डेअरी फार्मिंगच्या सर्व समस्यांवरील उत्तर, स्टेलॅप्स टेक्नॉलॉजिस

देशभरातील डेअरी फार्मिंग उद्योगांचा मित्र

डेअरी फार्मिंगच्या सर्व समस्यांवरील उत्तर, स्टेलॅप्स टेक्नॉलॉजिस

Thursday August 20, 2015,

8 min Read

समविचारी आणि ध्येयाने प्रेरित झालेले तरुण एकत्र आल्यानंतर काय चमत्कार घडू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्टेलॅप्स टेक्नॉलॉजिस... स्टेलॅप्स टेक्नॉलॉजिसचे संस्थापक असलेले पाच मित्र त्यांच्या वयाच्या तिशीत विप्रो टेक्नॉलॉजिसमध्ये नोकरीच्या निमित्ताने एकत्र आले. तेव्हा त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली ती म्हणजे “आता नाही तर कधीच नाही”. तेव्हाच बाहेर पडून लगेचच काहीतरी भन्नाट करण्याचे त्यांनी ठरवले.

पाचही मित्रांमध्ये अनेक चर्चा झाल्या. या चर्चांनंतर जीवनमान उंचावण्याच्या क्षेत्रात काहीतरी करायला हवं, यावर स्टेलॅप्सच्या पाचही संस्थापक मित्रांचे एकमत झाले. तंत्रज्ञानात बुद्धिमान असलेल्या या सगळ्यांनी मग शेती आणि आरोग्याच्या क्षेत्राशी संबंधित उद्योग उभारण्याचा निश्चय केला. साधारण 2011च्या एप्रिलमध्ये या कल्पनेने मूर्तरुप धारण करत स्टेलॅप्स टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची नोंदणी करण्यात आली. सध्याच्या घडीला स्टेलॅप्स ही भारतातील एकमेव डेअरी तंत्रज्ञान सोल्यूशन कंपनी म्हणून नावारुपाला आलेली आहे. स्टेलॅप्सच्या माध्यमातून आत्तापर्यंत क्लाऊड टेक्नॉलॉजीचा वापर करुन डेअरी उद्योगासाठीचे ऑटोमेशन टूल्स, मोबॅलिटी, डेअरी उद्योगांसाठीचे डेटा ऍनॅलिटिक्स विकसित केले आहे. डेअरी फार्म, सहकार तत्त्वावरील डेअरी उद्योग आणि खाजगी डेअरींसाठीही स्टेलॅप्सने विकसित केलेले तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त आणि फायदेशीर ठरत आहे.


स्टेलॅप्स टेक्नॉलॉजिसने विकसित केलेले एकात्मिक मिल्क पार्लर

स्टेलॅप्स टेक्नॉलॉजिसने विकसित केलेले एकात्मिक मिल्क पार्लर


स्टेलॅप्स टेक्नोलॉजिसला ओम्निवोर पार्टनर्सकडून निधी मिळाला आहे. डेअरी टेक्नॉलॉजिसचे तंत्रज्ञान त्यांनी आयआयटी मद्रासच्या ग्रामीण तंत्रज्ञान व्यावसाय विभागाच्या सहकार्याने विकसित केले आहे. स्टेलॅप्सने स्वतःला केवळ एक अत्युच्च तंत्रज्ञान विकसित केलेली कंपनी म्हणून सिद्ध केले नाही, तर तीन वर्षांच्या काळात मोठे ग्राहक आणि योग्य वेळी निधी मिळवून त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे.

मार्केट आणि दृष्टिक्षेप

जगातील 16 टक्के दुग्ध उत्पादन भारतात होते. जगातील दोन तृतीयांश गोधन भारतात आहे, पण ते संघटित नाही, विखुरलेले आहे. भारतातील बहुसंख्य शेतकरी हे लघु आणि मध्यम स्वरुपातील दुग्ध व्यवसाय करतात.

