लहान शहरात मोठ्या स्वप्नांना रुजवत असलेल्या श्राव्या

प्रेसिडेन्सी प्री स्कूलच्या सहसंस्थापिका श्राव्या यांचे शिक्षणातील अनोखे प्रयोग

लहान शहरात मोठ्या स्वप्नांना रुजवत असलेल्या श्राव्या

Wednesday October 28, 2015,

5 min Read

स्वतःतील उर्जेची प्रचिती आलेली व्यक्ती अपयशांनी खचत नाही, सामाजिक साच्यात बांधली जात नाही, ती आपल्या सकारात्मक उर्जेने ते घडवून आणते जे सामान्य कोणी स्वप्नातही पाहत नाहीत. प्रेसिडेन्सी प्री स्कूलच्या सहसंस्थापिका असलेल्या श्राव्या यांनी जगभरात केवळ पुरुषी क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या तेल गळती प्रकल्पावर काम केले आहे. त्यांना युवकांना स्वप्ने पाहणे शिकवण्यासोबतच त्याला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रोत्साहित करण्याची इच्छा होती. सोबतच त्यांना शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शिक्षणव्यवस्थेत सकारात्मक बदल घडून आणण्या साठीही प्रोत्साहीत करायचे होते.

image


निजामाबाद येथील एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या श्राव्या यांचे बालपण फारच असुरक्षित होते ज्या मुळे त्यांच्यात न्यूनगंडाच्या भावनेने घर केले आणि त्यांच्यात आत्मविश्वासाचाही अभाव निर्माण झाला होता. जेव्हा त्या बाहेरील जगाच्या संपर्कात आल्या तेव्हा त्यांना त्यांच्या मर्यादित विश्वाची जाणीव झाली. मात्र या नंतर त्यांनी आपल्या संकुचित विचारांतून बाहेर पडून राजस्थान मधील बिट्स पिलानी इंजीनियरिंग इंस्टीट्यूट मध्ये प्रवेश घेतला. येथील वातावरण श्राव्या यांच्यासाठी अगदीच वेगळे होते. त्यांना या गोष्टीची जाणीव झाली की जगाला मागे सोडून पुढे निघून जाणे म्हणजे जीवन नाही, तर लोकांसोबत पाऊलाला पाऊल मिळवून चालणे हे जीवनाचे ध्येय असले पाहिजे. श्राव्या या इंस्टीट्यूट मध्ये असतानाच त्यांनी 'सक्षम' हे प्रोजेक्ट सुरु केले होते. ज्याद्वारे त्यांनी ग्रामीण महिलांच्या आयुष्याला चांगले बनविण्याचा प्रयत्न केला. श्राव्या यांनी महिलांना आर्थिक निर्णय योग्य प्रकारे घेता यावा या प्रकल्पावर भर दिला होता. दुर्दैवाने हा प्रकल्प अयशस्वी ठरला. मात्र या प्रकल्पामुळे अनेकांना एक सन्मानजनक उपजीविकेचे साधन मिळाले. या नंतर श्राव्या सामाजिक परिवर्तनाच्या वाटेवर चालू लागल्या. पदवी मिळवल्या नंतर श्राव्या यांनी ऑईलफील्ड सर्विसेस कम्पनी 'श्लमबर्गर' मध्ये फील्ड इंजिनिअर म्हणून काम केले. त्यांनी सहा वर्षात कंपनीच्या विभिन्न पदांवर काम करत पाच देशांमध्ये प्रवास केला. याच सुमारास त्यांनी त्यांच्या बचतीच्या पैश्यातून 'ग्रासरूट्स फेलोशिप प्रोग्राम' चालू केला. याचा उद्देश गावातील तरुणांना उद्योगासाठी प्रेरित करणे हा होता. या मार्फत त्यांनी तरुणांच्या शिक्षण आणि औद्योगिक विकासावर लक्ष केंद्रित करत एकूण ३२ योजनांवर काम केले. हे कार्य जरी एक आदर्श उदाहरण असले तरी या कार्याला यशाच्या उंचीवर पोहोचता आले नाही. या दरम्यान श्राव्या यांनी श्लमबर्गर सोबत तीन खंडांमधील अल्जेरिया, यूएसए, कतार, दुबई व भारत या देशांमध्ये काम केले. तेल गळती संबंधित कंपनी मधील आपल्या कामाच्या अनुभवावरून श्राव्या सांगतात की, "प्रत्येक स्त्रीला आपल्या आयुष्यात आव्हाने स्वीकारताना डगमगता कामा नये. तिने शारिरीक श्रम करायला हवेत असे केल्यानेच ती सन्मानास पात्र ठरेल. असा विश्वास माझ्यात तेव्हा आला जेव्हा मी सहारा वाळवंटात तेल गाळप संयत्रावर जीवतोड मेहनत करत होते. ही माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट होती की त्या विराण जागेत चार पाचशे किलोमीटर परीघामध्ये मी अशी एकटी स्त्री होते जी पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन काम करत होते."

image


श्राव्या यांच्या वडिलांचे एका अपघातात आकस्मित निधन झाले ही त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात हादरवणारी घटना होती. या अपघाताच्या वेळी त्या फार लहान होत्या. श्राव्या सांगतात, "त्यांच्या जाण्याने असे वाटले जणू माझ्या शरीराचा मोठा भागच कुठेतरी हरवला आहे. दहा वर्षांची असतानाच मी जगण्याच्या सगळ्या आशा सोडून दिल्या होत्या. मला कोणताच रस्ता दिसत नव्हता. पुढची सात वर्षे मी याच आशेवर झोपत असे की कदाचित उद्याच्या सकाळी वडिलांचे जाणे हे केवळ एक वाईट स्वप्न ठरेल."

