डॅडी हेच नवी मम्मी आहेत

0

जेंव्हा तुषार कपूर, एकटा पुरुष सरोगसीतून(भाड्याने गर्भाशय घेऊन) ‘लक्ष्य’चा बाबा झाला, (बहुदा अंकगणिताच्या माध्यमातून दुहेरी नाव ठेवले असावे) देशाचे त्यावर लक्ष केंद्रीत झाले आहे. येथे अनेक सेलिब्रीटी आहेत ज्यांनी एक पालकत्व स्विकारून विवाहातील घटस्फोट, जोडीदाराचा मृत्य़ू सारख्या विवादास्पद गोष्टी टाळण्याचा प्रयत्न केला आहे. नीना गुप्ता यांनी १९८९ मध्ये मुलगी मसाबासाठी असाच धाडसी निर्णय विवाहबंधनाबाहेर जात केला आणि सुष्मिता सेन यांनी सुध्दा केवळ वयाच्या पंचविशीतच कायदेशीररित्या लहान मुलगी दत्तक घेतली.(नंतर त्यांनी आणखी एक मुल दत्तक घेतले.) अभिनेत्री रविना टंडन सुध्दा दोन दत्तक मुलांची एकटी आई झाली होती तिच्या विवाहापूर्वी. 

त्यामुळेच तुषारने जे काही केले आहे त्यामागे अशी काही कारणे आहेत ज्यात एकट्याने वडीलपण स्विकारण्यात फारच कमी पुरुष तयार होतात. “ बाप होण्यात मी थरार अनुभवला! माझ्यात असलेल्या पालकत्वाच्या उर्मीतून मी हे सिध्द केले आहे की, माझे मन आणि बुध्दी त्यासाठी तयार झाल्या आहेत. त्यामुळे लक्ष्य साठी जो थरार मी अनुभवतो आहे तो अवर्णनीय आहे. आता माझ्या जीवनानंदाचा सर्वात मोठा स्त्रोत उपलब्ध झाला आहे.” असे या बॉलिवूडच्या अभिनेत्याने निवेदनात म्हटले आहे. असेच अभिनेते अमीर खान आणि त्यांच्या पत्नी किरण राव यांचा मुलगा आझाद आणि शाहरुख खान आणि गौरीखान यांचे तिसरे अपत्य अबराम यांचा जन्म सरोगसीमधून झाला आहे. तुषार यांचा विवाह झाला नसल्याने त्यांचा निर्णय अधिक उठून दिसतो त्यामुळे स्त्रीपालकांची मदत त्याला त्याचे मुल वाढविण्यात होणार नसल्याचे दिसते.

Image Credit: Business Insider
Image Credit: Business Insider

तो तर सिनेअभिनेता आहे, पण २८वर्षीय आदित्य तिवारी देखील खरोखर एक पालकत्व स्विकारणारे सिंगल डॅड आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरही केवळ पुरुषांनी एकपालकत्व घेऊन वडील होण्याचे प्रमाण वाढत आहे. अगदी एकलवडीलकी आत्मसंयमपूर्वक. समलैंगिक असलेल्या अनेकांची उदाहरणे आहेत, जसे की गायक रिकी मार्टीन जे सरोगसीमधून जुळ्या मुलांचे वडील आहेत, त्यांच्या जोडीदारासोबत.

येथे लिआम मेसाम यांच्या सारखेही काही आहेत, ज्यांनी स्किईंगमध्ये झालेल्या दुर्घटनेत पत्नीला गमावल्यानंतर आपल्या दोन मुलांचे वाहून घेतलेले वडील झाले आहेत. येथे रिअल माद्रीदचा फुटबॉलर क्रँस्टिनो रोनाल्डो देखील आहे, ज्याने आश्चर्यकारकपणे जाहीर केले की त्याला मुलगा झाला आहे (चर्चा आहे की हा एका रात्रीचा परिणाम आहे.) आणि वडीलपणाचा दिमागदारपणे त्याने स्विकार केला. या सा-या पुरुषांचे जे काही घडले आहे, आणि यांच्या सारख्या इतर अनेकांचे, त्यांनी त्यांच्या मुलांना चांगले बनवून मोठे करण्याचा निश्चय केला आहे.

