२५ आठवड्यात पुजा कुमार यांनी कसे कमी केले २५ किलो वजन

२५ आठवड्यात पुजा कुमार यांनी कसे कमी केले २५ किलो वजन

Wednesday February 01, 2017,

6 min Read

खूप जणांसाठी वजन घटविणे ही जीवनभराची समस्या असेल. असे जेंव्हा तुम्ही ऐकता की, कुणीतरी २५ हप्त्यात २५ किलो वजन घटविले, तुम्हाला आशा वाटते, जे पुजा कुमार यांनी केले. त्यांनी २५ हप्त्यात २५किलोने वजन घटविले. त्यासाठी त्यांनी कुणाची मदत घेतली नाही पण त्या आता काही इतरांची मदत करतात. त्यांनी जोगोअॅप तयार केले, जे तुम्हाला वजन घटविण्यास मदत करते. 

JogoApp team

JogoApp team


पूर्वपिठिका

जागोअॅप ( प्रारंभीचे नाव 'दि न्यू यू') ची संकल्पना पूजा यांच्या अनेक दिवसांच्या वजन आणि फिटनेस बाबतच्या संघर्षातून निर्माण झाली. दोन मुलांना जन्म दिल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, बाळंतपणानंतरच्या वजन वाढीपासून त्यांची सुटका होवू शकत नाही. पुजा यांना वाटले की वजन घटविणे ही गोष्ट मनाला त्रास देणारी आहे, चुकीच्या पध्दतीने काही करण्यापेक्षा त्याला कुशलपणे काही करुन चमत्कार साधता येतो. अनेक प्रकारच्या उपचार पध्दतीतून गेल्यानंतर जसे की जाने फोंडा प्रेग्नंसी, जन्म आणि बाळंतपणाबाबतच्या आधी आणि नंतरच्या काळजी बाबतच्या डिव्हीडीज, पुजा यांच्या लक्षात आले की वजन घटविणे हे सुध्दा शास्त्र आहे आणि स्वयंस्फूर्तीने त्यांनी त्याबाबत कार्य सुरु केले. त्यांनी त्याकरीता ERER तत्वज्ञानाची मदत घेतली, ज्यात योग्य आहार, योग्य व्यायाम आणि आहाराचे नियोजन यावर भर दिला होता. जसे कि साखर खाण्याऐवजी गूळ वापरावा आणि ब्राऊन राइसच्या जागी साधा राइस वापरावा.

नविन माता म्हणून त्या त्यांच्या बाळासोबत व्यायाम घेण्याचा प्रयत्न करत असत. बाळासह चालण्याचा सराव, बाळाला कॅरिअरमध्ये ठेवून चालणे, पुजा म्हणतात, “ बाळाला चालताना जवळ घ्यावेसे वाटले तर, मी बेबी कॅरिअर वापरत असे, त्यामुळे मला माझ्या बळावर चालणे श्वासाच्या हिशेबाने चालणे शक्य होते. बाळ कॅरिअमध्ये झोपले असेल तरी त्यातून दोघांच्या जवळीकीची जाणिव आणि श्वासांची ऊब मिळत होती.

नंतर त्यांचे बाळ थोडे मोठे झाले आणि सतत लक्ष देण्याची गरज नसल्याने पुजा यांनी जास्त कृतीशील व्यायाम घेण्यास सुरुवात केली. जसे की झुंबा आणि धावणे. त्यातून प्रक्रिया वेगवान होत असते. त्यांना झुंबाचा ( नृत्याचा एक प्रकार) जास्त उपयोग होतो असे लक्षात आले कारण त्यांना नृत्य आवडत असे. पुजा यांनी धावणेही सुरु केले. त्यांनी एका दमात पाच किमी धावण्याचे लक्ष चार हप्त्यांसाठी ठरवून घेतले. त्यांनी दहा किमी आणि २१ किमीच्या मॅरेथॉनचे आव्हानही स्विकारले. त्यांना योग्य आहार मिळतो का हे पाहण्यासाठी त्यानी १०५० कॅलरी वेट प्लान तयार केला. जश्या त्या फिट होत गेल्या त्यांना जाणवले की त्यांच्या पोटाचा घेर वेगाने कमी होत गेला. त्यांच्या लक्षात आले की त्रास असेल त्या भागासाठी विशेष व्यायाम केले पाहिजेत आणि निश्चित काळात त्यांचा निकाल हाती आलाच पाहिजे. २५ आठवडे झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की त्यांनी दहा किलो वजन कमी केले आहे.


