सलीम मिर्जा, दहशतवादी हल्ला झालेल्या बस चालकाने ५० जणांचे जीव वाचविले

सलीम मिर्जा, दहशतवादी हल्ला झालेल्या बस चालकाने  ५० जणांचे जीव वाचविले

Friday July 14, 2017,

2 min Read

अनंतनाग येथे अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवरील झालेल्या अतिरेकी हल्ल्यात सात जण दगावले आणि १९ जण गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी हिंमत आणि बांधिलकी यांचा परिचय देत या बसचे चालक सलिम मिर्जा यांनी ५० जणांना मदत करत त्यांना सुरक्षित स्थळी नेले आणि त्यांचे प्राण वाचविले.


image


ही बस यात्रेकरूंना बालटाल येथून जम्मू येथे घेवून जात होती, जे जम्मू आणि काश्मिर राज्यात आहे,त्यावेळी अनंतनाग येथे हा हल्ला झाला. प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलविल्यानंतर सलिम त्यांना दोन किमी दूर घेवून गेले, आणि श्रीनगर –जम्मू महामार्गावरील आर्मी कॅम्पवर पोहोचले. याबाबत मुलाखत देताना त्यांनी सांगितले की, “

त्यावेळी साधारण रात्रीचे आठ वाजले असावेत जेंव्हा बसला दहशतवाद्यांनी घेरले. त्यांनी सुरूवातीला समोरून गोळीबार केला जेणेकरून चालक मरण पावेल. मी लपून बसलो आणि दूर जात स्वत:ला वाचविले. मला माहिती नव्हते तेथे जाण्याचे बळ मला कसे मिळाले, अल्लाहने मला मदत केली आणि बळ दिले असावे.” बसची नोंदणी केलेली नंबरप्लेट गुजराथची होती, त्यामुळे हे झाले असावे. गुजराथचे मुख्यमंत्री विजय रूपानी म्हणाले की, “ मला बसच्या चालकाचे आभार मानले पाहिजेत की तेथे गोळीबार होत असतानाही त्याने त्यांचे प्राण वाचविले, आम्ही त्यांचे नाव शौर्य पुरस्कारासाठी देणार आहोत.”

या दुर्घटनेबाबत बोलताना जावेद मिर्जा चालकांचे चुलत भाऊ यांनी सलीम यांचा दूरध्वनी आला त्याबाबत सांगितले की, “ त्यांनी मला साडे नऊच्या सुमारास फोन केला,आणि गोळीबार झाल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की ते तेथे थांबलेच नाहीत आणि यात्रेकरूंसाठी सुरक्षित जागा शोधत निघाले, त्यांना सात जणांना वाचविता आले नाही परंतू पन्नास लोकांना सुरक्षित जागी घेवून जाता आले, मला त्यांचा अभिमान वाटतो.”

    Share on
    close