एका महिन्यात १३०० ऑर्डर, लिशसचे लक्ष तीन वर्षाच्या आत भारतातल्या ११ शहरांमध्ये विस्ताराची योजना

0

अभय हुंजरा यांच्या मित्राने एकदा जाहीर केले की, " भारतात आल्यावर मी पूर्णपणे शाकाहारी बनतो". अभयसाठी या गोष्टीने काही फारसा फरक पडत नाही कारण त्यांना वाटते की भारतात सगळ्यात जास्त चविष्ट मांसाहारी पदार्थ मिळतात. जेव्हा त्यांनी खोलात जाऊन या गोष्टीची तपशीलवार माहिती घेतली तेव्हा त्यांना कळले की येथे वापरण्यात येणाऱ्या मांसाच्या(मटण) गुणवत्तेबाबत बऱ्याच लोकांना शंका होती. अभय आणि त्यांच्या मित्राने लिशस (licious) ची सुरुवात केली. जी कंपनी ताजे मांस पोहोचवण्याचे काम करते. विवेक यांनी हिलीयन व्हेंचर्स यांच्या सोबत फंडासाठी लागणारे पोर्टफ़ोलिओ, स्केल आणि रणनीती यांचा बारकाईने अभ्यास केला, तर दुसरीकडे अभय फ्युचूरिस्क  (futurisk)मध्ये व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करत होते जी एक जोखीम सल्लागार आणि कॉर्पोरेट विमा ब्रोकरेज संस्था आहे. दोघेही आपल्या नोकरीत आनंदी होते. एक दिवस अचानक अभयला ताज्या मटणाच्या क्षेत्रात नवीन स्टार्टअप करण्याचा विचार आला. या विचारांना प्रेरित करणारी घटना म्हणजे त्यांनी जे मटण चॉप आणि फिश स्टिक ची ऑर्डर दिली होती त्याला मुळीच चव नव्हती. हॉटेल स्टाफशी बोलतांना त्यांना कळले की ही डीश बनवण्यासाठी त्यांनी गोठवलेले मांस ( frozen meats)वापरले आहे.


विवेकला राजी करण्याच्या घटनेने अभयचा उत्साह वाढला. अभय सांगतात की, "मला असे वाटते की विसी बरोबर अनेक वर्ष काम केल्यामुळे विवेकने या गोष्टीला गंभीरतेने बघितले नाही आणि ते झटकून टाकले". पण अभयला कल्पना होती की ही एक अशी वस्तू आहे जिच्या व्यवसायाविषयी त्यांना खात्री होती. ग्राहक हे मांस विकत घेण्याआगोदर काय विचार करतात आणि त्यासाठी काय करावे लागेल या संदर्भातील माहिती मिळवण्यासाठी त्यांनी गुडगाव व बेंगलोर मध्ये एक स्वतंत्र शोध मोहीम सुरु केली. बाजारातील पूर्ण माहिती गोळा केल्यानंतर अभय यांनी विवेकच्या ऑफिस मध्ये प्रेसेंटेशन सह त्यांची भेट घेतली. त्यावेळेस विवेक यांना अभय ह्या क्षेत्राविषयी गंभीरतेने विचार करीत असल्याची जाणीव झाली. इथेच संधी आपली वाट बघत आहे आणि ज्या गोष्टीचा कोणीही विचार केला नाही. या असंघटीत व फारसा माहित नसलेल्या उद्योगात काहीतरी नवीन करणे शक्य होते. जेव्हा त्यांनी आपली अभिनव कल्पना आपले मालक कंवलजीत सिंह आणि प्रवीण दास यांना सांगितली व पटवून दिली तेव्हा ते दोघेजण त्यांचे पहिले गुंतवणूकदार बनण्यासाठी तयार झाले. त्यांनी आपले पहिले ऑफिस मित्राच्या इमारतीतच सुरु केले. अभय सांगतात की, ‘आम्हाला हे जाणवले की या समस्येचे समाधान शोधले पाहिजे कारण बाजारात उपलब्धतेची कोणतीच समस्या नव्हती आणि आम्ही हा निर्णय घेतला की आपल्या वस्तूंचा एक ठराविक ब्रांड निश्चित करणे, कारण ग्राहकांचे आपल्याशी संलग्न होण्यासाठी ब्रांडच्या आश्वासनाची पूर्ती होणे जास्त गरजेचे आहे. यासाठी बाजारातल्या उपस्थित असलेल्या सगळ्या उत्तम ब्रांड सल्लागारांबरोबर काम केले. फ़्रेस्कॉमेँट, चाॅपशाॅप365, पेपाबुचर, आणि चोम्प्बॉक्स यासारख्या तीनशे नावांच्या शोधमोहिमेनंतर लिशीसला पसंती दिली. त्यांनी सामुहिकरित्या ताजे मटण पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. जिथे त्यांनी गुणवत्तेला जास्त प्राधान्य दिले. या जोडीला हे पूर्णता जाणवले की कोर टीमबरोबर काम करणे जास्त योग्य आहे. त्यासाठी या क्षेत्रातल्या विशेषतज्ञ आणि दीर्घ अनुभवी लोकांना आपल्या टीममध्ये सामील केले त्याचबरोबर अभय सांगतात की त्यांनी प्रारंभी काटकसरीने उर्जा वापरून एक मजबूत आर्थिक पाया तयार केला. अभय सांगतात की , "देशातले सगळ्यात पहिले आणि मोठे हापरमार्केट मध्ये यशस्वीरित्या बॅक एंड ऑपरेशन व वितरण साखळी स्थापन करणारे लोक आमच्या तज्ञ टीमचे सदस्य आहेत. टीमला किचकट वितरण व्यवस्था आणि कोल्ड चेन व्यवस्थापनाची चांगली माहिती आहे". लिशसकडे अत्याधुनिक सेन्ट्रल प्रोसेसिंग युनिट आहे जिथे उत्पादनाच्या मापदंडाचे, सुरक्षितता, पर्यावरण आणि गुणवत्तेच्या व्यवस्थापनाच्या नियमांचे काटेकोर पालन केले जाते आणि या नंतर प्रोडक्शनसाठी माल पुढे पाठवला जातो. ज्यात तज्ज्ञ शेफची एक टीम आणि कुशल खाटिक जे या प्रक्रियेत लक्ष ठेवतात, ज्यात स्वच्छता, सफाई आणि मांस कापण्याची प्रक्रिया होते. यानंतर मांस तात्पुरत्या शीतगृहात पाठविले जाते जिथून पुढे हे वितरण केंद्रात पाठवतात, जी पूर्ण बंगळूरूमध्ये पसरलेली आहेत. ग्राहक कोणत्या भागातून मालाची मागणी नोंदवत आहे ते पाहून केंद्राचे व्यवस्थापक शेवटच्या क्षणाला गुणवत्ता तपासून माल पुढे पाठवतात. फ्रेश चेन व्यवस्थापन शेवटच्या क्षणापर्यंत टिकवून ठेवली जाते. अभय सांगतात की, "आम्ही ग्राहकांना विश्वास देतो की आमचा माल हा किती ताजा असतो की, कोचीनची सगळ्यात उत्तम सीर नावाची मासळी आणि झिंगे ज्या दिवशी पकडलेले असतात ते २४ तासांच्या आत ग्राहकांच्या सेवेत आम्ही हजर करतो". ते मोठ्या आनंदाने सांगतात की, "लिशस हे बंगळूरूच्या मांस प्रेमींना आपल्याकडे आकर्षित करीत आहे".

