मधुमेहाने कुटूंबातील दोन जण गमावल्यानंतर, अवनी मधानी यांनी या रोगाला पराभूत करण्याचे संस्थात्मक कार्य केले!

मधुमेहाने कुटूंबातील दोन जण गमावल्यानंतर, अवनी मधानी यांनी या रोगाला पराभूत करण्याचे संस्थात्मक कार्य केले!

Monday January 23, 2017,

4 min Read

कुटूंबात दोघांचा मधुमेहाने मृत्यू झाल्याने अवनी मधानी यांना या जीवघेण्या आजाराची आणि भारतीय लोकांच्या जीवनात या रोगाशी लढताना येणा-या अडचणींची चांगलीच कल्पना आली. त्यांच्या संशोधनात १६ वर्षीय अवनी यांना आढळून आले की, मधुमेहाशी दोन हात करताना त्यातील आव्हाने काय त्यांच्याशी कसे लढावे यांचे काहीच ज्ञान किंवा माहिती लोकांना नाही.

भाषा हा त्यातील प्रमुख अडसर असल्याचे त्यांच्या लक्षात आले, फारच थोड्या संकेतस्थळांवर मधुमेहाबाबत भारतीय भाषांमध्ये माहिती असते, आहार-पथ्य हा या रोगाशी लढण्याचा महत्वाचा भाग असतो, त्यांना हे देखील दिसून आले की भारतीयांना खाद्य पदार्थाच्या जीवनसत्वा बाबतची काहीच माहिती नसते.


अवनी मधानी, संस्थापक, द हेल्दी बीट

अवनी मधानी, संस्थापक, द हेल्दी बीट


अवनी यांच्या लक्षात आले की योग्य आहाराबाबतच्या अज्ञानातूनच, आरोग्य वर्धक आहार कोणता आणि कसा घ्यावा याची जागृकता नसल्यानेही लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयरोगासारखे विकार बळावतात. याच माहितीच्या आभावाच्या तळमळीतून अवनी यांनी जानेवारी महिन्यात हेल्थीबीट सुरू केले. त्यांचा दावा आहे की अशाप्रकारे भारतीय खाद्यान्नाच्या जीवनसत्वांच्या आणि कॅलरीजच्या माहितीचा संचय तसेच आहाराबाबत जागृती करणारा त्यांचा एकमेव मंच सध्या कार्यरत आहे. हे संकेतस्थळ हिंदी आणि इंग्रजीत उपलब्ध आहे.

हेल्थी बीटच्या मध्यमातून, वापरकर्ते त्यांचे योग्य वजन किती असावे हे पाहू शकतात, योग्य आहार कसा आणि कोणता तसेच तो दररोज कुठून घ्यावा हे पाहू शकतात. त्याचप्रमाणे त्यांना सुचविलेल्या आहाराची कॅलरी क्षमता किती ते देखील त्यांना समजते. या मंचावर वापरकर्ते रोजच्या खाद्यांचे मिश्रण कोणते असावे, त्यांच्या किमती, त्यांचे कॅलरीच्या दृष्टीने योग्य वजन, प्रमाण, प्रथिने, सत्वे, आणि आरोग्यवर्धकता यांची माहिती घेवू शकतात.

“ हेल्थी बीट हे ना नफा तत्वावर चालते, हा सेवा प्रकल्प आहे, आणि मला संकतस्थळ चालविण्याचे आर्थिक पाठबळ माझ्या पालकांकडून मिळते, मी माझी माहिती इली व्हाइटनी आणि शेरॉन रॉल्फ यांच्या अंडरस्टँडिंग न्यूट्रीशन या पुस्तकातून संकलीत करते, याशिवाय मी अमेरिकेच्या आणि कॅनडाच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या आरोग्य विषयक माहिती आणि तक्त्यांचा आधार घेते. या शिवाय मी न्यूट्रीशन सोसायटी ऑफ इंडिया, साऊथ एशियन हार्ट सेंटर, आणि डायबेटीक आसोसएशन ऑफ इंडिया यांच्या माहितीचा आधार घेते.” असे या कुमारवयीन मुलीने सांगितले जी सध्या कॅलीफोर्नियामध्ये सारातोगा हायस्कू मध्ये शिक्षण घेत आहे. परिश्रमच तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोचवितात.