वास्तविक डेअरी फार्मिंग हे अतिशय विशाल असे उद्योग क्षेत्र आहे. स्टेलॅप्सने या संदर्भातील अत्यंत सखोल असा अभ्यास देखील पूर्ण केलेला आहे. सध्या स्टेलॅप्सने लघु आणि मध्यम शेतकऱ्यांवर लक्ष्य केंद्रीत केलेले आहे. ज्यांच्याकडे साधारणपणे 5 ते 25 गायी आहेत, आणि ज्यांनी आत्तापर्यंत कोणत्याही तंत्रज्ञानाचे सहाय्य घेतलेले नाही अश्यांसाठी दूध उत्पादन, त्यातील टप्पे आणि दूध मार्केटिंगसाठी स्टेलॅप्सकडे दर्जेदार आणि उत्तम उपाय आहेत. अन्य उद्योगांप्रमाणेच दूध उत्पादक शेतकरीसुद्धा आठ तासांहून अधिक काळ काम करुन देखील नफा मिळवू शकत नाहीत आणि म्हणूनच तंत्रज्ञानाचा योग्य वापर करुन ज्ञानाधारित उपाय स्टेलॅप्सने शोधून काढलेले आहेत. ज्याद्वारे दूध उत्पादन प्रक्रिया सुधारुन गुराढोरांच्या आरोग्याकडेही लक्ष पुरवणे शक्य होते.

समस्या अचूकपणे समजावून घेणे

'गुरे' दूध उद्योगातील मध्यवर्ती घटक असल्याने त्यातील खालील घटकांकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहेः

अ) आरोग्य

ब) अधिकाधिक उत्पादन क्षमता

क) अन्न, पाणी आणि आरोग्यपूर्ण निवारा

जर शेतकऱ्यांनी वरील तीन विषयांवर लक्ष्य केंद्रीत केल्यास डेअरी उद्योग नफा देणारा ठरेल.

पारंपरिकरित्या, डेअरी फार्मिंग हे मजूरांवर आधारलेला उद्योग म्हणून ओळखला जातो. खूप मजूर कामाला लावून अधिक दुग्ध उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, जेव्हापासून गोठ्यांमध्ये स्वच्छता, गुरांना योग्यवेळी अन्न पुरवणे आणि तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला तेव्हापासून पारंपरिक प्रकार मागे पडले. दूध उत्पादन क्षेत्रात गोठवणूक यंत्रणा बसवणेही अधिक फायदेशीर ठरु लागले. यासाठी वीजेची गरज भासत असली तरीदेखील गायींच्या शेणापासून बायोगॅस निर्मिती करुनही ही गरज सहजपणे भागवता येऊ शकते.

उत्पादने आणि तंत्रज्ञान

स्टेलॅप्सची उत्पादने संपूर्ण दूध उत्पादन प्रक्रिया उद्योग डोळ्यासमोर ठेऊन बनवण्यात आली आहेत. मग त्यात अगदी पायाभूत सुविधा उभारण्यापासून गुरांच्या राहण्याच्या व्यवस्थेपर्यंतच्या बाबींचा समावेश आहे. वीजेची गरजेनुसार उभारणी करणे तसेच बायोगॅसच्या माध्यमातून हा प्रश्न कसा सोडवता येईल, याचा देखील समावेश आहे.

स्टेलॅप्सच्या उपयुक्त वस्तू अशा -


स्मार्टमू

स्मार्टमू


'स्मार्टमू' ही डेअरी फार्म सेवांमधील सर्व गरजा पूर्ण करण्याची क्षमता असलेली वस्तू म्हणता येईल. यात शुद्ध दूध उत्पादनासाठीचे सर्व नियम, उत्पादन क्षमता वाढीचे प्रयत्न, किफायतशिरपणा आणि योग्य वेळेत सर्व माहिती मिळण्याची सोय आहे. त्यात खालील बाबींचा समावेश आहे.

अॅटोमेटेड मिल्किंग सिस्टिम (स्मार्ट एएमएस)

बल्क मिल्क चिलिंग सिस्टिम (स्मार्ट बीएमसी)

फार्म उभारणीसाठीच्या सेवा (त्यात गायींसाठीचे पायाभूत सेवा, राहण्याची सोय, गायींची निवड, चारा ठेवण्याची सोय, खत प्रक्रिया प्रकल्प, गायींसाठीच्या आरोग्य सेवांचा समावेश आहे.)

