चौदावी मुंबई मॅरेथॉन उत्साहात 

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी स्पर्धकांना केले प्रोत्साहीत

0

आशियातील महत्वाची मानली जाणाऱ्या चौदाव्या ‘मुंबई मॅरेथॉन’ला उत्साहात सुरूवात झाली.राज्यपाल चे.विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपस्थित राहून सर्वांना प्रोत्साहीत केले.


यावेळी केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल, शिक्षण मंत्री विनोद तावडे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय, श्रीमती अमृता फडणवीस उपस्थित होते.


आशियातील मोठ्या मानल्या जाणाऱ्या या मॅरेथॉन स्पर्धेत देशातील आणि परदेशातील स्पर्धक सहभागी झाले असून विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच मुंबईतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला आहे. यावेळी सँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉनच्या विजेत्यांना शिक्षण मंत्री विनोद तावडे, श्रीमती अमृता फडणवीस यांनी सन्मानित केले.

या मॅरेथॉन मध्ये जगभरातील स्पर्धकांनी तसेच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला, युवक, युवती यांनी उत्साहात सहभाग नोंदविला.