जरी भारताच्या प्रत्येक भागात त्यांच्या वेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांची मोठी परंपरा असली तरी अवनी यांच्यासाठी त्यातील नेमक्या पाक कृती शोधून त्या उपयुक्त पध्दतीने मांडणे हे आव्हानच होते. भारतीय वेगवेगळ्या चवींच्या अनेक पदार्थाना वेगवेगळ्या रेस्तरॉंमध्ये जावून शोधण्यातून त्यांनी आरोग्यदायक आहाराची यादी तयार केली.

अवनी सांगतात, “अमेरिकेत,आरोग्य विभागाजवळ मोठ्या प्रमाणात माहितीचा खजिना आहे, त्यात बाजारात मधुमेहीना आवश्यक असलेल्या कोणत्या आहारवस्तू उपलब्ध आहेत यांची परिपूर्ण माहिती आहे. मात्र भारतीय अन्नाबाबत ती शोधणे कठिण काम असते. मी स्थानिक भारतीय सुपरमार्केटमध्ये गेले, आणि खोक्यांवरच्या कॅलरीबाबतची माहिती संकलीत केली, त्याशिवाय न्यूट्रीशन सोसायटी ऑफ इंडियाच्या प्रकाशित साहित्याचा माझ्या संकेतस्थऴावर उपयोग केला.” 

न्यूट्रीशन बाबत माहिती देण्यावर हेल्थी बीटने भर दिला, रोजच्या सवयीतून आरोग्याच्या बाबींची माहिती त्यात आहे. त्यात एक सदर आहे, ‘बिल्ड युर मिल’ यात वापरकर्त्यांना वेगवेगळे पदार्थ मिळतात ज्यांत त्यांना आवश्यक पोषणमुल्यांची रचना करता येते.

अवनी यांच्या मते, हेल्थीबीटचे २०हजारपेक्षा जास्त वापरकर्ते आहेत, ज्यावेळी ते जानेवारीच्या सुरुवातीला भारतात सुरु झाले. अवनी यांनी हे ना नफा तत्वावर सुरू केले असल्याने त्यांना सक्रीय वापरकर्ते किती याची माहिती नाही. असे असले तरी गुगलच्या माधयमातून त्यांना वापरकर्ते किती ते समजू शकते.

“ सध्या मी समुह माध्यमातून जागरुकता पोचविण्याचे काम करत आहे, आणि जाहीरातीच्या माध्यमातून व्यक्त केले नाही. हा सध्या ना नफा तत्वावरील उपक्रम आहे. माझ्या सारखे इतर काही उपक्रम आता सुरु झाल्याचे पहायला मिळते आहे.

संख्यात्मक वृध्दीमुळे सोयीचे स्थान

पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडिया यांच्या मते, २० ते ७९ वयोगटातील ४४लाख भारतीयांना माहितीच नाही की ते मधुमेही आहेत, त्यामुळे त्यांची स्थिती ह्रदरोगाच्या दिशने जाते, झटका येणे, ग्लानी येणे, बेशुध्द पडणे, अंधत्व, आणि किडनी आजार त्यातून निर्माण होतात.

सध्या भारतात ६२ दशलक्ष मधुमेही आहेत, त्यात दोन दशलक्षांची वाढ केवळ वर्षभरात झाली आहे. भारत चीनच्या खालोखाल दुसरा देश आहे ज्यात ९२.३ दशलक्ष मधुमेही राहतात, २०३०पर्यंत ही संख्या शंभर दशलक्ष होवू शकते.

यथायोग्य स्टार्टअप यासाठी तयार करण्याची गरज आहे ज्यातून जीवघेण्या आजाराच्या रुग्णांची संख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने नियंत्रणात आणण्यासाठी व्यवस्थापन आणि लक्ष ठेवता यावे. बीटओ त्यासाठी मधुमेहींना काळजी घेण्याचे काम करते आणि त्यांना ४०हजार डाऊन लोड मिळाल्या आहेत. 

Website: The Healthy Beat 

लेखिका : अपराजिता चौधरी