राष्ट्रपतींच्या मोटारींच्या ताफ्याआधी बंगळुरूच्या या वाहतूक पोलीस अधिका-याने रुग्णवाहिकेला दिले प्राधान्य!

0

एमएल निजलिंगप्पा, बंगळूरू पोलीस दलातील एक वाहतूक पोलीस उपनिरिक्षक ज्यांना बंगळुरूच्च्या ट्रिनीटी सर्कल भागात कर्तव्यावर तैनात केले होते, त्यांचे आता मानवतावादी वर्तणूक केल्याने कौतूक होत आहे. त्यांनी शहरातील वाहतूक कोंडी आणि वाईट परिवहन स्थितीत देखील देशाचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या गाड्यांच्या ताफ्या आधी एका रूग्णवाहिकेला जाण्यास संधी दिली.

बंगळुरूच्या शहर पोलिसांनी त्यांच्या तातडीने विचार करून कृती करण्याच्या कर्तव्यतत्परतेचा सन्मान केला आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी नव्या ‘ग्रीन मेट्रो’च्या उदघाटनासाठी शहरात होते.

हे उपनिरिक्षक उलसूर वाहतूक पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत आणि त्यांना ट्रिनीटी चौक येथे तैनात करण्यात आले होते. जेणेकरून वाहतूक नियंत्रित राहील आणि राष्ट्रपतीच्या गाड्यांचा ताफा सहजपणे जावू शकेल. ज्यावेळी हा ताफा राजभवनाला जाण्यासाठी मार्गस्थ होता, निजलिंगप्पा यांच्या लक्षात आले की रूग्णवाहीका एचएएल मार्गावरून येत आहे, जी खाजगी इस्पीतळात जात आहे. याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, “ ती तातडीची गोष्ट होती, म्हणून मी त्या वाहतूक बेटातून रूग्णवाहीकेला तातडीने जाण्यास परवानगी दिली, आणि वरिष्ठ अधिका-याना संदेश दिला. त्यावेळी ही रूग्णवाहीका जाण्यास पुरेशी जागा आणि वेळ होता म्हणून मी ताफा जाण्यापूर्वीच त्याना जाण्यास अनुमती दिली.”

वेळ न घालविता या उपनिरिक्षकाने वरिष्ठांना संदेश दिला, त्यांची परवानगी घेतली आणि रूग्णवाहिकेला रस्ता दिला आणि ती राष्ट्रपतींच्या ताफ्या आधी निघून गेली.

प्रविण सूद, बंगळुरूचे शहर पोलिस आयुक्त यांनी निजलिंगप्पा यांना बक्षीस मिळेल याची हमी दिली असून त्यांच्या या वर्तणुकीचा उल्लेख ट्वीटरवर देखील केला आहे.