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर शंकरने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजीटल इंडिया कार्यक्रमातून प्रेरणा घेतली आणि अनेक शैक्षणिक तसेच क्रीडा आणि आरोग्य विषयक अॅप्स विकसित केली. त्याच्या शिक्षक आणि मित्रांनी त्याला  सहकार्य केले आणि मजकूर तयार करून दिला. सध्या त्याच्याजवळ चार जणांचा चमू आहे. नेटवर्कची मर्यादा लक्षात घेता, त्याने अशी अॅप्स तयार केली आहेत की, जी ऑफलाइनवर देखील कार्यरत होऊ शकतात.

रावपूरा मधील पहिले अॅप्स विकसित कर्ता म्हणून त्याने त्याच्या गावाची सारी माहिती यामध्ये उपलब्ध करून दिली आहे. त्याच्या या कार्याला जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय नेते यांनी पसंती दर्शवली आहे.

शंकर याचे कामाप्रती असलेले समर्पण आणि मेहनत याचा त्यांच्या घरच्या लोकांना अभिमान आहे. शंकरला दृढविश्वास आहे की, प्रत्येक मुलाला डिजीटल माध्यमातून शिक्षण घेता येणे शक्य आहे.