प्रवाहाविरुध्द पोहण्याची जिद्द देऊन घडविले शेकडो उद्यमी, पहिल्या महिला ब्रँन्ड गुरु ‘जान्हवी राऊळ’ यांच्या यशाची कहाणी!

0

आज भारत सरकारच लोकांना ‘स्टार्टअप-स्टँन्डअप इंडिया’ असे आवाहन करत उद्योग करण्यासाठी प्रोत्साहित करताना दिसते आहे. पण फार पूर्वी कशाला अगदी दोन-चार वर्षआधी डोकावून  पाहिले तर भले-भले सुशिक्षित लोक सुध्दा नोकरी बरी, उद्योगाच्या वाटेला न जाणेच बरे असा तद्दन मध्यमवर्गीय मानसिकतेच्या शहाणपणाचा विचार करत आणि सल्लाही देत असत. यात सध्याही फारशी वेगळी स्थिती नाही बरे! पण या सा-या निराशाजनक वातावरणातही कुणीतरी व्यक्ती तुम्हाला कोणत्या उद्योगाची उभारणी करायची आहे याची माहिती देऊन त्यासाठी यश कसे मिळवायचे? याची माहिती देण्यासाठी तत्पर आहे हे सांगितले तर त्या व्यक्तीच्या धाडसाचे कौतुकच करायला हवे. इतरांना उदमी बनवण्यासाठी धडपडण्याचा हा उद्योग सुमारे बारा वर्षापासून अविरतपणाने करणा-या जान्हवी राऊळ यांच्याशी युअर स्टोरीने महिला दिनाच्या निमित्ताने बातचीत केली.  जीवन-मरणाच्या प्रसंगातून आयुष्य व्यतीत करातानाही स्वत:च्या जगण्याचे भान राखत स्वत:च्या बुध्दीमत्तेचा उपयोग इतरांसाठी करणा-या आणि त्यातून अनेकांचे आयुष्य उभे करण्यासाठी कळत-नकळत सहभागी झालेल्या या उद्यमींच्या पहिल्या महिला ब्रँन्ड गुरूच्या यशाची ही कहाणी –

युअरस्टोरीने संपर्क केला असता आपल्या वाटचालीबाबत त्या म्हणाल्या की, महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच हाती असलेल्या कलेच्या गुणाचे कौतुक झाले आणि चांगल्या नोकरीच्या मागण्याही आल्या. मात्र मनात काहीतरी वेगळेच होते. नोकरीत आपल्या मनाचे समाधान नाही त्यामुळे आपण आपला व्यवसाय करू या भावनेने लघु उद्योजकांना मार्गदर्शन करण्याच्या उपक्रमाची सुरूवात २००६मध्ये बीग आयडिया कम्युनिकेशनच्या माध्यामातून केल्याचे जान्हवी सांगतात. “नंतर आम्ही उद्योगिनीच्या मीनलताई मोहाडीकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि इतर अनेक गणमान्य लोकांच्या मदत आणि मार्गदर्शनाचा लाभ झाला आणि हाती घतेलेल्या कार्याला दिशा मिळत गेली”, जान्हवी म्हणाल्या.

