मोदी यांच्या एका निर्णयाने सरकारी तिजोरीला लागलेल्या बेईमानीच्या उंदरांची (करचोरांची) झाली दाणादाण!

पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटांचा वापर करुन नागरी स्थानिक संस्थांच्या विविध करांपोटी ८ तासात भरले ८२ कोटी रुपये!

मोदी यांच्या एका निर्णयाने सरकारी तिजोरीला लागलेल्या बेईमानीच्या उंदरांची (करचोरांची) झाली दाणादाण!

Sunday November 13, 2016,

3 min Read

१४नोव्हे.पर्यंत करभरण्याची रक्कम पाचशे कोटीपेक्षा अधिक होण्याची शक्यता नगरविकास सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर यांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या चलनी नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि वर्षांनुवर्ष सरकारी करांची थकीत देणा-या करबुडव्यांच्या मनात भितीने जाग आली.एक हजार व पाचशे रुपये मुल्यांच्या जुन्या नोटांचा वापर करुन नागरी स्थानिक संस्थांच्या विविध करांपोटी नागरीकांनी अवघ्या ८ तासात ८२ कोटी रुपयांचा भरणा केल्याची माहिती नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर यांनी दिली आहे.

केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाने ८ नोव्हेंबर २०१६च्या मध्यरात्रीपासून एक हजार व पाचशे रुपये मुल्यांच्या नोटा व्यवहारातून रद्द केल्या आहेत. यामुळे नागरीकांची अडचण होवू नये यासाठी महानगरपालिका, नगरपालिकांच्या विविध करांचा भरणा, थकबाकी भरण्यासाठी चौदा नोव्हेंबरच्या मध्यरात्री पर्यंत नागरीकांकडून या जुन्या चलनाच्या नोटा स्वीकारण्याची परवानगी मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाला विनंती केली होती.

image


मुख्यमंत्र्यांनी केलेली विनंती केंद्र शासनाने मान्य केल्याने मालमत्ताधारक नागरिकांना महानगरपालिका, नगरपालिकांनी त्यांच्या विविध करांचा भरणा, थकबाकी जुन्या चलनाने भरता यावी यासाठी चौदा नोव्हे. पर्यंत कार्यालये सुरु ठेवली आहे. जुन्या चलनाने विविध करांचा भरणा स्वीकारण्यात येत असल्याने पहिल्याच दिवसभरात राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिकांच्या कार्यालयात विविध करांचा भरणा करण्यासाठी मालमत्ताधारकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. त्यात पहिल्याच दिवसांत विविध करांपोटी ८२ कोटी १३ लाख ५९ हजार रुपयांचा भरणा केला आहे. मध्यरात्रीपर्यंत विविध करांपोटी भरण्याची रक्कम १७० कोटी पेक्षा अधिक होईल असा विश्वास सचिव श्रीमती म्हैसकर-पाटणकर यांनी व्यक्त केला आहे.

जुन्या चलनाने महानगरपालिकानिहाय विविध करांच्या भरणापोटी एकाच दिवसांत जमा झालेली रक्कम थक्क करुन टाकणारी आहे याचा अर्थ पैसे असताना करचोरी करण्याचे आणि सरकारी कर न देण्याच्या प्रवृत्तीचे कंबरडे कसे या निर्णयाने मोडले ते देखील पहायला मिळते.

एका दिवसात बृहन्मुंबई महानगरपालिका- १ कोटी ९७ लाख, नवी मुंबई महानगरपालिका ३ कोटी ३ लाख, कल्याण-डोबिंवली महानगरपालिका ५ कोटी १६ लाख, मीरा-भाईंदर महानगरपालिका २ कोटी ३ लाख, वसई विरार महानगरपालिका २ कोटी २३ लाख, उल्हासनगर महानगरपालिका ४ कोटी ५० लाख, भिवंडी महानगरपालिका १ कोटी, पुणे महानगरपालिका१७ कोटी ६० लाख, पिंपरी चिंचवड महानगरपालिका५ कोटी २५ लाख, ठाणे महानगरपालिका ४ कोटी २५ लाख, सांगली-कुपवाड महानगरपालिका १ कोटी ७० लाख, कोल्हापूर महानगरपालिका- ५१ लाख, अहमदनगर महानगरपालिका १ कोटी ३५ लाख,नाशिक महानगरपालिका ३ कोटी ५० लाख,धुळे महानगरपालिका १ कोटी ९ लाख, जळगांव महानगरपालिका ८७ लाख ४१ हजार,मालेगांव महानगरपालिका ७५ लाख ५४ हजार,सोलापूर महानगरपालिका१ कोटी ७५ लाखऔरंगाबाद महानगरपालिका- १ कोटी ८४ लाखनांदेड-वाघाळा महानगरपालिका- १ कोटी ७ लाख,अकोला महानगरपालिका ५५ लाख,अमरावती महानगरपालिका- 1 कोटी 10 लाख,नागपूर महानगरपालिका- ३ कोटी ५५ लाख,परभणी महानगरपालिका ११ लाख ६४ हजार, लातूर महानगरपालिका- ६२ लाख,चंद्रपूर महानगरपालिका ४६ लाख,राज्यातील सर्व नगरपालिका १४ कोटी २८ लाख

याप्रमाणे एकूण ८२ कोटी १३ लाख ५९ हजार रुपयांचा भरणा अकरा तारखेला केवळ तासाभरात झाला आहे. चौदा नोव्हे. पर्यंत जुन्या चलनाने विविध करांचा भरणा स्वीकारण्यात येणार असल्याने नागरीकांनी आपल्याकडील करांचा भरणा करावा असे आवाहनही श्रीमती म्हैसकर-पाटणकर यांनी केले आहे.