पूर्णपणे सक्रीय झाल्यावर कंपनीने एका महिन्यात १३०० ऑर्डर पूर्ण केल्या आहेत. या ऑर्डर माराथल्लीच्या वितरण केंद्रातून पूर्ण होतात. अभय सांगतात की, "यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे आणि आमचे दुसरे केंद्र कमानाहल्ली येथून पण काम सुरु केले आहे. आम्हाला प्राथमिक गुंतवणूकदारांकडून जी आर्थिक सहायता मिळाली त्या निधीचा उपयोग तीन वितरण केंद्र उघडण्यासाठी केला. टीमला आपल्या सुरुवातीच्या संशोधनानुसार हे जाणवले की भारतीय मांस बाजार हा ३० अब्ज डॉलर च्या आसपास आहे आणि त्यांचा मास निर्यातीत नंबर बराच वर आहे. अभय पुढे सांगतात की, ‘जवळजवळ ९०% बाजार हा असंघटीत आहे आणि संघटीत व्यापार हा इतर गोष्टींवर काम करीत आहे. या क्षेत्रात बरेच लोक फ्रोजन अन्न या क्षेत्रात काम करीत आहेत आणि त्यांचे लक्ष हे निर्यातीवर आहे.’

त्यांच्या वक्तव्यानुसार बरेच शहरी ग्राहक मांसाच्या मूळस्त्रोताबाबत किंवा त्याच्या निर्मितीबाबत अनभिज्ञ आहेत याची जबाबदारी त्यांनी पूर्णपणे आपल्या नोकरांवर सोपवली असते. धावपळीची जीवनशैली आणि वेळेच्या अभावामुळे बऱ्याच लोकांना फ्रोजन मांस खाण्याशिवाय पर्याय नाही कारण त्यांना हे त्यांच्या सोयीचे वाटत असते. वास्तवात मर्मबिंदू हा स्वच्छता आणि मटणाच्या ताजेपणात आहे कारण तोच पुढे विश्वास कायम करतो. अभय सांगतात की, ‘येणाऱ्या वर्षात आमचे लक्ष या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या पर्यावरणाचे प्रत्येक मुल्य सांभाळून योजनाबद्ध पद्धतीने या क्षेत्राचे व्यवस्थापन करण्याचे आहे. आम्ही सर्वश्रेष्ठ टीमला बरोबर घेऊन काम करीत आहोत जे ग्राहक व्यापार मॉडेलच्या अडचणींना आणि आर्थिक व्यवहारांना समजू शकतात. लिशस पुढच्या तीन महिन्यात आपली फ्रंट एंड ही योजना ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून नवीन स्वरुपात बनवीत आहे. याशिवाय कंपनी ताजे आणि मसालेदार या नवीन श्रेणीची योजना आखत आहे. खवय्यांसाठी काही आकर्षक योजना या क्षेत्रात जोडण्याच्या संदर्भात कंपनी विचार करीत आहे. अभय यांच्या मतानुसार, "आजच्या तारखेपासून पुढच्या तीन वर्षात ११ शहरांमध्ये त्यांचा नवीन व्यवसाय सुरु करण्याचा प्रयत्न आहे आणि लिशस ला भारताचा सगळ्यात अधिक लोकप्रिय खाद्य ब्रांडचा दर्जा देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत". याशिवाय कंपनी ताजे आणि मसालेदार या नवीन श्रेणीची तसेच खवय्यांसाठी काही आकर्षक योजना या क्षेत्रात जोडण्याच्या संदर्भात विचार करीत आहे.

लेखिका : सिंधु कश्यप

अनुवाद : किरण ठाकरे