एखादा उद्योग सुरू कसा करावा त्यासाठी आपली बलस्थाने कोणती किंवा कमतरता कोणत्या याचा वेध कसा घ्यायचा या पासून कश्याप्रकारे भांडवल, बाजार , विपणन किंवा जाहिराती  यांचे व्यवस्थापन करायचे सरकारी मदत मार्गदर्शन किंवा नोंदणी, परवाने यासाठी काय करावे लागते या सा-या गोष्टी त्यांनी आपल्या पतीच्या सहकार्याने केल्या. मात्र त्या आधीच्या काळात घरातून विरोधाच्या वातावरणाचाही सामना करावा लागला होता असे त्या सांगतात. मध्यमवर्गीय  मानसिकतेमध्ये मुलगी आणि ती सुध्दा शहाण्णव कुळी घरातील मराठी म्हटली की, तिला मर्यादाच मर्यादा असतात तसाच काहीसा हा प्रकार होता असे त्या सांगतात. वडिलांची काळजी त्यानुसार योग्यच होती पण त्यांच्या चाकोरीतील विचारांना जान्हवी यांनी मुळीच दाद दिली नाही, विरोध पत्करून त्या उभ्या राहिल्या. सुदैवाने पतीची त्यांना चांगली साथ लाभली. इतकी की स्वत:ची नोकरी सोडून त्यांनी पत्निच्याच कामात सहभागी होण्याचा आणि दोघा़ंनी मिळून हा व्यवसाय वाढविण्याचा निर्णय घेतला. आता व्यवसाय ब-यापैकी जम धरतो आहे आहे असे वाटले होते. त्यासाठी नवे कार्यालय वगैरे घेण्याची तयारी झाली होती. आणि अचानकपणे एक दिवशी छातीत दुखू लागले. जान्हवी म्हणाल्या. “ डॉक्टरांनी सांगितले की तातडीने ह्रदय शस्त्रक्रिया करावी लागेल. होता नव्हता तो सारा पैसा त्यात खर्च झाला. शस्त्रक्रिया करण्यासाठी जाताना पडल्या-पडल्या मनात विचार आले की आपण सा-या गोष्टी केल्या पण स्वत:च्या स्वास्थ्याकडे बघायला वेळच दिला नाही. आता सारी मेहनत करून काहीच हाती लागणार नाही. यातून जीव वाचला तरी पुढे काय करायचे? हाती शुन्य राहिले होते. मग काय किड्या-मुंगीसारखे मरुन जायचे का? या विचाराने रुग्णशैयेवर असतानाही काहूर माजले. आणि तेथेच एक पुस्तक लिहिण्याची संकल्पना सुचली आपण उद्या या जगात नसलो तरी आपल्याला जे कार्य करायचे होते ते करण्याची उमेद त्यामागे होती”. जान्हवी सांगतात.

पण म्हणतात ना चांगल्या भावनेने केलेल्या कार्याला यश हे येणारच. तसेच झाले. या पुस्तकाच्या वितरण किंवा प्रकाशन यांचा फारसा काहीच अनुभव नसताना आयडियल सारख्या संस्थेने स्वत:हून विचारणा करत या पुस्तकाच्या अक्षरश: शेकडो प्रती विकल्या गेल्या. त्यातून एक नवी उभारी मिळाली अगदी शुन्यापर्यंत गेलेल्या मनातील इच्छा आकांक्षांना नवी पालवी फुटली. मराठीत उद्योगाच्या जगात कसे यावे हे सांगणारे मार्गदर्शन कराणारे हे पहिलेच पुस्तक होते. मग असंख्य लोकांनी, माध्यमांनी त्यासाठी प्रचार आणि प्रसिध्दी मिळवून दिली. आणि मराठीतील पहिली महिला ब्रँन्ड गुरू अशी उपाधीसुध्दा दिली असे त्या सांगतात.

त्यानंतर मग एक वेगळीच सुरुवात झाली. स्वत:ची कन्सल्टन्सी सुरू केली. समुपदेशन, मार्गदर्शन आणि स्तंभलेखन असे सारे सुरू झाले त्यातून असंख्य लोकांना कळत-नकळत उद्यमी  करण्यासाठी प्रेरित केले, इतके की अनेक जणांना प्रत्यक्षात कधी भेटले सुध्दा नाही पण त्यांनी आमच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतल्याचे आणि यश मिळवल्याचे स्वत:च येऊन सांगितले याचे समाधान वाटले असे त्या म्हणाल्या.

खादी-ग्रामोद्योग विभागाने मग त्यांच्यासाठी अभ्यासक्रम तयार करून देण्यासाठी विचारणा केली आणि त्यांच्यासाठी कार्य सुरू झाले. जान्हवी म्हणाल्या. उद्योग कसा निवडावा, त्याची सुरुवात करताना काय करावे, काय करु नये, परवाने, ट्रेडमार्क, पँकींग, सेवा, जाहीरात या सा-या अंगाची माहिती त्यातील धोके यावर माहिती मार्गदर्शन सुरू झाले. त्यामुळे अनेकांना यशस्वीपणाने उद्योग उभा करता आला.

