रोजंदारीवर चार रुपये कमाविण्यापासून ते बावीस हॉटेलांचे मालक होण्यापर्यंतच्या यशाची कहाणी

रोजंदारीवर चार रुपये कमाविण्यापासून ते बावीस हॉटेलांचे मालक होण्यापर्यंतच्या यशाची कहाणी

Wednesday December 28, 2016,

3 min Read

१९५०च्या सुरुवातीचा तो काळ होता ज्यावेळी कर्नाटकच्या उडपी जिल्ह्यातून पादुकोण गावचा दहा वर्षांचा तो मुलगा मुंबईत दाखल झाला ते या मायानगरीत मोठे होण्याचे स्वप्न घेवूनच. दक्षिण मुंबईतील एका मंदीराजवळच्या एका लहानश्या खानावळीत चार रुपयांवर रोजंदारी मजूर म्हणून कामाला सुरुवात करत नंतर त्याने मुंबई पोर्ट ट्रस्टच्या खानावळीत सहा रुपयांची नोकरी सुरु केली.

लवकरच त्यांनी स्वत:चे उपहारगृह सुरू केले, जेथे ते फळांचा रस आणि प्रसिध्द पाव भाजी विकू लागले. हे सारे त्यांनी छोट्या हातगाडीवर चौपाटी येथे सुरु केले, आणि दूरच्या एका नातेवाईकाने यासाठी आर्थिक मदत केली. मग त्यांनी लँमिंगटन रोडवर दुसरे असे उपहारगृह सुरू केले जे मुंबईत इलेक्ट्रॉनिकचे हब म्हणून ओळखले जाते. सँन्डविच, इडली आणि भात यांची सेवा देणा-या या उपहारगृहाला त्यांनी नाव दिले ‘सुखसागर’. हा उपक्रम शहरात खूप भरभराटीला आला. आणि अथक मेहनत आणि संघर्षानंतर सुखसागरच्या आता २२ शाखा आहेत. त्यापैकी८ मुंबईत आहेत, ७ बंगळुरूमध्ये आहेत, आणि प्रत्येकी एक म्हैसुरू, चेन्नई, आणि सौदी अरेबिया मध्ये तर प्रत्येकी दोन दुबई आणि कतारमध्ये आहेत. अजूनही काही नवे प्रस्ताव यासाठी येत आहेत. त्यामुळे सुखसागर हा सर्वार्थाने यशस्वी सहउद्योग बनला आहे.

ही सुरेश पुजारी, वयवर्ष ७६, यांची कहाणी आहे,एक यशस्वी माणूस जो शुन्यातून मोठा झाला.


Source : Youngisthan

Source : Youngisthan


एका लहानश्या लाकडी गाडीवर सुरुवात करत, आणि अमिताभ बच्चन यांच्याशी हात मिळवत सुरेश यांनी हे सारे करुन दाखवले आहे. माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस, ज्यांनी सुरुवातीच्या काळात नेहमी सुखसागरमध्ये भेट दिली आहे, त्यांच्यासाठी सुरेश यांना भेटण्याचे हुकूमी ठिकाण बनले होते, अगदी ते राजकारणातील महान हस्ती झाल्यानंतरही. एक असाही काळ आला होता ज्यावेळी त्यांच्या गाडीवरील खाद्यपदार्थ तारांकीत हॉटेलपेक्षा अधिक रुचकर मिळत होते.

तीन वर्षापूर्वी दिलेल्या एका मुलाखती दरम्यान सुरेश म्हणाले होते की, “ हे माझे खरेखुरे शिक्षणाचे मैदान होते जेथे मला ग्राहकांच्या आवडी निवडी समजल्या. मी १८तास मेहनत करत असे. नववीपर्यंत रात्रशाळेत जात होतो. पण माझी शालांत परिक्षा उत्तीर्ण होवू शकलो नाही. मला वाचन आवडे, मी वैविध्यपूर्ण वाचक होतो. आज माझ्याजवळ स्वत:च्या संग्रही हजारपेक्षा जास्त पुस्तके आहेत, जी मी स्वत: विकत घेतली आणि अनेकदा वाचली आहेत.”

सुखसागर सामाजिक बांधीलकीचा उपक्रम म्हणून बेवारस मुलांना शिक्षण आणि अन्नदान यामध्येही पुढाकार घेते. हजार लोकांना रोजगार मिळाला आहे, बावीस उपहारगृहातून, शॉपिंग मॉलमधून आणि आईसक्रीम फँक्टरीमधून तसेच बंगळूरूमध्ये असलेल्या तीन तारांकीत उपहारगृहातून.

१९७६मध्ये त्यांनी संतोषी यांच्याशी विवाह केला. आता त्यांची तीन मुले देशभरातील कारभार पाहतात आणि सुखसागर आंतरराष्ट्रीय उपक्रमामध्ये लक्ष घालतात. यश मिळाल्यानतरही सुरेश आजही जमीनीवर आहेत, त्यांच्या जन्मगावी पादुकोणला जातात तेथील मुलांच्या शिक्षणाला मदत करतात. त्यांनी मोफत समाजभवन देखील सुरु केले आहे. त्यांच्या कर्मचा-यांची औषधोपचारांची देयके ते देतात, शिवाय त्यांना भरपगारी सुट्या सुध्दा दिल्या जातात. 

स्वत: हे सारे संघर्षातून शिकलेल्या सुरेश यांनी त्यांच्या कर्मचा-यांना कर्जे दिली आहेत आणि ज्यांना इच्छा आहे त्यांना स्वत:चे व्यवसाय सुरु करण्यासाठी पुढाकार घेतात. निस्वार्थी उद्योजक म्हणून सुरेश म्हणजे दया आणि साधेपणाचे प्रतिक बनले आहेत. त्यामुळे अनेकांना ते प्रेरणादायक ठरले आहेत.

सौजन्य - थिंक चेंज इंडिया

    Share on
    close