दूरदर्शनच्या प्रतिकात्मक बोधचिन्हा मागची कहाणी जी आता लवकर इतिहासजमा होत आहे!

दूरदर्शनच्या प्रतिकात्मक बोधचिन्हा मागची कहाणी जी आता लवकर इतिहासजमा होत आहे!

Saturday August 19, 2017,

2 min Read

भारताचा सार्वजनिक सेवा ब्रॉटकास्टर (प्रसारक) नवी दिल्ली येथे १५ सप्टेंबर १९५९ रोजी प्रसारित झाला. प्रसार भारतीचा(जी देशातील सार्वजनिक सेवा आहे) एक भाग म्हणून प्रायोगिक तत्वावर हे प्रसारण लहानश्या ट्रान्समीटरच्या मदतीने सुरू करण्यात आले आणि लवकरच देशाच्या सर्वात मोठ्या प्रसारण सेवेच्या रूपात याचा विस्तार करण्यात आला.


image


ते १९६५ चे वर्ष होते त्यावेळी केवळ दूरदर्शन हेच प्रसारण नियमीतपणे ऑल इंडिया रेडीओचा भाग म्हणून सुरू होते. १९७२ मध्ये दूरचित्रवाणी सेवा मुंबई आणि अमृतसर येथे विस्तारण्यात आली. या वाहिनीचा ध्वनी आणि बोधचिन्ह त्यावेळपासून लोकांच्या समोर आहे असे याबाबतच्या माहितीमध्ये म्हटले आहे. हे सर्वपरिचीत बोधचिन्ह लवकरच निवृत्त होत आहे जेणे करून नविन प्रेक्षकांशी या वाहिनीला जुळवून घेता यावे. हे ते क्षण आहेत ज्यावेळी या बोधचिन्हाचा जन्म झाला तेंव्हाच्या आठवणीची उजळणी करावी!

राष्ट्रीय आरेखन संस्था येथील कलावंत देवाशिष भट्टाचार्य हे या बोधचिन्हाचे कर्ते करविते आहेत. ज्यानी ‘डी डी आय’ तयार केले. ते आणि त्यांच्या आठ मित्रांनी मिळून अहमदाबाद येथे एनआयडीच्या प्रकल्पात काम केले. ज्यावेळी दूरदर्शन हा ऑल इंडिया रेडीओचाच एक उपविभाग होता.

त्यांनी दोन वळणे आरेखित केली, ज्यातून यीन आणि यांगसह १४पैकी एका कहाणीसोबत त्यांच्या शिक्षकांना विकास सटवेलकर यांना सादर केली. त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हे आरेखन मान्य केले असे याबाबतच्या वृत्तात म्हटले आहे.

‘मला केवळ माझ्यासारख्याच भावना त्यानी व्यक्त केल्याचे समाधान मिळाले’ असे याबाबत भट्टाचार्य म्हणाले.

त्यानंतर ८० आणि ९०च्या दशकात या आरेखनात काही सुधारणा करण्यात आल्या. एनआयडीच्या विद्यार्थ्यांना त्यासाठी पुन्हा काही नव्या कल्पना देण्यास सांगण्यात आले, त्यावेळी अन्य एक विद्यार्थी कलावंत आर एल मिस्त्री यांनी ऍनिमेशनच्या मुख्य चिन्हाचे काम केले. त्यांनी त्यांच्या कॅमेराने याचे अनेक छायाचित्र तयार केले आणि शेवटी ‘डी डी आय’ पर्यंत पोहोचेपर्यत त्यांना फिरवत गती दिली. पंडीत रवीशंकर यांनी उस्ताद अली हुसेन खान यांच्या सोबत ट्रेडमार्क असलेल्या दूरदर्शनची धून तयार केली आणि १ एप्रिल १९७६ला प्रथम तिचे प्रसारण झाले. १९७५ पर्यंत जी वाहिनी देशाच्या केवळ सात शहरात दिसत होती त्यानंतर अनेक ठिकाणी दाखवण्यात येवू लागली.