सध्या तीन दिवसांचे अभ्यासक्रम घेऊन नवे उद्योजक घडविण्याचे काम सुरू आहे असे त्या म्हणाल्या. मोदी सरकारच्या स्टार्टअप कार्यक्रमाला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाल्याने त्याठिकाणी खूप गर्दी झाली पण लोकांना अद्याप उद्योग म्हणजे सहजपणाने सरकारी कर्ज मिळवणे इतकेच माहिती असते हे दिसून आले असे त्या म्हणाल्या. त्यातील  गांभीर्य आणि जबाबदारी समजल्यावर या उत्साहीपणाला एक नक्की दिशा मिळते आणि नव्या उद्योगाच्या दिशेने वाटचाल सुरू होते. त्यामुळे लोकांना खरेच उद्योजक म्हणजे काय? हे सांगायची गरज आहे त्यांना जागृत करायचे आहे असे त्या म्हणाल्या.

आपल्याजवळ गुंतवण्यासाठी भांडवल, जमीन, किंवा मनुष्यबळ आहे तर नोकरीची मानसिकता सोडून उद्योग केला पाहिजे तर तो कसा करावा ? आणि यश मिळवावे यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम आत राऊळ दंपती करत आहेत. महिला बचत गटांनाही त्याची उत्पादने मॉल सारख्या ठिकाणी विकता येतील यासाठी त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे. हा प्रवास आता सुरुच राहणार आहे. येत्या१५ मार्चला त्यांची कार्यशाळा होणार आहे त्याची जाहीरात समुह संपर्क माध्यमातून त्यांनी काहीशी अशी केली आहे-

“अजून किती वर्षे नोकरी कि उद्योग यात छापा काटा खेळत राहणार ….

आता डोळे उघण्याची वेळ आली आहे ……

खूप वाईट वाटतं आपल्या देशाची उच्चशिक्षित पिढी नेहमीच्या चाकोऱ्या मोडायला हवी तितकी पुढे सरसावत नाही ? का? याची उत्तरे शोधताना कळलं उद्योगक्षेत्र याबद्दलचे ऐकिव गैरसमज,भीती, व त्यामुळे असलेला घरच्यांचा विरोध व तितकंच महत्वाचं उद्योगक्षेत्रात पदार्पण करताना महत्वाचे उद्योगाचे शिक्षण व सरकारी नियम व इतर माहिती याची कमतरता.

म्हणूनच आम्ही घेऊन आलोय अश्याच गोंधळलेल्या होतकरू नव उद्योजक होऊ पाहणाऱ्या उद्योजकांसाठी उद्योगाचे परिपूर्ण शिक्षण देणारी अनोखी कार्यशाळा .

Khadi and Village Industries Commission (Ministry of Micro Small and Medium Enterprises Government of India) & BRANDGURU Training & Consultancy यांच्या संयुक्त विद्यमानाने सरकारमान्य Pre E.D.P( Pre Entrepreneurs Development Program ) (गव्हरमेंट सेर्टीफीकेट कार्यशाळा.)

विचार करण्यात वेळ घालवू नका एक खंबीर पाऊल उचला व स्वप्ने सत्यात उतरवा !

जान्हवी राऊळ .

महाराष्ट्राची पहिली महिला ब्रॅन्ड गुरू

9820310296 / 9820655983 / 28694524 / 022 28982043

या सारख्या आणखी काही यशस्वी महिला उद्यमिंच्या कहाण्या वाचण्यासाठी YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

महिला नेतृत्वाचे प्रतिक - ग्लोबललॉजिकच्या ए.नंदिनी

किरण मुझुमदार शॉ, भारतीय उद्योगजगतातील एक प्रेरणादायी नाव

रिलोकेशन इण्डस्ट्रीची पुनःव्याख्या करणारी २९ वर्षांची आकांक्षा


working as accridated jurno from last15yrs.at mumbai mantrly political beat. working for documentry films making, scriptting, tv shows &print media .intersted in social issues.

Stories by kishor apte