फार्म ले-आऊट डिझाईन ऍण्ड मॉडेलिंग (गायींसाठीचे शेड, मिल्किंग पार्लर आणि कामगारांची निवासव्यवस्था)

उत्पादनवाढीसाठी आणि उत्पादनांच्या किफायतशीरपणासाठी सल्ला

वीज उपलब्ध नसलेल्या फार्मसाठी बायोगॅसची उभारणी

फार्म मॅनेजमेंट इक्विपमेंट्स

स्मार्टमूमध्ये खालील उत्पादनांचाही समावेश आहेः

स्मार्ट फार्म्सः हे फार्म्स क्लाऊड सिस्टिमवर आधारलेले आहेत. यात प्राण्यांचा आवाज रेकॉर्ड होऊन त्याद्वारे त्यांचे योग्य नियोजन केले जाते. यातून उत्पादनक्षमता, उत्पादनवाढ, प्रजनन, गुरांची आरोग्यविषयक काळजी, त्यांना योग्य अन्न-चारा पुरवले जाते.

स्मार्ट बीएमसीः ही अत्यंत आधुनिक अशी दूध थंड ठेवणारी यंत्रणा आहे. इंटरनेट आणि मोबाईलच्या माध्यमातून ही यंत्रणा वापरता येते.

स्मार्ट एएमएसः ही स्वयंचलित मिल्किंग सिस्टिम आहे. तीन स्टेशन पार्लरपासून ते मोठ्या क्षमतेच्या पार्लरपर्यंत ही यंत्रणा विकसित करता येते. यात गायींची ओळख, स्वयंचलित मिल्क मीटर्स, दुधांचे नमुने गोळा करणे, अतिशय शुद्ध आणि सात्विक दुधाची निर्मिती करणे या माध्यमातून शक्य होते.

कोनट्रॅकः कोल्ड चेन हाताळणारी ही इंटरनेटवर आधारित यंत्रणा आहे. या माध्यमातून वस्तुस्थिती अहवाल, वाहतूक व्यवस्थेतील अडथळे दूर करुन ते कोणीही बदलू शकणार नाही, अशा यंत्रणेची निर्मिती केली जाते. मोठ्या प्रमाणातील मिल्क कूलर्स आणि कोल्ड रुम्सची उभारणी करुन त्याचे नियंत्रण या माध्यमातून करता येते.

मूल्य आणि तंत्रज्ञान

डॅशबोर्ड स्मार्टमू

डॅशबोर्ड स्मार्टमू


जगातील अन्य पुरवठादार कंपन्यांपेक्षा स्टेलॅप्सचे डेअरी फार्मिंग उत्पादनांचे मूल्य अतिशय कमी आहे. ते निर्धारित करत असलेल्या मूल्यामध्ये पायाभूत सुविधांच्या विकासापासून ते दूध उत्पादन, दूध साठवणूक या सगळ्यांचा समावेश असतो. या संदर्भातील सगळे मूल्यमापन हे क्लाऊडमार्फत पार पडते. गुरे आणि चिलिंग सिस्टिमवर लावलेल्या सेंसर्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणारी माहिती फक्त समजून घ्यावी लागेल. ती प्रसंगी पशुवैद्यकांपर्यंत पोहोचवावी लागेल. ही सगळी माहिती वायरलेस नेटवर्कच्या माध्यमातून स्टेलॅप्सच्या सर्व्हरपर्यंत येईल. विशेष म्हणजे शेतकरी ही सगळी माहिती ऍण्ड्रॉइड अॅप्स आणि डॅशबोर्डवरील स्मार्टमूच्या माध्यमातून ऍक्सेस करु शकतील.

डॅशबोर्ड स्मार्टमू

स्टेलॅप्सने त्यांच्या उद्योगाचे तत्वज्ञान सुरुवातीपासून पाळले आहे. ते म्हणजे शेतकऱ्यांसोबत तुम्हाला तेव्हाच नफा मिळू शकतो जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत काम कराल, आणि त्यातून शेतकऱ्यांनाही नफा मिळेल. स्टेलॅप्सचा नफा हा दुधाच्या दर लिटरमागे निश्चित केला जातो. अर्थात शेतकऱ्यांचा नफा हा त्यातूनच पुढे वाढत जातो. त्यामुळे यात शेतकऱ्यांना केवळ वरवर काहीतरी सांगण्याचा उद्देश अजिबात नाही.

स्टेलॅप्सच्या संस्थापकांची पार्श्वभूमी


स्टेलॅप्सचे संस्थापक- डावीकडून प्रवीण नळे, रंजीथ मुकुंदन, रामकृष्णा अदुकुरी, व्यंकटेश शेशास्यायी, रविशंकर शिरुर

स्टेलॅप्सचे संस्थापक- डावीकडून प्रवीण नळे, रंजीथ मुकुंदन, रामकृष्णा अदुकुरी, व्यंकटेश शेशास्यायी, रविशंकर शिरुर



रंजीथ मुकुंदन हे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. टेलिकॉम आणि सॉफ्टवेअरमधील अभियंता असलेल्या मुकुंदन यांनी विप्रोमध्ये सुमारे अडीचशे लोकांच्या टीमचे नेतृत्व केलेले आहे. सुमारे 17 वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.