बदलाचे वारे

लैंगिक परिभाषा चीनी संकल्पना यीन आणि यान सारखी आहे. जरी आपण पाहतो की अधिकांश स्त्रिया परंपरागत लैंगिकतेच्या बाबीपासून दु्र राहू पहात आहेत आणि पुरुषांचे वर्चस्व झिडकारत आहेत. हे ही पुरुषांच्या बाबतीत तितकेच खरे आहे की, कुटूंबप्रमुखाच्या वृत्तीपासून पुरुषही दुरावत चालले आहेत हे त्यांच्या व्यक्तिमत्वात होत असलेले बदल आहेत, लैंगिक समानतेच्या आदर्श परिभाषेत समतोल साधण्यासाठीच.

समाधानाचा भागाकार

आजचे पुरुष पुरुषीपणाच्या त्या वागणूकीचे बहुधा राहिले नाहीत. त्यामुळेच समूह संपर्क माध्यमात वडिलकीच्या समाधानात वाहिलेले डॅड पहायला मिळतात. जसे की रेयान रेयनॉल्डचे गमतीदार ट्वीट आहे, “ मी माझ्या मुलीसाठी आगीवरही चालेन, नाही आगीवर नाही कारण ते धोकादायक आहे, पण एखाद्या आग्निदिव्यासारखे अमानवी अगदीच ओलाव्याने कारण माझ्या वारसासाठी” किंवा शाहरुख खानच्या इंस्टाग्रामवरील दाट तपकिरी रंगातील भुतकाळाबाबतच्या पोस्टनुसार “ आज नकारात्मक एकच वाटते की माझी मुले मोठी झाली आहेत. . . आता तोवर वाट पहायची की ते परिकथांवर पुन्हा विश्वास ठेवतील. . . .” या पुरुषांना जगासमोर त्यांच्यातल्या हळुवारपणाचा अनुभव सांगताना अवघडल्यासारखे होते.

लैंगिक तटस्थवृत्तीचे पोषणकर्ते आणि घरनिर्माते

जसे पुरुष आणि स्त्रियांनी परंपरागत पोषणकर्ते आणि घरनिर्माते या जुनाट विचारांतून बाहेर पडण्यास सुरुवात केली तसे त्याचा प्रभाव त्यांच्या पालकत्वाच्या भूमिकांवरही  चौकटीबाहरे जाण्यात होताना दिसतो आहे. जसे वडील त्यांच्या मुलांच्या जीवनात अधिक रमत आहेत, त्याचा मनोवैज्ञानिक परिणाम किंवा सर्वसामान्यांच्या भाषेत कुटूंबाच्या चांगुलपणाची भावना मोठ्या प्रमाणात वाढीस लागत आहे.

झगेदारपणाचा प्रभाव

जेंव्हा पुरुष कनवाळू होतात, त्याचा परिणाम त्यांना त्यांच्या दैनंदिन कामातही अधिक चांगल्या पध्दतीने होताना दिसतो. बराक ओबामा यांनी त्यांची कन्या मालिया हिच्या महाविद्यालयातील अलिकडच्या कार्यक्रमात उशीरा जाण्याबद्दल म्हटले आहे. “ माझी मुलगी मला माझे हृदय तोडून जाते आहे की काय असे वाटते” ते म्हणतात. “ जर इथे कुणी इतर पालक असतील तर कृपया मला काही सांगा की तिच्या महत्वाच्या समारंभात न रडता कसे जायचे आणि तिला प्रोत्साहित कसे करायचे”. म्हणून हे ओबामा यांच्यासाठी आश्चर्याचे नाही की फारच थोड्या अमेरिकन राजकारण्यांपैकी ते सुध्दा कठोरपणाच्या कायद्यांबाबत विरोधीसूर आळवणारे आहेत. बदलांची एक कडी समाजातील चुकीच्या गोष्टीं विरुध्द आकार घेत आहे हा खरोखर औत्सुक्याचा काळ आहे जो सामाजिक क्रांतीकडे घेऊन जात आहे. अखेर, असे म्हणतातच ना की, पुरुष हा लहानमुलापेक्षा कधीच उंच होत नाही जेंव्हा तो झुकून त्याला मदत करतो, आणि इथे तर असे दिसते आहे की असे असंख्य पुरुष आहेत जे कनावाळूपणाने वागतात.

लेखिका : शकिरा नायर