पूजा कुमार

पूजा कुमार


त्यांच्या वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत पुजा यांना लक्षात आले की त्यांना महत्वाच्या फिटनेसच्या बाबी समजल्या आहेत. म्हणून त्यांनी संकेतस्थळ सुरु केले. फिटनेस कम्युनिटी आणि यू ट्यूबवरून ते शेअर केले जावू लागले. त्याच वेळी त्यांच्या हे लक्षात आले की या क्षेत्राची व्यवसाय करण्याची मोठी क्षमता आहे. संधी मिळाली तर त्याचा लोकांच्या मनावर ठसा उमटवता येतो.

सुरुवात

जून २०१५मध्ये स्थापना केल्यावर, जोगो मोबाईल अॅपच्या दिशेने प्रवास सुरु झाला. पुजा यांनी एन्टरप्रायजेस पासून स्टार्टअपचा प्रवास सुरु केला. आघाडीचा स्टार्टअप म्हणून वाटचाल केल्यावर त्यांनी उज्जीवन आणि इको या सुस्थापितांसोबत तसेच अमेरिकन एक्सप्रेस सारख्या कंपन्यासोबत भागीदारी करण्याचे ठरविले. त्यांच्या स्थापने नंतर काही महिने जोगोअॅपने बेटा युजर्सना आकर्षित केले. काही महिन्यात त्यांना प्रतिसाद मिळू लागला.

सध्या या व्हेंचर्स सोबत सातजण काम करतात, चार जण उत्पादनावर भर देतात तर तीन जण विक्रीची आणि इतर जबाबदारी पाहतात. पुजा यांना विश्वास आहे तो नैसर्गिक पध्दतीने वजन कमी करतानाच आहार नियोजनातून लयबध्द शरीर तयार करण्यावर.

पुजा यांनी नोंद घेतली की त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे, २०१६ मार्च मध्ये स्टार्टअपला ‘दि न्यू यू’ पासून ‘जागोअॅप’ या नावाने नव्याने लाॅन्च करण्यात आले. ज्यात जोगो म्हणजे पोर्तुगिजमध्ये खेळ असा अर्थ होतो. पुजा म्हणतात की, “ आमची निवड २०१६मधील आघाडीचे स्टार्टअप म्हणून झाली आहे, आणि स्पर्धेसाठी गेल्या चार महिन्यात पहिल्या पन्नास मध्ये आमचा क्रमांक लागतो. ज्यात ‘टिआयई द नॉट’, ‘टेक रॉकेटशिप’, ‘स्टार्ट तेल-अवीव’ आणि ‘माइंडबॅटरिज’ यांचा समावेश आहे. 

जोगोअॅप वापरकर्ते एकतर ईन अॅप जोगो ट्रॅकर वापरू शकतात किंवा गुगलफिट, ऍपल हेल्थ आणि इतर ट्रॅकिंगअॅप्स किंवा डिवाइस वापरू शकतात. पूजा सांगतात की, “जोगो वापरकर्त्याना चांगल्या वातावरणात जाण्यास उद्यूक्त करतो, शिवाय त्यांच्यासाठी योग्य उत्पादने सुचवितो. सध्या आमच्या जवळ एक लाखापेक्षा जास्त उत्पादने आहेत, ज्याच्या दहा श्रेणी आहेत. आणि हजार प्रकार आहेत जे तुम्हाला फिटनेसशी संबंधित सेवा देतात. 

Create ‘Fitfies’: इतर gamification feature, सेल्फी घेण्याची सुविधा (Fitfies)

तुमच्या फिटनेसबाबतच्या कहाण्या देवून इतरांना प्रेरणा देवू शकतात आणि जास्तीचे गुण मिळवू शकतात.

Recommendations: वापरकर्ते त्यांचे मत मांडू शकतात, इतरांचे मत घेवू शकतात आणि स्वत:चे मत त्याच्याशी ताडून पाहू शकतात.