रविशंकर शिरुर हे संचालक असून व्यवसायवृद्धी विभागाचे प्रमुख आहेत. आयआयटी मद्रासमधील ते पदवीधर आहेत. सॉफ्टवेअर आणि टेलिकॉम उद्योगातील सुमारे 20 वर्षांचा अनुभव त्यांच्याकडे आहे. स्ट्रॅटेजी सल्लागार म्हणून त्यांनी एटी ऍण्ड टी, टेल्स्ट्रा, नॉर्टेल, इरिकसन आणि अल्काटेल ल्यूसन्ट कंपनीतील कामाचा त्यांना दीर्घ अनुभव आहे.

प्रवीण नळे हे कंपनीचे संचालक असून चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर आहेत. ते देखील आयआयटी मद्रासचे पदवीधर आहेत. त्यांना देखील सुमारे 15 वर्षांहून अधिक हार्डवेअर, सॉफ्टवेअर क्षेत्रातील अनुभव आहे. सर्वसाधारणे आढळून न येणारे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमधील कॉम्बिनेशन त्यांच्याकडे आहे.

रामाकृष्णा अदुकुरी हे सॉफ्टवेअर सोल्यूशन विभागाचे प्रमुख आहेत. आयआयटी खरगपूरचे ते पदवीधर आहेत. त्यांना 15 वर्षांहून अधिक काळ टेलिकॉम आणि उद्योग वास्तुरचना क्षेत्रातील अनुभव आहे. युनिफाईड कम्युनिकेशन आणि क्लाऊड कंपनीत ते मुख्य वास्तुरचनाकार म्हणून कार्यरत होते.

व्यंकटेश शेशास्यायी हे डोमेन सोल्यूशन विभागाचे प्रमुख आहेत. त्यांना देखील 15 वर्षांहून अधिक या क्षेत्रातील अनुभव आहे. एकाहून अधिक टेलिकॉम कंपन्यांच्या सेवा माध्यमातून सर्वांपर्यंत अचूक माहिती कशी पोहोचेल, याचे नियोजन करण्यात त्यांचा हातखंडा आहे.

सर्वसामान्यांसाठी स्टेलॅप्सचे महत्त्व

किफायतशीर असे डेअरी फार्म सोल्यूशन्स :

पेटंट पेंडिग टेक्नॉलॉजीने नियंत्रित केलेले स्वयंचलित डेअरी सोल्यूशन्स भारतात जगाच्या तुलनेत स्वस्त उपलब्ध आहेत. भारत ही विकसित होणारी बाजारपेठ असल्याचे जाणून या किंमती त्याला साजेशा अर्थात परवडणाऱ्या ठेवण्यात आल्या आहेत.

कमी मूल्य कसे : दूध उत्पादनाशी संबंधित प्रक्रिया स्वयंचलित केल्याने किंमती कमी झाल्या आहेत. कामगारांवर अधिकाधिक अवलंबून राहणे कमी केल्यानेही उत्पादनांच्या किंमती कमी झाल्या. चाऱ्याचे योग्य, अचूक नियोजन केल्याने देखील प्रती लिटर दुध उत्पादनाचा खर्च कमी होतो. अवलंबित्व कमी कमी होत गेल्याने खर्चावरही नियंत्रण राहते.

गुरांच्या आरोग्याची काळजीः अतिप्रगत अशा क्लाऊड तंत्रज्ञानातून मिळत असलेल्या विश्लेषणामुळे गुरांच्या आरोग्याची काळजी आधीच घेतली जाते. गुरे आजारी पडण्याच्या घटना आधीच रोखल्या जाणे, यामुळे शक्य होते. त्याचा अर्थातच चांगला परिणाम दूध उत्पादनावर दिसून येतो.

उत्पादन क्षमतेतील वाढः प्रगत क्रिया मीटर आणि क्लाऊडवर आधारित अहवालामुळे वेळोवेळी अचूक योजना आखता येतात. प्रसंगी काही घटना टाळता येणेही शक्य होते. या तंत्रज्ञानामुळे उत्पादन क्षमता वाढण्यास सहाय्य होते.