एकदा क्वालालंपूर येथे एका बिजनेस ट्रीपला गेल्या असताना त्यांचा भविष्याबाबत विचार चालू होता. त्या वेळी त्यांना आनंद आणि समाधान यांच्यातले अंतर लक्षात आले. याबद्दल श्राव्या सांगतात, "त्या वेळी मला वाटले की माझ्या व्यावसायिक आयुष्यात सगळं काही व्यवस्थित असूनही मला समाधान मिळत नाही ".

असेच एकदा श्राव्या आपल्या आई वडिलांनी स्थापना केलेल्या शाळेतील मुलांसोबत फिरायला गेल्या होत्या. या प्रवासात मुले आणि त्यांचे पालक श्राव्या यांच्याकडून त्यांच्या बद्दल जाणून घेण्यात फार उत्सुक होते. या संपूर्ण प्रवासात आणि संभाषणात श्राव्या यांना आपल्या जबाबदारीची जाणीव झाली होती.

श्राव्या यांना कळले होते त्यांना काय करायचे आहे ते. त्यांना हे समजून आले होते की लोकांचे आयुष्य सुधारायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. याच विचारला आकार देण्यासाठी त्या सध्या प्रेसीडेंसी हाईस्कूल मध्ये कार्यरत आहेत.

image


श्राव्या यांच्यासाठी स्वतःचे यशस्वी करियर सोडायला आपल्या पतीची परवानगी घेणे हे फार कठीण काम नव्हते. प्रश्न व्यक्तिगत पातळीवर होता. श्राव्या यांना आपल्या उद्देश पूर्ती करिता त्याच गावात पुन्हा परतायचे होते ज्या गावातून पळून जाण्यासाठी त्या वर्षांपूर्वी तडफडत होत्या. असे करण्यासाठी त्यांना दृढ संकल्पित व्हावे लागणार होते. जे इतके सहज नव्हते. अखेरीस सर्व चिंता आणि कुशंकांना पार करत श्राव्या यांनी आपल्या छोट्या शहराकडे प्रयाण केले.

श्राव्या यांच्या मते भारतीय शिक्षण व्यवस्थेतील सगळ्यात मोठी समस्या ही आहे की इथे शिक्षण आणि अभ्यासाला एकाच पातळीवर आणून ठेवले आहे. श्राव्या म्हणतात की, "जेव्हा मुलीच्या शिक्षणाचा विषय येतो तेव्हा तिचे आई वडील एका मर्यादेतच तिच्या करीयरच्या पर्यायांचा विचार करतात. ते तिला जगातील अनेकानेक आव्हानात्मक क्षेत्रांपासून दूरच ठेवतात ज्यामुळे मुलीमध्ये भव्य स्वप्न पाहण्याची शक्ती कमी होऊन जाते."

श्राव्या सध्या एका निश्चित ध्येयाने लोकांना आयुष्याच्या खऱ्या पैलूला सहज आणि हसतमुखाने शिकवण्यावर काम करत आहेत. त्या विविध प्रयोगांद्वारे लोकांना स्वतःचीच ओळख पटून देण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांना ही जाणीव त्या करून देतात की चुका या माफ करण्यासाठी असतात. शिक्षणासोबतच तंत्रज्ञानाचीही जोड आवश्यक असल्याचे त्या सांगतात, "तंत्रज्ञानात जग बदलण्याची ताकद आहे. त्याच्या योग्य वापराने कठीणातील कठीण परिस्थितीलाही सहज सामोरे जाता येते. मुलांना स्पेलिंग, शब्दकोश आणि बीजगणित इत्यादीं सह परिचित करून देण्यासाठी मी आणि माझी टीम अॅप आधारित शिक्षणाला प्रोत्साहन देत आहोत."

या व्यतिरिक्त वर्गात शिक्षक आणि मुलांमध्ये परस्पर ताळमेळ जुळवून आणण्याला आणि त्यांच्यात योग्य संवाद घडवून आणण्याला त्यांचे पहिले प्राधान्य असते. शाळेकरता तीन प्रमुख मानके आहेत - मूल्यांकनात बदल, शिक्षका सह जोडले जाण्यासाठी वातावरण निर्मिती आणि सामाजिक भावनिक अभ्यासक्रम ठेवणे. या तीन गोष्टींसह मुले स्वतःला योग्य प्रकारे प्रदर्शित करू शकतात.

प्रेसिडेन्सी समविचारी लोकांचा शोध घेत आहे, ज्याने त्यांच्या मिशन ला एका प्रोजेक्ट च्या स्वरुपात वर आणणे शक्य होईल. ज्याने बाल विकासाच्या क्षेत्रात मोठ्या योगदानाची अपेक्षा बाळगता येईल.

श्राव्या यांच्या आई आणि त्यांचे पती या मिशनला त्याच्या योग्य उंचीवर पोहोचवण्यात त्यांच्या सोबत आहेत. श्राव्या सांगतात, "या दोघां सोबतच माझ्यासाठी त्या साऱ्या व्यक्ती प्रेरणा स्रोत आहेत ज्या समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी संघर्ष करायला तयार आहेत. आशा लोकांचे नेहमी स्वागतच असेल".