रेव्हेन्यू मॉडेल

ही सुरुवातीची पायरी असली तरी जोगोऍप ला वेगेवगऴ्या माध्यमातून उत्पन्नाची संधी आहे. पुजा सांगतात की नेहमीचे वापरकर्ता जितक्या जणांना बोलावितात त्यावर सध्या मर्यादा आहेत मात्र नंतरच्या काळात ही मर्यादा नसेल. पुजा म्हणाल्या, “ कॉर्पोरेट मध्ये खाजगी आव्हाने असतात, ते कर्मचा-यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतात, आणि एखाद्या लक्ष्यासाठी काम करण्याचे आवाहन करतात. आर्थीक फायद्या शिवाय त्यांना संघटना मजबूत करण्यास याचा फायदा होतो.”

म्हणून पुजा यांना कॉर्पोरेट वेलनेस ही महत्वाची वाटते, कारण कार्पोरेट जगताच्या जीवनशैलीत मोठ्या प्रमाणात आरोग्याची हेळसांड होत असते. त्या दृष्टीने जोगो अॅप्स खेळाच्या पध्दतीने आणि सर्वंकष वेलनेस उपचार सुचविते त्यापैकी बहुतांश त्यांनी तयार केली आहेत. जोगोअॅप्स या व्यवसायातील इतरांपेक्षा वेगळे आहे, जसे की ते संघटीत देशभरातल्या वेगवान इवेंटचे आयोजन करतात, ज्यात आभासी स्पर्धा/ सक्रीय आव्हाने असतात. जे सध्याचे किंवा बाहेरचे स्पर्धक आहेत ते जगभरातून येत असतात, आणि फिटनेस साठी त्यांच्याकडूनही प्रेरणा मिळत राहते.

जोगोअॅप्सला विम्याशी संलग्न करण्यात आले आहे, त्यामुळे त्यात सहभागी होण-यांना अतिरिक्त सेवा मिळतात आणि खेळाच्या माध्यमातून ते फिटनेसही मिळवतात. ग्राहकांच्या बाजूने विचार करता जोगोअॅप्स हे नव्या उत्पादनांचा शोध लावण्याचे तंत्र आहे, जे बाजारात मिळू शकत नाहीत.

क्षेत्राचा आढावा

सध्याच आलेल्या एका अहवालानुसार भारतात दुय्यम दर्जाची जीवनशैली हे देखील आजारपणाचे एक कारण आहे, त्यात देशातील ७०हजार तरुणांचा समावेश होतो. या अहवालात म्हटले आहे की भारत आता मधुमेहांची राजधानी होत आहे, जगातील ४२२दशलक्ष रुग्ण एकट्या भारतात आहेत. प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा हे त्यामुळे भारतात मोठी बाजारपेठ आहे, त्यात मोठ्या प्रमाणात स्टार्टअप येत आहेत, त्यातून भारतीयांना आरोग्यकारक सोयी सुविधाची जाणिव दिली जाते.

मायक्रोमँक्सच्या पाठिंब्याने हेल्थी फाइम हे लोकप्रिय कॅलरी काऊंटर आहे, ते डिजीटल फिटनेस कोच म्हणूनही काम करते. त्यात विशाल गोंडल यांचे , Delhi-based FitSo तर मुकेश बन्सल आणि अंकीत नागोरी यांचे क्यूर फिट काम करते.

भविष्याच्या योजना

तर, जोगो ऑनलाईन आणि ऑफलाईनही काम करते, पुजा सांगतात की, त्यांचे सध्याचे युजर बेस मुळचे आहेत. त्यातील बहुतांश भारतीय आहेत, त्यात पाच टक्के जागतिक वापरकर्ता सक्रीय आहेत.

जोगोअॅप्सने एंजल फंडिंगच्या माध्यमातून रवि श्रीवास्तव याच्याकडून २०१५मध्ये भांडवल मिळवले आहे, तर स्टार्टअप उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची गरज येत्या काही महिन्यात पडणार आहे. पुजा यांनी सांगितले की, सध्याचा प्रतिसाद बरा आहे, वापरकर्त्याच्या आवडीनुसार लिडरबोर्ड सारख्या खेळाच्या माध्यमातून मिळणा-या सुविधांना चांगला प्रतिसाद आहे. पुढे जावून हा मंच एक लाख वापरकर्ता वापरतील हे पुजा यांचे येत्या सहा महिन्यातील लक्ष्य आहे. त्यातून खळबळजनक सामाजिक चळवळ निर्माण करत त्यांना फिटनेसचा प्रचार करायचा आहे.

लेखक : हरिश मल्ल्या

Website- JogoApp