मूल्यवृद्धीः डेटा रेकॉर्डिंग आणि वेळोवेळी घेतल्या जाणाऱ्या गुरांच्या आरोग्याच्या काळजीमुळे गुरांची विक्री करण्याची वेळ येते तेव्हा त्यांचे मूल्य देखील आपोआपच वाढते.

विमा हप्त्यात कपातः सर्वसाधारणपणे गुरांचा विमा हप्ता हा वाढत जाणारा असतो. पण त्यांच्या आरोग्याची अचूक माहिती वेळोवेळी मिळत राहिल्याने विमा हप्ता न वाढता उलट किमान 50 टक्के कमी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.

अत्युच्च दर्जाच्या दुधाची निर्मितीः नियंत्रित आणि कोणाकडून बदल करता येणार नाही, अशी कोल्ड चेन मॅनेजमेंट यंत्रणा विकसित केल्याने (उदा. रिमोट कंट्रोलने ऑपरेट होणारे बल्क मिल्क कूलर्स) दुधामधील जिवाणूंचे प्रमाण हे अत्यंत कमी होते. त्यातून निर्माण होणारे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे अत्युच्च दर्जाचे असतात.

स्टेलॅप्ससाठी मोलाच्या ठरणाऱ्या बाबीः

टीम स्टेलॅप्सचे श्रेय कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही. त्यासाठी काही घटक निश्चित कारणीभूत आणि सहाय्यकारी ठरले आहेत. स्टेलॅप्समुळे अनेक दिग्गज उद्योजक शेती आणि डेअरी फार्मिंगकडे वळू शकतील. तसेच या क्षेत्रात असलेली संधी देखील त्यांना समजू शकेल.

संयमः स्टेलॅप्सचे सर्व संस्थापक आणि गुंतवणुकदारांना या क्षेत्रात तातडीने नफा-परतावा मिळणार नाही, याची पूर्ण माहिती आहे.

संस्थापकांची संख्या अधिक असणे हे देखील स्टेलॅप्सला उपयुक्त ठरले आहे. सुरुवातीच्या काळात स्थैर्य मिळण्यासाठी प्रत्येक संस्थापकाने त्यांच्या पगारातील किमान 20 ते 30 टक्के रक्कम (नोव्हेंबर 2010 ते ऑक्टोबर 2011) या उद्योगाच्या उभारणीसाठी दिली. शिवाय त्यांच्या एकत्रित अनुभव हा देखील स्टेलॅप्सच्या निर्मितीसाठी उपयुक्त ठरला.

कुटुंबाकडून मिळणारे पाठबळ आणि आयआयटी मद्रासच्या ग्रामीण तंत्रज्ञान विभागाचे सहाय्य देखील मोलाचे ठरले.

वेळेचे महत्त्वः डेअरी उत्पादनाशी संबंधित तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यात भारत जगाच्या तुलनेत प्रचंड मागे आहे. त्यामुळे हे अंतर दूर कऱण्यासाठी स्टेलॅप्सचे तंत्रज्ञान अत्यंत सहाय्यकारी ठरणारे आहे.

मार्केटचा प्रतिसादः आत्तापर्यंत तरी शेतकऱ्यांनी स्टेलॅप्सच्या उत्पादनांचे स्वागत केले आहे. भविष्याचा विचार करता स्टेलॅप्स हे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनाही पटले आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनच स्टेलॅप्सचा प्रचार आणि प्रसार अधिक वेगाने होत आहे.

स्वच्छ, शुद्ध दुधासाठी सरकारचा निधी

कम्युनिटी पार्लर

कम्युनिटी पार्लर

कम्युनिटी पार्लर


तीन वर्षांच्या अत्यंत कमी कालावधीत स्टेलॅप्सने जगातील सर्वांत मोठे कम्युनिटी मिल्क पार्लर चिंतामणी तालुका (चिखाबल्लपूर जिल्हा) येथे उभारले आहे. तेथे दिवसाला 200 गायी दूध देतात. हे पार्लर स्टेलॅप्सच्या उज्ज्वलशाली भविष्याची जणू ग्वाही देणारे आहे.

आपण स्टेलॅप्सच्या तंत्रज्ञानाविषयी याआधी कधी ऐकले होते का? आपणही अशा प्रकारची संशोधनपूर्ण माहिती आमच्याशी शेअर करु शकता...ते आम्हाला निश्चितच आवडेल...