मुंबईतले ‘कार’वाले 'ब्रोकर दलाल'

0

आशिष मर्चंट आणि दर्शन शहा हे दोघे कॉलेजमध्ये पहिल्यांदा भेटले. बीएमएस करताना दोघांची मैत्री वाढली. कॉलेज संपल्यावर दोघांना चांगली नोकरी ही लागली. मोठ्या कंपन्यामध्ये. पण आपण जे करतोय ते इतरांसाठी, दुसऱ्यांच्या कंपनीत किती दिवस काम करणार हा विचार दोघांच्या मनात येत असे. मग अचानक दोघांनी आपआपल्या चांगल्या नोकऱ्या सोडल्या. त्यांनी दोघांनी गाड्या विकण्याचा व्यवसाय सुरु केला. त्यांच्या कुटुंबियांपैकी कुणीच अशाप्रकारच्या व्यवसायात नव्हतं. नवखे असतानाही एक वर्षभरात त्यांनी चांगला फायदा मिळवला. आता त्याना एक ऑफिस हवं होतं. आशिषच्या वडिलांनी आपली एक जागा भाड्यानं दिली होती. या भाड्यातून मिळालेल्या पैश्यांचा उपयोग नवीन जागा घेण्यासाठी झाला. तिथूनच ब्रोकर दलाल कंपनीची अधिकृत स्थापना झाली. आशिष सांगतात की “आमच्या या व्यवसायात उच्चशिक्षित लोक नव्हते, मात्र आम्हाला या व्यवसायात संधी दिसत होती. म्हणून आम्ही याकडे वळलो.”


सुरुवातीचा काळ खुप कठीण होता. व्यवसाय वाढवायचा होता. कुटुंबियांकडून आणि मित्रांकडून पैसे घेतले, तरीही वर्षाला फक्त ७ ते ८ गाड्याच विकल्या जायच्या. स्वत: गाडी विकत घेऊन विकणं सुरु केलं. ते छोट्या गाड्या विकू लागले. हळू हळू लोकांना त्यांच्याबद्दल समजलं. त्यानंतर गाड्या विक्रीची संख्या वर्षाला १२ ते १५ इतकी झाली. आज ते वर्षाला ३० ते ४० गाड्या विकतात. शिवाय जवळपास ९० गाड्या स्टॉकमध्ये असतात. ज्यात छोट्या फॅमिली कार सहीत ऑटोमॅटीक गाड्याही आहेत. आशिष सांगतात आम्ही ग्राहकांना मुहुर्तानुसार गाड्यांची डिलीवरी करतो. रात्री १२ वाजता ही गाडी डिलीवरी करायची असले तर ती ही करतो त्यामुळं ग्राहक आमच्यावर खुश असतात. यामुळंच ज्यांनी अगोदर छोटी गाडी घेतली तेच ग्राहक आमच्याकडून मोठी गाडीही खऱेदी करतात. हे एक विश्वासाचं नातं तयार झालंय. याचा आम्हाला अभिमान वाटतो.

आज ब्रोकर दलाल कंपनी मुंबईतली नावाजलेली नव्या आणि जुन्या गाड्या विकणारी कंपनी आहे. एक भरवश्याचं नावं झालंय. आज कंपनीकडे येणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढलेय. मुंबईत सर्वात जास्त गाड्या विकण्याचा मान ब्रोकर दलाल कंपनीकडे आहे. आशिष आणि दर्शन सांगतात की हे सर्व ग्राहकांच्या विश्वासामुळं झालंय आणि आम्ही जी मेहनत घेतली त्याचं फळ आम्हाला मिळतंय, हे विशेष.

Related Stories

Stories by Ashutosh Pandey