लॉजिस्टिक्स व्यापारी आणि ग्राहक यांच्यातील दरी साधणारं 'सेंडइट'

0

सध्या लॉजिस्टिक्सच्या स्टार्टअप्समध्ये बेसुमार वाढ झालीये. पण नुसती वाहनांच्या संख्येत भर टाकण्यापेक्षा लॉजिस्टिक्सबद्दलच्या सगळ्या समस्या सोडवण्यावर सेंडइटचा भर आहे. सेंडइट.इन हा लॉजिस्टिक्सचा ऑनलाईन बाजार आहे.

रस्यावरून प्रवास करणाऱ्यांना हे चांगलं माहिती आहे की महामार्गावर ट्रक्सची रांग असतेच. बंगळुरु ते दावणगिरी असा बाईकवरून प्रवास करताना नवीन बगरेचा आणि पुनीत बी यांना तंत्रज्ञानावर आधारित मागणीनुसार ट्रकचा पुरवठा करण्याची संकल्पना सुचली. पंकज सिसोदिया, दर्पम जैन आणि गौरव या मित्रांसोबत त्यांनी काम सुरु केलं.


सध्याच्या परिस्थितीत यूजरला काम करणाऱ्या अर्थात ऑपरेटरसोबत वैयक्तिक संपर्क साधावा लागतो. यामुळे विश्वास, किंमत आणि ग्राहकांचा अनुभव असे अनेक मुद्दे उपस्थित होतात. तर दुसरीकडे, ऑर्डर घेण्यासाठी ऑपरेटर्सशी संवाद व्हायचा नाही. अशाप्रकारे कुठेतरी एकांतात असे व्यवहार व्हायचे आणि पुरेसे स्रोत साठवण्यासाठी जागा नसायची किंवा ऑपरेटरकडे वेळ नसायचा, असं दर्पण सांगतात. वाहतूक ऑपरेटर्स आणि ग्राहक यांच्यात संवाद होऊ शकेल असं एकही समान व्यासपीठ उपलब्ध नव्हतं. वाहतूक ऑपरेटर्स आणि ग्राहक यांच्यात समन्वय साधण्याचं काम करण्याच्या हेतूनं सेंडइट.इनची निर्मिती झाली.

सेंडइट.इन एखाद्या शहरांतर्गत किंवा दोन शहरांमध्ये मालवाहतुकीचे पर्यायही पुरवते. त्यासाठी त्यांच्याकडे मागणीनुसार काम करणारी वाहनं आहेत. सामानाची वाहतूक करण्यासाठी यूजर्सना ऍपवर नोंदणी करावी लागते. याच गरजेनुसार उपलब्ध वाहनांमधून वाहन दिलं जातं. यामध्ये वाहतुकीसाठी लागणारा वेळ, त्यांची सद्यस्थिती, नोंदणीपूर्व सुविधा आणि ट्रीप लॉग्जही उपलब्ध आहेत. आम्ही विश्वास, किंमत, आणि विश्वासार्हता यांना सगळ्यांत जास्त महत्त्व देतो. तसंच माल योग्य वेळेत आणि सुरक्षित पोहोचेल याची काळजी घेतो. तर ऑपरेटर्ससाठी आम्ही त्यांच्या व्यवहारांचं योग्य नियोजन करतो. त्यामुळे एखाद्या विशिष्ट भागात ऑर्डर्सबद्दल माहिती नाही म्हणून त्यांची वाहनं रिकामी जात नाहीत, दर्पण सांगतात.

सेंडइट बंगळुरु आणि पुण्यात कार्यरत आहे. यापुढे इतरही शहरांमध्ये शाखा सुरु करण्याचा त्यांची योजना आहे. वेबसाईट, अँड्रोईड ऐप किंवा फोनवरूनही ग्राहक त्यांच्या ऑर्डरची नोंदणी करू शकतात. योग्य व्यवस्थापन आणि पुरेसा मागोवा घेण्यासाठी सर्व ऑपरेटर्सकडे मोबाईल क्लाएंट इन्स्टॉल करून देण्यात आलं आहे.

अगदी एक वाहन आणि दररोज चार ते पाच व्यवहारांपासून सुरु झालेल्या सेंडइटचे आज ४० ते ५० पेक्षा जास्त व्यवहार होत असल्याचा कंपनीचा दावा आहे. सध्या कंपनी स्थिर आहे, पण सध्या त्यांचे वाहनक्षमता वाढवणं, बाजारपेठेत विस्तार करणं आणि तंत्रज्ञान विकासासाठी निधी मिळवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरु आहेत.

वाहतूक, वेअरहाऊसिंग, मालवाहतूक या सगळ्याचा एकत्रित विचार केल्यास एकूण खर्च ६१ टक्क्यांपर्यंत जातो. याचं कारण म्हणजे बहुतेक सर्व उद्योग त्यांच्या एकूण उत्पन्नाचा ५० टक्के भाग यावरच खर्च करतात, असं दर्पण सांगतात.

आमचं लक्ष्य महानगरांमधील समूह आहे. २०१९ पर्यंत हा उद्योग १७५ अब्ज डॉलर्सपर्यंत विस्तारेल असा अंदाज आहे. ऑपरेटर्सची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांच्यातील दरी मिटवणं महत्त्वाचं आहे, असं दर्पण सांगतात.

कोणत्याही उद्योगात लॉजिस्टीक्स हा विभाग विस्कळीत आणि विखुरलेला असतो. पण इ-कॉमर्स आणि ऑनलाईन व्यवसायामुळे लोकांना वस्तू पुरवठा करणारी ही यंत्रणा संघटीत आणि पारदर्शक हवी आहे.

काही अंदाजांनुसार भारतातील लॉजिस्टिक्स उद्योगात तंत्रज्ञानाचा वापर हा जवळपास २ अब्ज डॉलर्स पर्यंत आहे. हा आकडा दक्षिण पूर्व आशिया आणि मध्य पूर्वेतल्या देशांपेक्षा जास्त आहे. जागतिक स्तरावर ऑरिऑन सॉफ्टवेअर, ऑन फ्लीट, ब्रिंग, इन्फोर, जेडीए सॉफ्टवेअर आणि एलिमेंटम या नावाजलेल्या कंपन्या आहेत.

वेबसाईट : http://sendit.in/

लेखक- सिंधू कश्यप

अनुवाद- सचिन जोशी