८१हजार ग्राहकांपर्यत कसे पोहोचले 'झेनडेस्क'

८१हजार ग्राहकांपर्यत कसे पोहोचले 'झेनडेस्क'

Saturday October 01, 2016,

3 min Read

झेन डेस्क ही आघाडीची सॉफ्टवेअर विकसित करणारी संस्था आहे, जी ग्राहकांना व्यावसायिक स्वरूपाच्या उपयुक्त साॅफ्टवेअर सेवा (SaaS suite) प्रदान करते. ज्यांचा उपयोग हेल्प डेस्क तिकीट विक्रीसाठी केला जातो तसेच इश्यू ट्रॅकिंग, ग्राहकसेवा सहकार्य यामध्ये केला जातो. आजघडीला ८१हजारापेक्षा जास्त जगभरातील ग्राहक या सेवेचा लाभ घेत आहे. कंपनीचे १५००पेक्षा जास्त कर्मचारी जगभरातील बारा शहरातून सेवा देत आहेत. युअर स्टोरी टेकस्पार्क २०१६मध्ये, मॉर्टेन प्राइमडल, सहसंस्थापक, झेन डेस्क यांनी व्यासपीठावरून झेनडेस्कच्या बाबतीत आलेले अनुभव सांगितले.

image


झेनडेस्क आज जगभरात नावाजली असली तरी, कंपनीचा प्रवास आदर्श आणि इतरांना प्रेरणादायी असा झाला. संस्थापक अलेक्झांडर ऍगाशिपोर, मॉर्टेन प्राइमडल, मायकल श्वेन यांनी हा उपक्रम जेव्हा सुरु केला तेव्हा त्यांची परिस्थिती फारच वाईट होती. ते पूर्णपणे हताश झाले होते. त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांत ते अर्धवेळ सल्लागार म्हणून काम करत होते. या चमूला अनेकदा सुरूवातीलाच नकार मिळत होते जेंव्हा ते अर्धवेळ सल्लागार म्हणून काम करत होते, तज्ज्ञांना वाटत असे की त्यांचे उत्पादन फारसे वेगळे नाही. सुरुवातीच्या या अडचणी असूनही झेनडेस्कने त्यावर मात केली आणि त्यांचे मुख्यालय सिलीकॉन व्हॅलीमध्ये स्थलांतरित केले आणि सातत्याने प्रयोगशील राहून प्रगती केली. मॉर्टेन यांच्या वक्तव्यातील या काही ठळक नोंदी.

मॉर्टन यांचा प्रवास सुरू झाला १९९९मध्ये, त्यावेळी ते डेन्मार्क मध्ये जैव तंत्रज्ञानाचा अभ्यास करत होते, आणि वर्षभराचा अवकाश घेऊन काहीतरी वेगळे शिकण्याचा विचार करत होते. त्यावेळी त्यांच्याकडे संगणकाची सुविधा होती, कामाला सुरुवात केली आणि रुची वाढत गेली. त्यांनी याच क्षेत्रात काम करायचे ठरविले आणि शेवटी मिकल यांच्या सोबत काम सुरू केले, जे आता झेनडेस्क मध्ये सीईओ आहेत.

image


त्यांच्या उद्योगाती अनुभवाचा आधार घेत मॉर्टन, मिकल आणि आलेक्झांडर यांनी बाजारात ऑन डिमांड संगणकीय सेवा पुरवण्याची संधी हेरली जो संगणकातील सुलभीकरणाचा प्रयत्न होता. मॉर्टेन नमूद करतात की, जेंव्हा आम्ही सुलभपणाचे आणि सहजपणे वापरण्याचे साधन तयार करण्याचा विचार करत होतो, ते काम करणे खूप गुंतागुंतीचे आणि अवघड होते. त्याकाळी २०००च्या सुमारास अशाप्रकारचे सॉफ्टवेअर विकसित करणे जिकरीचे समजले जात होते.

सन२००५ मध्ये या तीन सह-संस्थापकांनी जवळपास अर्धवेळ सल्लागार म्हणून काम केले त्याचवेळी साॅफ्टवेअर विकसित करण्याचे काम सुरूच होते. जे नंतर अनेक अडचणीवर मात करत झेनडेस्क बनले. मॉर्टन यांनी नमूद केले की एक उद्यमी म्हणून त्यांच्या उत्पादनात काय असावे याचे ज्ञान असावे लागते त्यातून त्यांच्या उद्योगाच्या महत्वाच्या पायाभूत बाबी तयार होत असतात. 

ऑक्टोबर २००७मध्ये संस्थापकांनी झेनडेस्कसाठी संपूर्णवेळ काम सुरू केले. त्यांच्या उत्पादनाचा हळूहळू विकास झाला कारण SaaS suite तयार करणा-या अनेक कंपन्या होत्या मात्र त्यांना निधी बाहेरून उभारणे खूप जड जात होते. मॉर्टेन म्हणतात की तो काळ म्हणजे कठीण असा काळ होता. कारण तंत्रज्ञान विकास करण्यासाठी आवश्यक पैसा नव्हता आणि त्याशिवाय विकास होणे शक्य नव्हते. त्यांनी असेही सांगितले की, डेन्मार्क मध्ये गुंतवणूकीला मंदी आली होती आणि त्यांना तर त्याशिवाय काहीच पर्याय दिसत नव्हता.

image


त्यांनी त्यांचे मित्र आणि परिवारातील लोकांना गा-हाणे घालण्यास सुरुवात केली, आणि त्यांच्या कंपनीला काही भांडवल द्यावे म्हणून गळ घातली. त्यांनी घरच्यांचा खूपच पिच्छा पुरविला आणि त्यांना त्यात यश येत गेले.

झेनडेस्कला आणखी एक धक्का बसला ज्यावेळी आघाडीचे गुंतवणूकदार जेसन कॅलाकनिस यांनी आणि माईक ऍरिंगटन यांनी झेनडेस्क अगदीच सामान्य असल्याचे समजून टेक क्रंच टेक५० चा भाग होण्यास नकार दिला. या नकारा बाबत सांगताना मॉर्टेन म्हणतात की, ‘म्हणून वाईट वाटून घेऊ नका जर तुम्हाला यूअरस्टोरीच्या टेक३०मध्ये नाकारण्यात आले, तुम्ही तरीसुध्दा यश मिळवू शकता’ मॉर्टेन यांनी नमूद केले की, त्यांना इतर गुंतवणूकदार मिळाले आणि त्यांना त्यांच्यावर विश्वास होता आणि ते त्यांना मदतही करत होते ज्यातून झेनडेस्कचा विस्तार झाला. २००९मध्ये झेनडेस्क मध्ये बीज भांडवल म्हणून त्यांनी पाच लाख डॉलर्स गुंतविले आणि त्यातून ८५.५ दशलक्ष डॉलर्सची कमाई केली. ज्यात चौफेर गुंतवणूकीचे प्रस्ताव आले जसे की, मार्टिक्स पार्टनर्स, रेडपॉइंट आणि बेंचमार्क.

२०१४मध्ये झेनडेस्कने आयपीओ बाजारात दाखल केला आहे ज्याला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मॉर्टेन म्हणाले की भारतातील वाढ आणि विस्ताराच्या संधी पाहून त्यांना बरे वाटले आहे की, इथे कार्यालय सुरू करण्याचा त्याचा विचार पक्का झाला आहे. काही स्टार्टअपसाठी झेनडेस्क त्याच्या सेवा वर्षभर मोफत देणार आहेत त्यासाठी खालील संकेतस्थळावर अर्ज करा.

www.zendesk.com/startups/

लेखक : हर्शित मल्या