आयडीबीआय फेडरल लाईफ ईन्शूरन्सने आणले आहे; जगातील पहिले-वहिले ‘स्ट्रीट स्टोर’ !

0

‘स्ट्रीट स्टोर’(रस्त्यावरील दुकान) हे जगातील पहिले भाडेमुक्त, वास्तू मुक्त, इंटरनेट मुक्त कपड्याचे दुकान आहे जे घर नसलेल्या गरजूंसाठी आहे. प्रथम याचा उगम दक्षिण अफ्रिकेत झाला, या संकल्पनेला माध्यमांनी प्रतिसाद दिला आणि लोकांनी साद दिली. कमीत कमी भांडवलात आणि स्त्रोतामधून, ‘स्ट्रीट स्टोर’ एक मंच मिळवुन देतो ज्यांना दान करायचे आहे किंवा दान मिळवायचे आहे त्यांना त्यांच्या मनाला समाधान आणि प्रतिष्ठा देवून!

२०१४ मध्ये या उपक्रमाची सुरूवात झाल्यापासून जगातील तेहतीस देशांमधील शहरात हा उपक्रम राबविण्यात आला. मुंबईत या उपक्रमाचे दायीत्व आयडीबीआय फेडरल लाईफ इन्शूरन्स यांनी स्विकारले आहे.


या उपक्रम प्रसंगी बोलताना कार्तिक रामन, मुख्य विपणन अधिकारी आयडीबीआय फेडरल लाईफ ईन्शूरन्स, म्हणाले की, एक संस्थात्मक ब्रँण्ड म्हणून आयडीबीआय फेडरलचा यावर विश्वास आहे की, व्यक्तिला त्यांच्या जीवनात आणि जीवनशैलीत जगण्यासाठी त्यांच्या आवडी-निवडी नुसार सक्षम केले पाहिजे. याच विचारांचे प्रतिबिंब आम्ही जे काही करतो आहोत त्याच्या पाठिंब्याच्या स्वरुपात दिसून येते जे की, खेळातील मॅरेथॉन समाजाला प्रोत्साहन म्हणून आम्ही घेत असतो. स्ट्रीट स्टोर हा उपक्रम देखील ख-या अर्थाने आमच्या वैचारीकतेला साजेश्या पध्दतीचा आहे”.

“ आयडीबीआय फेडरल इन्शूरन्स मध्ये आमचा विश्वास आहे की, प्रत्येक माणसाला त्याच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्याचा अधिकार आहे, आमची संस्था स्ट्रीट स्टोरच्या माध्यमातून त्या दिशने केवळ एक पाऊल टाकते आहे”. त्यांनी पुढे सांगितले.


एक सप्ताहभर आधी ‘कलेक्शन बॉक्स’ रस्त्यांवर विशिष्ट ठिकाणी ठेवले जातात जसे की कॉर्पोरेट कार्यालये किंवा मॉल्सच्या बाहेर, जेथे लोकांना त्यांच्या कडील अतिरिक्त कपडे दान करता यावेत. नंतर ते गोळा करून त्यांची वर्गवारी केली जाते, त्यांना नंतर कार्डबोर्ड स्टॅन्डच्या मदतीने सजावट करून मांडले जाते आणि स्ट्रीट स्टोर सुरू होते, हे दुकान असे आहे जे कुठेही सुरू होते! या दुकानातील कार्डबोर्ड स्टॅण्डची रचना देखील आकर्षक आणि फॅशनेबल पध्दतीने केली जाते जसे एखाद्या दुकानात असते. आयडीबीआय फेडरल लाईफ ईन्शूरन्स त्यांच्या महत्वाच्या सहका-यांसोबत ट्वीटर आणि फेसबूक हॅण्डलवरून याचा प्रचार करते ज्यातून या उपक्रमाला प्रतिसाद मिळतो. त्यांनी मोक्याच्या जागांवर ओओएच डिस्ल्पे देखील केले आहेत जेणेकरून अधिकांश लोकांना हा संदेश पोहोचविता यावा. अखेरचा स्ट्रिट स्टोर पाच मार्च २०१७ रोजी सायन –धारावी टी जंक्शन येथे भरविण्यात आला होता, जेथे लोक आले आणि त्याना हवे ते दान केले किंवा दान म्हणून स्विकारले! त्यानंतर स्वयंसेवकांनी विशेष बॅगांमध्ये हे कपडे लोकांना बंद करून दिले. २५००पेक्षा जास्त कपडे तसेच शंभरपेक्षा जास्त पादत्राणांच्या जोड्या यावेळी हजार पेक्षा जास्त घराबाहेर असलेल्यांना वाटण्यात आल्या! (सीएसआरच्या सौजन्याने)